नमस्कार मित्रांनो, आज आपण केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या ई-श्रम कार्ड (E-Shram Card) योजनेबद्दलची थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. E-Shram कार्ड काय आहे, याचे कोणकोणते फायदे आहेत, कोणत्या व्यक्तीला ई-श्रम कार्ड काढता येतो, यासाठी कोणती कागदपत्र लागतात, अर्ज कसा करावा या संपूर्ण गोष्टीची माहिती आपण सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत.
भारतात मोठ्या प्रमाणावर असंघटित कामगार काम करतात विशेष करून महाराष्ट्रामध्ये कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या सर्व बाबीचा विचार करता शासनाकडून असंघटित कामगारांना विशेष सवलती व ओळख देण्यासाठी e shram card online registration process maharashtra संकल्पना विकसित करण्यात केली.
यापेक्षाही सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर ई-श्रम कार्ड हे आपल्यासारख्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी शासनाकडून दिलेल एक ओळखपत्र आहे, अस आपण समजू शकतो. जी व्यक्ती शेतात काम करतात, इतरांच्या घरी काम करतात, गवंडी काम करतात किंवा ज्यांना नोकरी नाही अथवा PF किंवा ESI सारख्या सुविधा मिळत नाहीत, अशा सर्वांची नोंद शासनाकडे व्हावी यासाठीची ही योजना आहे.
ई-श्रम कार्ड थोडक्यात माहिती
E-Shram कार्ड प्रत्येक असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना शासनाकडून उपलब्ध करून दिले जात आहे. त्या कार्डवर तुमचा एक 12 अंकी यूनिवर्सल अकाउंट नंबर (UAN) असतो.
फक्त 2 मिनिटांत तुमच्या मोबाईलवरुन Ration Card डाऊनलोड करा !
या 12 अंकी क्रमांकामुळे शासनाला कळते की तुम्ही कोणतं काम करता आणि तुम्ही कुठे राहता ? हे कार्ड म्हणजे सरकारकडे असलेली तुमची एक पक्की नोंद आहे.
ई-श्रम कार्डचा उद्देश काय ?
- देशात कोट्यावधी कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात; परंतु याची शासनाकडे कोणतीही नोंद नाही. आता या कार्डमुळे सर्व कामगाराची माहिती एका ठिकाणी जमा होईल.
- शासनाकडून कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जातात, सोबतच नवनवीन योजना घोषित केल्या जातात; परंतु याचा लाभ कामगारांना भेटत नाही, या कार्डमुळे शासनाकडून एखादी योजना कामगारांसाठी सुरू झाल्यानंतर थेट तुमच्या बँक खात्यात पैसे पाठविण्यात येऊ शकतात.
- अपघात, आजारपण किंवा म्हातारपणात कामगारांना आधार मिळावा, यासाठी सामाजिक सुरक्षा योजना, पेन्शन, विमा इत्यादी लागु करणे शासनाला सोयीस्कर होईल.
- तुमच्या कौशल्यानुसार सरकार तुम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकते. जशाप्रकारे तुम्हाला सुतार काम येत असेल आणि याची शासन दरबारी नोंद असल्यास तुम्हाला त्या संबंधित काम मिळून देण्यास मदत होईल.
E-Shram कार्डसाठी पात्र कोण ?
- शेतमजूर, ऊसतोड कामगार
- सुतार, लोहार, पेंटर
- बांधकाम कामगार (गवंडी, मजूर)
- भाजीपाला किंवा फळे विकणारे
- दूधवाला किंवा पेपर टाकणारे
- सलून किंवा पार्लरमध्ये काम करणारे
- आशा वर्कर, अंगणवाडी सेविका
- घरात धुणी-भांडी साफसफाई करणारे
- विडी कामगार, वीटभट्टी कामगार
- रस्त्याच्या कडेला दुकान असणारे
ई-श्रम कार्डचे फायदे (Benefits)
1. E-Shram कार्डधारकांचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा कायमचं अपंगत्व आल्यास त्या संबंधित कामगाराच्या कुटुंबाला 2 लाख रुपये शासनाकडून दिले जातील. अपघातात अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये देण्यात येतील. या विमा साठी कामगाराला एकही रुपया भरायची आवश्यकता नाही.
2. भविष्यात सरकार कामगारांसाठी कोणतीही योजना आणल्यानंतर त्याचा सर्वप्रथम लाभ ई-श्रम कार्डधारकांना दिला जाईल.
3. कोरोना सारख्या महामारी किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासन कामगाराच्या बँक खात्यात आर्थिक मदत ई-श्रम कार्डच्या माध्यमातून करू शकेल.
4. हे कार्ड तुमच्या कामाचं आणि तुम्हाला येत असलेल्या कौशल्याचं एक सरकारी ओळखपत्र म्हणून कोणतेही ठिकाणी ओळखलं जाईल.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याकडील 90 दिवस काम केल्याबाबतचा अहवाल
- आधार क्रमांकाला मोबाईल लिंक
- शिधापत्रिका झेरॉक्स
- इतर आवश्यक कागदपत्र
अर्ज कसा करावा ? e shram card online registration process maharashtra
कामगारांना अर्ज करण्यासाठी शासनाकडून अधिकृत पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. कामगार जर सुशिक्षित असेल, तर त्यांना स्वतःच्या मोबाईलवरून ऑनलाइन अर्ज करता येईल किंवा जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटरच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
जर तुमच्याकडे मोबाईल असेल आणि इंटरनेटची सुविधा असेल, तर तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून घरबसल्या ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकता त्यासाठी खालीलप्रमाणे अर्ज करा.
- सर्वप्रथम गुगलवर जाऊन शासनाकडून देण्यात आलेल्या eshram.gov.in ह्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर त्याठिकाणी असलेल्या Register On E-Shram या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमचा आधार कार्ड आणि आधार कार्डला जोडलेला मोबाईल क्रमांक टाका.
- तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठविण्यात येईल, तो OTP त्याठिकाणी टाकून Submit करा.
- त्यानंतर तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख आधार कार्डवरून घेतल जाईल आणि त्याठिकाणी तुम्हाला दिसेल.
- पुढील स्टेपमध्ये तुमची सविस्तर मूलभूत माहिती भरायची आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला तुमच ई-श्रमकार्ड भेटेल ते तुम्ही डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून घेऊ शकता.