ऑनलाईन फॉर्म कुक्कुटपालन योजना महाराष्ट्र | Kukut Palan Yojana Online Form 2024

By Shubham Pawar

Published on:

Kukut Palan Yojana 2024: कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सयव्यवसाय मंजुर करण्यात आलेली \”कंत्राटी पध्दतीने मांसल कुक्कूट पक्षी पालन व्यवसाय सुरु करणे\” ही राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना कंत्राटदार कुक्कूट कंपनीच्या सहाय्याने राबवावयाची होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या योजनेच्या अंमलबजावणी करिता आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे कार्यालयाकडून राज्य स्तरावर कंत्राटदार कुक्कूट कंपन्यांच्या निवडी करिता निविदा मागविण्यात आल्या होत्या.

त्यास कंत्राटदार कंपन्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने कंत्राटदार कुक्कूट कंपन्यांच्या निवडी करिता जिल्हास्तरावर निविदा मागविण्यात आल्या.

नाशिक व कोल्हापूर या जिल्ह्यातून कंत्राटदार कुक्कूट कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाल्याने, सदर जिल्ह्यात ही योजना सन 2011, मध्ये राबविण्यात आली.

राज्यातील उर्वरीत जिल्ह्यात या योजना करीता कंत्राटदार कुक्कूट कंपन्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने ही योजना राबविता येवू शकली नाही.

\”कंत्राटी पध्दतीने मांसल कुक्कूट पक्षी पालन व्यवसाय सुरु करणे\” या योजनेस लाभार्थ्यांकडून राज्यभरातून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळालेला होता.

टीप :-

  1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्हया मध्ये राबवली जाणार नाही .
  2. लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला व 3 टक्के विकलांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे.

 

कुक्कुटपालन योजना उद्देश

ग्रामीण भागात या व्यवसाय द्वारे होणारी रोजगार निर्मिती तसेच कुक्कूट व्यवसायाच्या योजनेस लाभार्थी कडून मोठया प्रमाणात मिळालेला प्रतिसाद ही बाब विचारात घेऊन 12 व्या पंचवार्षिक योजना कालावधीत कंत्राटी पध्दतीने मांसल कुक्कुट पक्षी पालन व्यवसाय सुरु करणे.

या योजना ऐवजी कंत्राटदार कंपनीच्या सहभागाशिवाय 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपन द्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे\” ही नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजना शासन राबविण्याच्या विचाराधीन होती. Kukut Palan Yojana Maharashtra

1000 मांसल पक्षी संगोपनाचा बाबनिहाय खर्चाचा तपशिल

अ.क्र. तपशील लाभार्थी /शासन सहभाग (रक्कम रुपयात) एकूण अंदाजित किंमत (रक्कम रुपयात)
1 जमीन लाभार्थी स्वताची/भाडेपटटीवर घेतलेली
2 पक्षीगह 1000 चौ फुट , स्टोअर रुम, पाण्याची टाकी , निवासाची सोय , विदयुतीकरण लाभार्थी / शासन 2,00,000/-
3 उपकरणे/खादयाची , पाण्याची भांडी , ब्रुडर इ. लाभार्थी /शासन 25000/-
एकूण खर्च 2,25,000/-

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील

अ.क्र. प्रवर्ग 1000 मांसल पक्षी (रक्कम रुपयात)
1 शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के

 

१,६८,७५०/-
1 स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के

 

५६,२५०/-
2 शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के

 

१,१२,५००/-
2 स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के

 

१,१२,५००/-

कुक्कुटपालन योजना माहिती

योजनेचे नाव- 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे.

टीप :-

  • सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई, मुंबई उपनगरे ह्या जिल्हया मध्ये राबवली जाणार नाही .
  • लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला व 3 टक्के विकलांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे.

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने)

  • अत्यल्प भुधारक शेतकरी (1 हेक्टर पर्यतचे भुधारक)
  • अल्प भुधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्यतचे भुधारक )
  • सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोद असलेले)
  • महिला बचत गटातील लाभार्थी/ वैयक्तिक महिला लाभार्थी \’Kukut Palan Yojana Maharashtra Government 2024\’

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  1. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
  2. सातबारा (अनिवार्य)
  3. 8 अ उतारा (अनिवार्य)
  4. अपत्य दाखला (अनिवार्य)/ स्वघोषणा पत्र
  5. आधारकार्ड (अनिवार्य)
  6. रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य)
  7. बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य)
  8. रेशनकार्ड/ कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (अनिवार्य)
  9. 7-12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  10. अनुसूचीत जाती/ जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  11. दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  12. दिव्यांग असल्यास दाखला
  13. बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  14. वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  15. शैक्षणिक पात्रतेचा दाखला
  16. रोजगार, स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डची सत्यप्रत
  17. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत (Kukut Palan Yojana Online Form 2024)
अधिक माहिती साठी शासन निर्णय पाहावा:- पहा

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

0 thoughts on “ऑनलाईन फॉर्म कुक्कुटपालन योजना महाराष्ट्र | Kukut Palan Yojana Online Form 2024”

Leave a comment