छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार | Chhatrapati Shivaji Maharaj karj mafi Yojana Maharashtra 2023

By Shubham Pawar

Updated on:

Chhatrapati Shivaji Maharaj karj mafi Yojana Maharashtra 2023 – छत्रपती शिवाजी महाराज’ योजनेतील कर्जमाफी मिळणार. “छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’चे पोर्टल सुरू करून कर्जमाफीला पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली जाईल. या शेतकऱ्यांना लवकरच लाभ दिला जाईल,” अशी माहिती सहकारमंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली.

Chhatrapati Shivaji Maharaj karj mafi Yojana

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे तरतूद करून घेण्याबाबत सहकार विभाग आग्रही होता. मात्र, त्यावेळीही तरतूद झाली नव्हती. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यवतमाळ जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने‘ अंतर्गत पात्र ठरलेल्या एक लाख 28 हजार 464 शेतकऱ्यांना कर्जमाफीचे 389 कोटी 65 लाख रुपये अद्याप मिळाले नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. तसेच 90 टक्के शेतकऱ्यांना अद्यापही प्रोत्साहन अनुदान मिळाले नसल्याचाही मुद्दा उपस्थित केला. यावर यवतमाळमधील 34 हजार 118 शेतकन्यांना 65 कोटी 34 लाख रुपयांची कर्जमाफी दिल्याचे सावे यांनी उत्तरात सांगितले. Chhatrapati Shivaji Maharaj karj mafi Yojana Maharashtra 2023

मागील दोन वर्षांपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’चे पोर्टल बंद होते. त्यामुळे या शेतकन्यांना लाभ मिळाला नाही. या योजनेची तीन भागांत विभागणी केली आहे. दीड लाखांची कर्जमाफी, वन टाइम सेटलमेंट आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार होते. या योजनेतील एक लाख 781 शेतकऱ्यांना 2038 कोटीची कर्जमाफी, वन टाइम सेटलमेंटमध्ये नऊ हजार 935 शेतकऱ्यांना 107 कोटी, प्रोत्साहन अनुदानांतर्गत 65 कोटी रुपये दिले आहेत.

पोर्टल बंद असल्याने निधी उपलब्ध झाला नाही. एप्रिलमध्ये पोर्टल सुरू केले जाईल, तरीही 55 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अर्थसंकल्पामध्ये 800 कोटींचा निधी देण्यात येईल. प्रोत्साहन अनुदानासाठी एक हजार कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे 31 मार्चपूर्वी 98 टक्के शेतकन्यांना अनुदान देण्यात येईल.

छत्रपती शिवाजी महाराज योजना

राष्ट्रवादीचे गटनेते एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत, मात्र, इतर गोष्टीसाठी पैसे आहेत. समृद्धी महामार्गाचे 1600 कोटी रुपयांची रॉयल्टी जर सरकारला माफ करता येत असेल तर शेतकऱ्यांसाठी पैसे का देता येत नाहीत असा प्रश्न विचारला.

विरोधी पक्षनेते दानवे यांनी संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा आढावा घेऊन वंचित शेतकऱ्यांना लाभ देणार का? अशी मागणी केली. यावर सावे यांनी लवकरच हे पोर्टल सुरू करण्यात येऊन शेतकऱ्यांची यादी तयार करून शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल, अशी घोषणा केली. या विषयावर अन्य सदस्यांनीही प्रश्न उपस्थित केल्यानंतर सभापती नीलम गो-हे यांनी या विषयाबाबत बैठक घ्या, असे निर्देश सावे यांना दिले.

2022-23च्या कर्जवसुलीसाठी सोसायट्या आणि बँकांनी तगादा लावल्याचा मुदा अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. “आमच्या काळात जाहीर केलेले प्रोत्साहन अनुदान लवकर देऊ, अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र, 22-23 च्या कर्जवसुलीसाठी सोसायट्यांनी तगादा लावला आहे. अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान चालू खात्यावर द्यावे, अशी मागणी पवार यांनी केली. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मिशन मोडवर अनुदान देण्यात येईल, असे सांगितले.

I am a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 6 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!