क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना | Krantijyoti Savitribai Phule Arth Sahay Yojana

By Shubham Pawar

Published on:

Krantijyoti Savitribai Phule Arth Sahay Yojana ;-शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थीनी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून विद्यापीठाकडून सदर अर्थसहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत सोबत जोडलेल्या नियम व अटीनुसार अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त १० व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 5 विद्यार्थीनीस गुणानुक्रमे रू. 5000/- अर्थसहाय्य देण्यात येईल.

(सोबत सविस्तर नियम व अटी) “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना” शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थीनी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पुणे विद्यापीठाने महाविद्यालये/विद्यापीठ विभागामध्ये अव्यवसायिक अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनींसाठी “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना’ सुरू केलेली आहे.

Krantijyoti Savitribai Phule Arth Sahay Yojana

नियम व अटी

  1. महाविद्यालये/विद्यापीठ शैक्षणिक विभागातील अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त १० व अव्यवसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमातील जास्तीत जास्त ०५ विद्यार्थीनी सदर योजनेसाठी पात्र राहतील.

  2. पात्र विद्यार्थीनीस रू. ५०००/- अर्थसहाय्य देण्यात येईल.

  3. विद्यार्थीनींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रू. २,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे यासाठी संबंधित तहसिलदाराचा दाखला आवश्यक राहील. सदरचे अर्थसहाय्य पात्र       विद्यार्थिनीस संपूर्ण पदवी आणि पदव्युत्तर काळात एकदाच देण्यात येईल. विद्यार्थिनीने मागील लगतच्या परीक्षेत किमान ५० टक्के गुण संपादित केलेले असावेत. ५०  टक्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थीनींचा गुणांनुक्रमे विचार करण्यात येईल.

  4. महाविद्यालये/विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थीनीने नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थीनीने व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश   घेतलेला नसावा. विद्यार्थीनीची नियमित अभ्यासक्रमात किमान ७५ टक्के उपस्थिती असणे आवश्यक राहील. या संदर्भात प्राचार्यांनी दाखला देणे आवश्यक राहील,

  5. विद्यार्थीनीस या योजनेच्या कालावधीत कोणतीही पगारी नोकरी स्विकारता येणार नाही.

  6. विद्यार्थीनीस गैरशिस्त / नैतिकता/परीक्षेतील गैरप्रकार इ. बाबत शिक्षा झालेली नसावी.

  7. अर्थसहाय्यासाठी विद्यार्थीनीच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर इतर उपक्रमातील सहभाग उदा. क्रीडा, समाजसेवा, कला इ. विचारात घेण्यात येईल.

  8. विद्यार्थीनीने त्यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. उदा. बँकेचे नाव, पत्ता, खाते क्रमांक (एमआयसीआर कोड आणि आयएफएससी कोड)

  9. अर्थसहाय्य योजनेसाठी विद्यार्थ्यानींची निवड करण्यासाठी महाविद्यालय पातळीवर मा. प्राचार्याच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे समिती गठीत करून अर्जाची     छाननी करावी. मा. प्राचार्य (अध्यक्ष)

10.महाविद्यालयातील समन्वयक, विद्यार्थी कल्याण योजना महाविद्यालयातील विविध शाखांच्या तीन प्राध्यापिका

  1. शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्याथ्यांनीस सदर योजना लागू राहणार नाही. याबाबत संबंधित विद्यार्थीनीने आणि प्राचार्यांनी एकत्रित   हमीपत्र भरून देणे आवश्यक राहील.

Apply Here –  https://bcud.unipune.ac.in/Scholorships

I am a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 6 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!