नमस्कार मित्रांनो , आज आपण महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना ( Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024 ) या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात , काय आहे Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana आणि त्यासाठी काय लागणार आहे, कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतात , सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येयील इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्रातील नागरिकांना मिळालेले खूप महत्त्वाची योजना आहे कारण अनेक आजारांवर व उपचारांवर सहाय्य करण्यासाठी त्याची मदत होत आहे. याआधी ही योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने ओळखले जात होती व तिची सुरुवात 2 जुलै 2012 पासून आठ जिल्ह्यात लागू करून करण्यात आली होती. त्यानंतर कालांतराने ही योजना राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील वाढवण्यात आली. या योजनेचा फायदा असा की राज्यातील दोन कोटी पेक्षा जास्त नागरिकांना निशुल्क वैद्यकीय सेवा दिली जात आहे.
यामध्ये आणखी भर घातली ती म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या भारत सरकारच्या आरोग्य विमा योजनेसोबत संलग्नता करून. 23 सप्टेंबर 2018 पासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करण्यात आली. 1 एप्रिल 2020 पासून सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात राबविण्यात सुरू झाली.
समाजामधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना नागरिकांना या योजनेचा खूप फायदा होत आहे. काही असे देखील उपचार आहेत की ज्यांचे उपचार घेण्यासाठी खूप जास्त आर्थिक दडपण कुटुंबावर येते. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी या योजना जीवनदायी ठरत आहेत. या योजनेमध्ये एक हजार पेक्षाही जास्त उपचार उपलब्ध असल्यामुळे कोणतीही अडचण नागरिकांना त्या ठिकाणी होत नाही. महागड्या असणाऱ्या शस्त्रक्रिया देखील या योजनांमधून केल्या जातात तसेच निमितपणे लागणारे उपचार जसे डायलिसिस याचे देखील पॅकेजेस या योजनेमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
लाभार्थी पात्रता
गट | लाभार्थ्यांचा तपशील |
गट अ | महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्हयांमधील अन्न व नागरी पुरवठा विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडून वितरीत करण्यात आलेल्या पिवळी शिधापत्रिका, अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबे. |
गट ब | अवर्षणग्रस्त 14 जिल्हयातील (औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा) शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे |
गट क | 1.शासकीय अनाथाश्रमातील मुले, शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिक 2. माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांचेवर अवलंबित असलेले कुटुंबातील सदस्य. 3. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जिवित बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे |
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Disease List
जळीत | ह्दयरोग | ह्दयरोग शस्त्रक्रिया व उपचार | आकस्मिक सेवा | त्वचारोग |
अंत:स्त्राव संस्थेचे विकार | कान, नाक व घसा रोग | सर्वसाधारण औषधशास्त्र चिकित्सा | सर्वसाधारण शस्त्रक्रिया | व्याधी चिकित्सा |
संर्सगजन्य आजार | इंटरव्हेन्श्नल रेडिओलॉजी | जठरांत्रमार्गाचे रोग | कर्करोगावरील औषधोपचार | नवजात व बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन |
मुत्रपिंड विकार | मज्जातंतूचे विकार | मज्जातंतूच्या विकारावरील शस्त्रक्रिया | स्त्री रोग व प्रसुती शास्त्र | नेत्ररोग शस्त्रक्रिया |
अस्थिव्यंग शस्त्रक्रिया | बालरोग शस्त्रक्रिया | बालरोग कर्करोग | प्लास्टीक सर्जरी | आस्कमिक वैद्यकीय उपचार |
कृत्रिम अवयव उपचार | फुफ्फुसाच्या आजारावरील उपचार | किरणोत्सर्गाव्दारे कर्करोग चिकित्सा | संधिवात सबंधी उपचार | जठर व आंत्र विकाराच्या शस्त्रक्रिया |
कर्करोगाच्या शस्त्रक्रिया | मुत्रवह संस्थेच्या विकारांवरील शस्त्रक्रिया | मानसिक आजार | जबडा व चेहऱ्याच्या अस्थींवरील शस्त्रक्रिया |
नवीन झालेले बदल
- 1.5 लाख असलेले आरोग्य संरक्षण 5 लाख एवढे करून वाढ करण्यात आली आहे.
- मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी उपचार खर्च 4.5 लाख एवढा करण्यात आला आहे की जो आधी 2.5 लाख एवढा होता.
- आवश्यक नसलेले उपचार हे वगळण्यात आले आहेत तर काही जे नव्याने उपचार सुचवले गेले आहेत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
- दोन्ही योजनेतील अधिकृत रुग्णालयांची संख्या 1000 एवढी होती पण आता ती वाढवून 1350 इतकी होणार आहेत तसेच सर्व शासकीय रुग्णालये या योजनेमध्ये ऄंगीकृ करण्यात आले आहेत.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Hospital List
या योजनेतील संलग्न असलेले हॉस्पिटल पाहण्यासाठी तुम्ही जीवनदायी या वेबसाईटवर जाऊन शोधू शकता. जिल्ह्यानुसार हॉस्पिटल ची नावे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहेत. ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ही योजना घेऊ इच्छिता त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांच्या कार्यालय देखील असते त्या ठिकाणी संपर्क साधून तुम्ही ज्या आजाराबद्दल उपचार घ्यायचे आहेत त्यासाठी चौकशी करू शकता. पुढील प्रोसेस त्यांच्याच मदतीने करू शकता.
Documents
- महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- रेशन कार्ड तुला तिला
- वरील पात्रता गटांमधील एक असल्याचा पुरावा
- ओळखीचा पुरावा
अर्ज कसा करावा
रुग्णाला या योजनेची संलग्न असलेल्या रुग्णालयामध्ये जाऊन तपासणी करावी लागेल. त्यानंतर रुग्णाच्या आजाराविषयी निदान केले जाईल व एकूण खर्च तपशीलवार डॉक्टरांकडून दिला जाईल. हा तपशील घेऊन रुग्णालयातील योजनेच्या कार्यालयाला भेट देऊन आरोग्य मित्रांच्या साह्याने ऑनलाईन अर्ज भरता येईल. उपचाराच्या खर्चांसोबतच हॉस्पिटलचा खर्च, डॉक्टरांचा खर्च, प्रवास भाडे, औषधे हे देखील खर्च नोंदणी ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर केली जाते. त्यानंतर तुमचा अर्ज अप्रुव्हल साठी पुढे पाठवला जातो व सर्व तपासणीनंतर तुमची योजना मान्य केली जाते व तुम्हाला सर्व फायदे मिळतात. Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
टोल फ्री क्रमांक
तुम्हाला Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana योजनेविषयी काहीही अधिक माहिती हवी असेल किंवा काही अडचण येत असेल किंवा काही तक्रार करायची असेल तर तुम्ही टोल फ्री क्रमांक आला फोन करू शकता. टोल फ्री क्रमांक खाली देत आहोत.
1800 233 22 00
Conclusion
मित्रांनो , ह्या लेख मध्ये आम्ही महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे कि उद्दिष्ट , ती योजना म्हणजे काय इत्यादी ,मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल. धन्यवाद !