लाडकी बहीण योजना तुमची KYC झाली का नाही ? याठिकाणी करा ऑनलाईन चेक : Ladki Bahin Yojana KYC Status

By Marathi Corner

Published on:

राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाकडून माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये शासनाकडून जमा करण्यात येतात.

लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होताना संबंधित विभागाला निदर्शनास आले. त्यामुळे शासनाकडून वेळोवेळी या योजनेमध्ये अमुलाग्र बदल केला जात आहे. यामध्ये शासनाकडून नुकतीच आता KYC करण्यासाठीची अट ठेवण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजना KYC

आता यापुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला जर हवा असेल, तर शासनाकडून सुरू करण्यात आलेली केवायसी (आधार प्रमाणीकरण) प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी लागेल.

बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली असेल, पण ती पूर्ण झाली की नाही हे कसं तपासायच ? कारण जर KYC झाली नसेल, तर तुमचा पुढील हप्ता येण्यासाठी अडचण येऊ शकते.

काळजी करू नका ! तुमचे पैसे कुठेच जाणार नाहीत, कारण तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर अगदी सोप्या पद्धतीने तुमची KYC झाली की नाही, हे तपासू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.

KYC करणं का महत्वाच?

1. KYC पूर्ण केल्याशिवाय, शासनाकडून तुम्हाला तुमचा पुढील हप्ता दिला जाणार नाही. तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे पैसे वेळेवर मिळत राहण्यासाठी KYC करणे बंधनकारक आहे.​

2. यातून हे सिद्ध होतं की तुम्ही खरंच लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी असाल, तर यामधून बोगस लोकांना वगळण्यात येईल.​

3. दरवर्षी जून महिन्यात KYC करणे बंधनकारक असेल, असं शासनाने सांगितलं आहे. यामुळे तुमचा लाभ कायम राहील आणि बोगस, मयत लाभार्थ्यांना या योजनेतून दरवर्षी वगळण्यात येत.

KYC करतांना अडचण आल्यास ?

बहुतांश वेळा OTP येत नाही किंवा तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थी महिलांना केवायसी करत असताना अडचणी येतात येतात. अशावेळी तुम्ही तुमच्या आधार कार्डला तुमचा सध्याचा मोबाईल नंबर लिंक आहे का याची खात्री करून घ्या.​

तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरचा इंटरनेट कनेक्शन तपासा आणि वेबसाईट सध्यास्थितीमध्ये रात्री किंवा पहाटेच्या वेळी वापरून पहा, या कालावधीत केवायसी करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या कमी असल्यामुळे वेबसाईटवर जास्त लोड राहत नाही.

तुमची KYC झाली का नाही ? ऑनलाईन अशी तपासा !

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये शासनाकडून देण्यात आलेली लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट उघडा, त्यासाठी येथे क्लिक करा.
  • वेबसाईट उघडल्यानंतर Homepage वर लाडकी बहीण योजना KYC करण्यासाठी येथे क्लिक करा असा पर्याय Blick होताना दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर KYC स्टेटस तपासण्यासाठी तुमचा 12 अंकी आधार क्रमांक त्याठिकाणी टाका.
  • त्यानंतर खालील बॉक्समध्ये देण्यात आलेला Captcha Code बॉक्समध्ये टाका.
  • आधार क्रमांक व Captcha Code टाकल्यानंतर Send OTP या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या आधार लिंक मोबाईलवर 6 अंकी OTP पाठवण्यात येईल, तो ओटीपी बॉक्समध्ये टाकून Submit या बटनावर क्लिक करा.
  • OTP टाकून सबमिट केल्यावर, वेबसाईटवर लगेचच तुमचा स्टेटस दिसेल. तुम्हाला खालीलपैकी एक Message दिसू शकतो.
तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे तुमची KYC पूर्ण झालेली आहे. तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही या पुढील हप्ता तुम्हाला येईल.
वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक विचारात असेल तर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, पूर्ण करण्यासाठी वडिलांचा किंवा पतीचा आधार टाकून OTP टाका.
You are already e-KYC verified तुमची KYC आधीच झालेली आहे.
   

माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला यापुढे सुद्धा मिळत राहावा, यासाठी KYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचा स्टेटस आताच तपासा आणि जर पूर्ण नसेल, तर लगेच पूर्ण करून घ्या !

Leave a Comment