अमृत आहार योजना महाराष्ट्र | APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana

By Shubham Pawar

Published on:

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana: अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक (Calories) व प्रथिनांच्या (Proteins) कमतरतेमुळे स्त्रियां मध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त असून आदिवासी समाजामध्ये याचे प्रमाण ३३.१ टक्के एवढे आहे. आदिवासी स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजन वाढीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा परिणाम बाळाच्या वजनावर होऊन कमी वजनाची बालके जन्माला येतात, असे अनेक संशोधन व अभ्यासावरुन सिध्द झाले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तसेच बालक जन्मानंतर पहिले तीन महिने पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्यामुळे या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले राहणे आवश्यक आहे. अपुरा आहार आणि गर्भावस्थेत घ्यावयाची काळजी याबाबत आदिवासी समाजामध्ये आवश्यक जागरुकता दिसून येत नाही. शेवटच्या तिमाहीमध्ये बाळाचा विकास व वाढ होत असते अशा कालावधीत सुध्दा गर्भवती स्त्रिया श्रमाची कामे करीत असतात.

त्या कालावधीत त्यांना अतिरिक्त आहार आणि विश्रांतीची गरज असते. मा. राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना अतिरिक्त पुरक आहार देण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार दि. २४ जुलै,२०१५ च्या पत्रान्वये आदिवासी समाजाला लाभ होईल अशी योजना कार्यान्वित करीत असताना

ग्रामसभा व विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून सामाजिक लेखा परिक्षण करण्यात यावे, असेसुध्दा निर्देश मा. राज्यपाल महोदयांनी दिले. या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने अनुसूचित क्षेत्रातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्याची योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana

 1. अनुसूचित क्षेत्रांतर्गत अंगणवाडी/मिनी अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना आहारातून उष्मांक व प्रथिनांची उपलब्धता होण्यासाठी एक वेळ चौरस आहार देण्याच्या योजनेला या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
 2. मुलांविषयीच्या अतिव प्रेमातून भारताचे माजी राष्ट्रपती मा.डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी मुलांमध्ये चेतना निर्माण करण्याचे काम केले आहे. त्या दृष्टीकोनातून या योजनेचे नामकरण “भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना\” असे करण्यात येत आहे.
 3. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार उपलब्ध करुन देण्याची योजना आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली व एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या माध्यमातून राबविण्यात येईल.
 4. या योजनेअंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील लाभार्थीना दिनांक १ डिसेंबर,२०१५ पासून आहार देण्यात यावा.
 5. योजनेअंतर्गत गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिन्याच्या कालावधीकरिता एक वेळचा चौरस आहार देण्यात येईल.
 6. भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यातील ८५ एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत परिशिष्ट – अ मध्ये दर्शविलेल्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येईल.
 7. आहाराचा दर्जा, किंमत व पोषण मुल्ये ही शासन निर्णयातील परिशिष्ट-ब प्रमाणे राहतील व प्रति लाभार्थी चौरस आहाराचा सरासरी खर्च रु.२५/- एवढा राहील.
 8. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना घरी घेऊन जाण्यासाठी आहार (THR) देण्यात येतो. अनुसुचित क्षेत्रांतर्गत १६ जिह्यातील ८५ प्रकल्पासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत ज्या महिला लाभार्थ्यांना एक वेळचा पुर्ण आहार देण्यात येणार असल्याने या क्षेत्रातील संबंधित लाभार्थ्यांना टीएचआर (THR) देण्याची आवश्यकता राहणार नाही.
 9. भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार
  योजनेसाठी केंद्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील टीएचआरसाठीचा निधी (केंद्र व राज्य हिस्सा) १६ आदिवासी जिल्हयातील ८५ एकात्मिक बालविकास प्रकल्पांकरीता वापरण्यात यावा. त्यासाठी मार्गदर्शक सूचना आयुक्त, एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांनी स्वतंत्रपणे निर्गमित कराव्यात. \’Amrut Aahar Yojana Maharashtra\’

अमृत आहार योजना निधी नियोजन

 • भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजने अंतर्गत अनुसूचित क्षेत्रांतर्गत अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार पुरविण्यात येणार आहे.
 • योजनेसाठी आवश्यक निधी आदिवासी उपयोजना व केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतून टीएचआरचा (THR) केंद्र व राज्य हिस्सा उपलब्ध करुन घ्यावा.
 • त्यानुषंगाने या योजनेसाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेंतर्गत आवश्यक तरतूद जिल्हानिहाय सर्वेक्षित लाभार्थ्यांच्या यादीनुसार उप मुख्य कार्यकारी अधिकारी, बाल कल्याण, जिल्हा परिषद व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेतून नियतव्ययाची मागणी करावी.
 • योजनेसाठी अतिरिक्त तरतुदीची आवश्यकता भासल्यास राज्यस्तरावरुन आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा यांना निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
 • जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावर आवश्यक तरतुदीचे नियोजन व संनियंत्रण करण्याची जबाबदारी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा यांची राहील. Amrut Aahar Yojana in Marathi

Amrut Aahar Yojana

योजनेचे नाव अमृत आहार योजना महाराष्ट्र
लाभार्थी गरोदर स्त्रिया व स्तनदा मातां करिता
लाँच केलेले महाराष्ट्र शासन
उद्देश गंभीर समस्यांवर मात

अमृत आहार योजना उद्देश व अटी

खालील प्रमाणे उद्देश व योजनेच्या प्रमुख अटी दिलेल्या आहे.

उद्देश:-
राज्याच्या अनुसूचित क्षेत्र व अतिरीक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत कुपोषण, बालमृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे यांसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी गरोदर स्त्रिया व स्तनदा मातां करिता भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यात येते.

योजनेच्या प्रमुख अटी :
अनुसूचित क्षेत्र व अतिरीक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिन्यांच्या कालावधी करीता एक वेळचा आहार देणे.

 

अमृत आहार योजना कागदपत्रे व लाभ

आवश्यक कागदपत्रे :

 • अंगणवाडी/ मिनी अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी झालेली प्रत्येक गरोदर स्त्री व स्तनदा माता यांची पडताळणी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या नोंदणी नुसार करण्यात यावी.
 • या योजनेच्या टप्पा-2 अंतर्गत 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील सर्व लाभार्थी बालकांची नोंद अंगणवाडी सेविकेने स्वतंत्र नोंदवही करून नियमितपणे नोंद करावी.

लाभाचे स्वरूप असे :
अंगणवाडी/ मिनी अंगणवाडीकरीता नियुक्त केलेल्या समितीमार्फत एक वेळच्या पूर्ण चौरस आहारामध्ये – चपाती / भाकरी, भात, कडधान्ये-डाळ, सोया दुध (साखरेसह), शेगंदाणा लाडू, (साखरेसह), अंडी / केळी / नाचणी हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गुळ / साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला आदींचा समावेश आहे. \’Dr APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana

 

 

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment