OBC विद्यार्थ्यांना 60 हजार रु, करा अर्ज | Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2024

By Shubham Pawar

Published on:

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो OBC विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 60 हजार रुपये स्कॉलरशिप देण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत ही स्कॉलरशिप मिळणार आहे, याच योजनेअंतर्गत आपण सविस्तर अशी माहिती या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत राबविण्यात येणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाच्या धर्तीवर इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana सुरु करण्यास मा मंत्रिमंडळाने दि. 19.10.2023 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2024

विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती वसतिगृह व वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयंम अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच यापुढे प्रस्तावित करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये एकसमानता रहावी यासाठी ही योजना आहे.

भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून, आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योजना लागू करण्यात आली आहे. विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा 600 या प्रमाणे एकूण 21,600 विद्यार्थ्यांकरिता “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” (Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana ) राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana

 

Overviews of Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana

योजनेचे नाव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना
सुरवात महाराष्ट्र शासन
विभाग इतर मागास बहुजन विकास महामंडळ
लाभार्थी OBC मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी
उद्देश विद्यार्थ्यांना आर्थिक मदत
मिळणारी आर्थिक मदत प्रत्येक वर्षी 60,000/- रु.
अर्ज करण्याची पद्धत  Online
योजनेची अधिकृत वेबसाइट mahadbt.maharashtra.gov.in

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना पात्रता

 1. विद्यार्थी वसतीगृह प्रवेशास पात्र असावा.
 2. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
 3. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल.
 4. अनाथ प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिका-याचे अनाथ प्रमाणपत्र आनिवार्य आहे.
 5. दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
 6. विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख पेक्षा जास्त नसावे, तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील.
 7. विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील.
 8. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.

 

ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना शैक्षणिक निकष

 1.  सदरचा विद्यार्थी 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
 2. व्यवसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांस सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान 60 टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन / CGPA Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana चे गुण असणे आवश्यक राहील.
 3. व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येतील. यासाठी इयत्ता 12 वी च्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल.
 4. सदर योजनेतंर्गत एकूण प्रवेश संख्येच्या 70% जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यर्थ्यांसाठी व 30% जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील.
 5. निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यत लाभास पात्र राहील.
 6. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इ. मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयात / संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांस प्रवेश मिळालेला असावा.
 7. एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
 8. योजनेंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती किमान 75% असावी. तथापि, एखाद्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शहानिशा करून विद्यार्थ्यास देय असलेली रक्कम अदा करण्याबाबत संबंधित सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) कार्यालयाकडून योग्य तो निर्णय घेण्यात यावा.
 9. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परिक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना इतर निकष

 •  योजनेचा लाभ 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल. तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त 5 वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येईल.
 • परंतु, इंजीनिअरिंग / वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त 6 वर्ष अनुज्ञेय असेल, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्याथ्यांचे कमाल वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे.
 • अभ्यासक्रमाच्या मध्यावधी कालावधीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत लाभास पात्र असेल.
 • शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana लाभास पात्र असेल. तथापि, सदर विद्यार्थी योजनेंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा.
 • सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास, अनुत्तीर्ण कालावधीमध्ये योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार नाही. उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी लाभास पुढे पात्र राहील. तथापि, उपरोक्त 5 वर्षाचा कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण व अनुत्तीर्ण असे दोन्ही कालावधींची गणना करण्यात येईल.
 • सदर योजनेतंर्गत सन 2024-25 करिता प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थ्यांना, द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थ्यांना, तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थ्यांना व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थी अशा रितीने प्रति जिल्हा 600 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येईल. तद्नंतर सन 2025-26 पासून व्यवसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश देय राहिल, ज्या पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांस पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षास प्रवेश देय आहे त्याच पदवी अभ्यासक्रमास द्वितीय वर्षाकरिता प्रवेश देय राहील, उर्वरीत सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्षात प्रवेश देय राहील. त्यासाठी त्या त्या वेळी स्वतंत्रपणे जिल्हा सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) यांच्याकडे शासन परिपत्रक क्र.वगृयो-2023/प्र.क्र.12/योजना-5, दि.13.03.2023 मधील विहित नमुन्यात प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल.
 • विद्यार्थ्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या, आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा. तसेच, ज्या विद्यार्थ्यांस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे त्यास सदर योजनेचा लाग अनुज्ञेय नसेल.
 • विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.
 • विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी सदर योजनेमध्ये फसवणुक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहतील. तसेच योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांने शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न करता लाभ घेणे, शिक्षण न घेता नोकरी / व्यवसाय करुन या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यावर देखील असा विद्यार्थी कारवाईस पात्र राहील व दिलेल्या रकमेची व्याजासह वसुली करण्यात येईल.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana document list

 • भाडयाने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी).
 • स्वयंघोषणापत्र (दिलेली माहिती खरी व अचुक असल्याबाबत) कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला. नसल्याबाबतचे शपथपत्र.
 • भाडयाने राहत असल्याबाबतचे भाडे चिट्ठी व भाडे करारपत्र / करारनामा.
 • महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Conclusion

मित्रांनो , ह्या पोस्ट मध्ये आम्ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana) या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे की, योजना काय होती, योजनेची पात्रता, योजनेची निकष, कागदपत्रे इत्यादी, मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल.

धन्यवाद !

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.