राज्य सरकारकडून नागरिकांना सेवा देण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य सरकारच्या तब्बल 1000 सेवा आता नागरिकांना त्यांच्या व्हाट्सअप वरती मिळणार आहेत. सरकारच्या विविध शासकीय सेवा, दाखले, प्रमाणपत्र इत्यादीसाठी आता शासकीय कार्यालयाचे उंबरे झिजवण्याची गरज भासणार नाही.
आपले सरकार व इतर वेबसाईटवर जवळपास 1000+ सेवा नागरिकांना आता व्हाट्सअपवर मिळणार आहेत. या नवीन सुविधामुळे महाराष्ट्रात आता व्हाट्सअप डिजिटल क्रांतीला सुरुवात जाणार आहे.
व्हाट्सअपवर 1,000+ सेवा
सामान्य नागरिकांसाठी नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या 500 सेवा राज्य शासनाकडून आपले सरकार पोर्टलवर काही दिवसापूर्वी सुरू करण्यात आलेल्या होत्या. या सेवा नागरिकांना व्हाट्सअपच्या माध्यमातून मिळण्यासाठी शासनाकडून नवीन पाऊल उचलण्यात आल आहे.
आता चॅटबॉटच्या माध्यमातून जनसामान्य नागरिकांना विविध विभागाच्या 1000+ सेवा शासनाकडून दिल्या जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली. चॅटबॉट मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल.
कोणत्या सेवा मिळणार
- वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- तात्पुरता रहिवाशी दाखला
- ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
- सांस्कृतिक कार्यक्रम परवाना
- शेतकरी असल्याचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रात
- जातीचा दाखला
- जन्म-मृत्यू प्रमाणपत्र
- विवाह नोंदणी प्रमाणपत्र
- दुकान आस्थापना नोंदणी
- दारिद्र्यरेषेखाली असल्याचा दाखला
- कारखाना नोंदणी
- दस्त नोंदणी
- मोटार नोंदणी
- सहकारी संस्थांची नोंदणी
- ध्वनीक्षेपण परवाना
- सभा-संमेलन परवाना
वरील नमूद विविध सेवा व्यतिरिक्त शासनाच्या अश्या 1000 सुविधा घरबसल्या नागरिकांना त्यांच्या मोबाईलमधून व्हाट्सअप ॲपच्या माध्यमातून वापरता येणार आहेत.
तक्रार निवारण ऑनलाईन
राज्य सरकारकडून, महामंडळाकडून, महानगरपालिका किंवा ग्राम पंचायतीकडून कागदपत्रे मिळवायची आहेत, तक्रार दाखल करायची आहे, बस तिकीट बूक करायचे आहे किंवा एखाद्या कामाचा पाठपुरावा करायचा आहे.
तर आता कार्यालयाच्या चकरा मारायची गरज नाही. फक्त सरकारच्या एका विशिष्ट मोबाईल क्रमांकावर मेसेज करा आणि तुमच काम पूर्ण होईल.
ही सुविधा कशी वापरावी ?
ज्या व्यक्तीला व्हाट्सअप वापरता येत असेल, अशा सर्व व्यक्तींना या विविध सेवांचा लाभ घेता येईल. यासाठी शासनाकडून देण्यात आलेला विविध विभागांचा विशिष्ट क्रमांक मिळवायचा आहे.
त्यानंतर त्या क्रमांकावर Hi असा मेसेज केल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल. पुढील Instructions चा वापर करून सर्व सेवा कागदपत्रे व्हाट्सअप वर डाऊनलोड करू शकतात.
उदा. 9013151515 या क्रमांकावर व्हाट्सअपवरून मेसेज केल्यानंतर तुम्हाला 10वी, 12वी मार्कशीट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, गाडीच RC बूक इत्यादी सर्व कागदपत्र व्हाट्सअपवर डाऊनलोड करता येईल.