महाराष्ट्र शासन कृषी योजना 2022 PDF File कृषी यांत्रिकीकरण

महाराष्ट्र शासन कृषी योजना 2022 If You like Maharashtra Government Krushi Vibhag Yojana then this is the right place for you.

खाली दिलेल्या सर्व योजनेंचा समावेश हा ‘कृषी योजना 2022 मध्ये केला आहे. त्या सर्व योजना खालीलप्रमाणे -:

शेतकरी योजना

महाराष्ट्र शासन कृषी योजना 2022

  • (१) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)
योजनेबद्दल
विभागाचे नाव - कृषी विभाग

सारांश

    • पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन.
      या पद्धतीत, जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते.
maharashtra shasan krushi yojana
maharashtra shasan krushi yojana
    • मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकटय़ा महाराष्ट्रात केले जाते.
    तुषार सिंचन (ज्यात पाणी शिंपडणारे म्हणून ओळखले जाते) हे एक असे साधन आहे जे शेती पिके, लॉन्स, भूदृश्य, गोल्फ अभ्यासक्रम आणि इतर भागात सिंचन करण्यासाठी वापरली जाते.
    ते थंड करण्यासाठी आणि वायूच्या धूळ नियंत्रणासाठी देखील वापरली जाते. तुषार सिंचन ही पावसासारख्याच प्रकारे नियंत्रित पद्धतीने पाण्याचा वापर करण्याचा मार्ग आहे.
    पाणी एका नेटवर्कद्वारे वितरीत केले जाते ज्यामध्ये पंप, वॉल्व्ह , पाईप्स आणि स्पिंकलर्स असू शकतात. या सिंचनाचा वापर निवासी, औद्योगिक आणि कृषी वापरासाठी केला जाऊ शकतो.
    जेव्हा पंपच्या मदतीने मुख्य पाईपद्वारे दाबून पाणी वाहू दिले जाते तेव्हा फिरणाऱ्या नोझल मधून बाहेर पडते आणि ते पिकावर शिंपडले जाते.

अनुदान

    • केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सादर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान खालीलप्रमाणे असेल:
    • 1) अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी – ५५ %
    • 2) इतर शेतकरी – ४५ %
    • फायदे पाहण्यासाठी कृपया खालील बटणावर क्लिक करा.

View Benefits pdf पहा

पात्रता

  •  शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे. (महाराष्ट्र शासन कृषी योजना 2022)
  •  शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  •  शेतकरी एससी, एसटी जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  •  जर लाभार्थ्याने २०१६-१७ च्या आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील १० वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही आणि जर लाभार्थ्याने २०१७-१८ च्या नंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील ७ वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.
  •  शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलची ताजी प्रत सादर करावी लागेल.
  •  सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.
  •  शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल.
  •  शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म-सिंचन संच विकत घ्यावे, ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड कराव्यात.(महाराष्ट्र शासन कृषी योजना 2022)
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र 2022 | मुख्यमंत्री ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र

आवश्यक कागदपत्रे

  •  ७/१२ प्रमाणपत्र
  •  ८-ए प्रमाणपत्र
  •  वीज बिल
  •  खरेदी केलेल्या संचाचे बिल
  •  पूर्वसंमती पत्र

महाराष्ट्र शासन कृषी योजना 2022 कृषी यांत्रिकीकरण

(२) कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान

योजनेबद्दल
विभागाचे नाव - कृषी विभाग

सारांश

    • कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे.
महाराष्ट्र शासन कृषी योजना
महाराष्ट्र शासन कृषी योजना

उद्देश :

    • जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे.
    • प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे.

धोरण :

    कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे

अनुदान

    • या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल:
    • १) ट्रॅक्ट
    • २) पॉवर टिलर
    • ३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
    • ४) बैल चलित यंत्र/अवजारे
    • ५) मनुष्य चलि यंत्र/अवजारे
    • ६) प्रक्रिया संच
    • ७) काणी पश्च्यात तंत्रज्ञान
    • ८) फलोत्पादन यंत्र/अवजारे
    • १०) स्वयं चलित यंत्रे
      ९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे

 

    • भाडे तत्वावरील सुविधा केंद्र:
    • १) कृषि अवजारे बँकेची स्थापना
    • २) उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना

 

    • *लाभाच्या माहितीसाठी कृपया सोबतचे प्रपत्र पाहावे.

View Benefits PDF FILE

महाराष्ट्र शासन कृषी योजना 2022 कृषी यांत्रिकीकरण

 

पात्रता महाराष्ट्र शासन कृषी योजना 2022

      •  शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
      •  शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
      •  शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
      •  फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
      •  कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
      •  एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल

    उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील “महाराष्ट्र शासन कृषी योजना 2022”

आवश्यक कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  •  ७/१२ उतारा
  •  ८ अ दाखला
  •  खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
  •  जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
  •  स्वयं घोषणापत्र
  •  पूर्वसंमती पत्र

ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र 2022 | मुख्यमंत्री ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र

2 thoughts on “महाराष्ट्र शासन कृषी योजना 2022 PDF File कृषी यांत्रिकीकरण”

Leave a Comment

close button