मुख्यमंत्री फेलोशिप योजना, पगार ७५ हजार महिना | CM Fellowship Maharashtra 2024

By Shubham Pawar

Published on:

CM Fellowship Maharashtra 2024 – मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम युवकांना सरकारचा एक भाग बनण्याची संधी देतो. त्यांचा नाविन्यपूर्ण संकल्पनांची शासनाला मदत होते. त्यांचा उत्साह व तंत्रज्ञानाची आवड यामुळे प्रशासकीय गती वाढते. या कार्यक्रमामुळे मिळालेले ज्ञान व अनुभव यामुळे युवकांचा दृष्टिकोन विस्तारतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CM Fellowship Maharashtra 2024

पात्रता – 
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2024 करीत अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहे :-

 1. उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाचा अंतिम दिनांकास किमान २१ ते कमाल २६ वर्ष या दरम्यान असावे,
  म्हणजे जिचा वाढदिवस 3 मार्च 1997 ते ३ मार्च 2002 दरम्यान येतो अशी व्यक्ती [ दोन्ही दिवस अंतर्भूत
 2.  उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर [ किमान 60 टक्के गुण ] असावा. तथापि , उच्चतम शैक्षणिक अर्जदारास प्राधान्य दिले जाईल.
 3. उमेदवाराकडे किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेली पूर्णवेळ इंटरशिप / अप्रेंटिसशिप / आर्टिकल शिप अनुभवाच्या कार्यकाळाला गणली जाईल. पूर्णवेळ स्वयंरोजगार , स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल.
 4.  मराठी भाषा लिहिता , वाचता व बोलता येणे आवश्यक राहील .हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील .तसेच , संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील. \”CM Fellowship Maharashtra 2024\”

अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा 

मुख्यमंत्री फेलोशिपचे स्वरूप

 1. फेलोशिपचा कार्यकाळ फेलो म्हणून रुजू झाल्याच्या दिनांकापासून १२ महिने राहील. सर्व अर्जदार विद्यार्थी ज्यांची निवड करण्यात आली आहे त्यांचा रुजू होण्याचा दिवस एकाच राहील व त्या दिवशी निद्रेशीत ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे विद्यार्थ्यांवर बंधन असेल.
 2. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विशिष्ट शासनाच्या विशिष्ट प्राधिकरणावर नेमणूक करण्यात येईल. या प्राधिकरणामध्ये जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी , आयुक्त , शासनाचे सचिव , महामंडळाचे कार्यकारी संचालक किंवा इतर वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यलयांचा समावेश असेल.
 3. प्राधिकरणावरील नेमणुकीचा निर्णय अर्थ व सांख्यिकी संचालनया मार्फत घेतला जाईल विद्यार्थाना प्राधिकरण निवडीचा अधिकार नसेल.
 4. नेमणूक केलेल्या कार्यालयाच्या मुख्य अधिकाराच्या मार्गदर्शनाखाली ,संबंधित प्राधिकरणाचे काम अधिक प्रभावी व्हावे यासाठी विद्यार्थी काम करतील यालाच फिल्ड वर्क असे म्हणतात.
 5. फिल्ड वर्क सोबतच आयआयटी , मुंबई किंवा आयआयएम , नागपूर यांनी तयार केलेला विशेष अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन विद्यार्थ्यांवर असेल. प्रत्येक विद्यार्थी साठी यापैकी एका शैक्षणिक संस्थेची निवड करण्याचे अधिकार अर्थ व सांख्यिकी संचालनालयास असतील. विद्यार्थी शैक्षणिक संस्था निवडीचा अधिकार नसेल.
 6. फिल्ड वर्क व अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थनाचं फेलोशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळेल.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबविली जाईल.
निवड प्रक्रियेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :-

टप्पा १
भाग १ : ऑनलाईन परीक्षा
भाग २ : सर्वाधिक गुणांच्या आधारे टप्पा 2 साठी 210 उमेदवार ची यादी शॉर्टलिस्ट करणे

टप्पा २
भाग १ : शॉर्टलिस्ट केले उमेदवार निबंध अपलोड करतील
भाग २ : मुलाखत [ शॉर्टलिस्ट केलेल्या व निंबध सादर केलेल्या उमेदवारांसाठी लागू ]
भाग ३ : अंतिम निवड केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करणे

ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप :-

बहुविविध पर्याय असलेले वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न

माध्यम :-

परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल व जेथे व्यवहार्य असेल तेथे प्रश्न व पर्यायी उत्तराचे मराठीत भाषांतर पुरविले जाईल.

एकूण गुण :- 100 प्रत्येक प्रश्नास 1 गुण कालावधी :- 60 मिनिटे

मुख्यमंत्री फेलोशिप योजना

टप्पा 2 साठी उमेदवार शॉर्टलीस्ट करणे

एकूण गुण 100 पैकी राहतील सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या 210 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल शॉर्टलीस्ट केलेले उमेदवार 3 निबंध लिखित स्वरुपात सादर करतील. निबंध मराठी , हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असू शकतात निबंधाचे विषय उमेदवारांना इमेल व संकेतस्थळाद्वारे कळविले जातील सर्व ३ निबंध सादर करणाऱ्या शॉर्टलीस्ट केलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलाविले जाईल . सर्व 3 निबंध अपलोड न करणारे शॉर्टलीस्ट झालेले उमेदवार मुलाखतीस पात्र राहणार नाहीत.

अंतिम निवड

उमेदवारांच्या अंतिम निवडीकरीता खालीलप्रमाणे गुणांकन पद्धत वापरली जाईल . ऑनलाईन चाचणीचे 100 पैकी गुण 15 पैकी गुणांमध्ये रुपांतरीत करुन + निबंध 30 गुण + मुलाखत 50 गुण + पदव्युत्तर पदवी किंवा व्यावसायिक पदवी 5 गुण निवड झालेल्या 60 उमेदवारांची यादी व 15 उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल निवड झालेल्या उमेदवारांनी विहित मुदतीत ऑफर लेटर स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे निर्माण होणारी रिक्त पदे प्रतिक्षा यादीतील उमेदवारांमधून भरण्यात येतील. \”CM Fellowship Maharashtra 2023\”

कृपया नोंद घ्या

मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांस आपल्यासोबत सर्व गुणपत्रिका , अनुभवाची प्रमाणपत्र , ओळखपत्र व इतर संबंधित कागदपत्रांची मूळ प्रत व नक्कल आणणे आवश्यक आहे.

मुलाखतीस पात्र उमेदवारास मुलाखतीचा दिवस व वेळ इमेल द्वारे कळविण्यात येईल. मुलाखतीस हजर राहण्यासाठी प्रवासखर्च किंवा इतर कोणताही खर्च देण्यात येणार नाही . CM Fellowship Maharashtra 2024

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment