मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र 2024 | CM Kisan Yojana Maharashtra

By Shubham Pawar

Published on:

CM Kisan Yojana Maharashtra: मित्रांनो, मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र 2024 (CM Kisan Yojana Maharashtra) या योजनेची थोडक्यात माहिती पाहुयात आजच्या ह्या लेखात. तर मित्रांनो, देशातील शेतकर्‍यांचा सन्मान करण्यासाठी, त्यांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात दिनांक 24 फेब्रुवारी 2019 पासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरू केली होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकर्‍यांना 2 हजार रुपयांचे 3 हप्ते याप्रमाणे वार्षिक 6 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येत असते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 12 हप्ते वितरीत करण्यात आले असून, 13 वा हप्ता सुद्धा लवकरच वितरीत करण्यात येणार आहे.

✔️ 13 व्या हप्त्याआधी करा हे महत्त्वाचे काम, तरच मिळेल पीएम किसानचा पुढील हप्ता

CM Kisan Yojana Maharashtra 2024

तर मित्रांनो, आता केंद्र सरकारच्या याच पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा \”मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना\” (CM Kisan Yojana Maharashtra) राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मागे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. राज्याच्या एका मंत्र्यांनी सुद्धा ही योजना सुरू होईल अशी माहिती दिली होती.

CM Kisan Yojana Maharashtra या योजनेच्या अंमलबजावणी करिता लागणार्‍या निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण शेतकर्‍यांना आता केंद्र शासनाचे 6 हजार रुपये आणि राज्य सरकारचे 6 हजार रुपये अशाप्रकारे वार्षिक 12 हजार रुपये मिळू शकतात.

📢 राज्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू 👉 येथे पहा सविस्तर माहिती

हे शेतकरी CM Kisan Yojana Maharashtra साठी पात्र ठरतील

मित्रांनो, मुख्यमंत्री किसान योजना {CM Kisan Yojana Maharashtra} या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकरी पात्र ठरणार आहेत, ज्याप्रमाणे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पात्रता व अटी आहेत, त्याच पात्रता व अटी मुख्यमंत्री किसान योजना (CM Kisan Yojana Maharashtra) योजनेकरिता असणार आहेत.

हे शेतकरी ठरू शकतात अपात्र

मित्रांनो, ज्याप्रमाणे पीएम किसान योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांचे निकष आहेत, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री किसान योजनेचे {CM Kisan Yojana Maharashtra 2024} अपात्रतेचे निकष असू शकतात. तर ते निकष काय आहेत? थोडक्यात जाणून घेऊयात.

  • सर्व संस्थात्मक जमीनधारक
  • संवैधानिक पद धारण करणारे/ केलेले आजी व माजी व्यक्ती.
  • आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/ माजी खासदार/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परीषद सदस्य, आजी/माजी महानगरपालीकेचे महापौर, आजी/माजी जिल्हा परीषदेचे अध्यक्ष.
  • केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/ कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमीत अधिकारी/कर्मचारी. चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
  • सर्व निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रू. 10,000/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे. चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
  • मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती.
  • नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (C.A), वास्तुशास्त्रज्ञ, इ. क्षेत्रातील व्यक्ती.

📽️ मुख्यमंत्री किसान योजना सविस्तर विडिओ  येथे क्लिक करून पहा

राज्यावर आर्थिक बोजा वाढणार

मित्रांनो, केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्रात लागू केली जाणार असल्यामुळे राज्य सरकारला अर्थसंकल्पात 6 हजार 850 कोटींपेक्षा जास्त निधीची तरतूद करावी लागेल.

महाराष्ट्रात लागू होणाऱ्या योजनेचे स्वरूप निश्चित नसले तरी ती पीएम किसान योजनेवर आधारित आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या योजनेत सहभागी असलेल्या राज्यातील 1 कोटी 14 लाख 42 हजार 157 लाभार्थ्यांसाठी ही योजना लागू करत असेल तर एका हफ्त्याच्या वितरणासाठी 2 हजार 288 कोटी 43 लाख 14 हजार रुपयांचा खर्च राज्य सरकारला करावा लागणार आहे.

तसेच तीन हप्त्यांची रक्कम एकत्र केल्यास ती 6 हजार 865 कोटी 29 लाख 42 हजार इतकी होते. त्यामुळे राज्य सरकारला याची तजवीज अर्थसंकल्पात करावी लागेल. आणि एकंदरीत राज्य सरकारवर आर्थिक बोजा वाढेल यात शंका नाही.

तर मित्रांनो, अशाप्रकारे आजच्या ह्या लेखात आपण केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात प्रस्तावित असलेली \”मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना\” (CM Kisan Yojana Maharashtra) थोडक्यात माहिती जाणून घेतली आहे. या योजनेचे पुढे काही अपडेट आल्यास त्याची माहिती तुम्हाला आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून नक्कीच मिळेल, त्यासाठी आमच्या https://marathicorner.com/ वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा !