आणीबाणी पेन्शन योजना यांना मिळणार 10,000 रू. मानधन | Aanibani Pension Yojana

Aanibani Pension Yojana – आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे दिनांक 25.06.1975 ते दिनांक 31.03.1977  या कालावधीत घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करणेबाबतचे धोरण शासन निर्णय दिनांक 03/07/2018 अन्वये निश्चित करण्यात आले होते. या धोरणांतर्गत पात्र व्यक्तींना मानधन वितरीत करण्यात आले.

Aanibani Pension Yojana

कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे सन 2020 – 21 या वित्तीय वर्षात राज्याची कर व करेत्तर उत्पन्नातील अपेक्षित महसुली घट व त्याचे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम विचारात घेवून सन 1975 – 77 या आणिबाणीच्या कालावधीत लढा देणाऱ्या व्यक्तीचा सन्मान / यथोचित गौरव करण्यासंबंधी धोरण” या कार्यक्रमाची अंमलबजावणी बंद करण्याचा निर्णय संदर्भाधीन क्र. 3 वरील दिनांक 31 जुलै, 2020 च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला. तसेच संदर्भाधीन क्र. 4 वरील दिनांक 16/09/2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रलंबित थकबाकीचे प्रदान करण्यात आले. {Aanibani Pension Yojana}

आणिबाणी कालावधीत लढा दिलेल्या व्यक्तींचा सन्मान / गौरव करावयाची बंद करण्यात आलेली योजना पुन्हा सुरु करण्याची विनंती मा. लोकप्रतिनिधींनी शासनास केलेली आहे. त्याअनुषंगाने सदर योजना सुरु करण्याबाबत मा. मंत्रिमंडळाने दिनांक 14 जुलै, 2020 रोजीच्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार सदर योजना नव्याने सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. “Aanibani Pension Yojana”

आणीबाणी पेन्शन योजना

  1. “सन 1975 ते 1977 मधील आणीबाणीच्या कालावधीत लढा देण्या-या व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्यासाठी सुरु केलेली योजना जी दिनांक 31 जुलै, 2020 रोजी बंद करण्यात आलेली होती ती योजना नव्याने सुरु करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
  2. सदर योजनेची अंमलबजावणी ही दिनांक 1 ऑगस्ट, 2022 पासून करण्यात यावी. त्याअनुषंगाने ज्या व्यक्तींना यापूर्वी मानधन मंजूर करण्यात आले होते त्यांना ऑगस्ट, 2022 पासून मानधन देय राहील. तसेच दिनांक 3 जुलै, 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये राबविलेल्या योजनेंतर्गत मानधन देय केलेल्या लाभार्थीना योजना बंद झाल्याच्या कालावधीपासूनची थकबाकी अनुज्ञेय राहील. यापूर्वी प्राप्त / मंजूर /प्रलंबित अर्ज, दि. 31/07/2022 ते आजवर मानधन धारकाची संख्या, ज्यांना थकबाकी अदा करावयाची आहे त्याची माहिती या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्र- “अ” मध्ये जिल्हाधिकारी यांनी उपलब्ध करुन दयावी.
  3. आणिबाणीच्या लढ्यामध्ये सहभाग घेतलेल्या व्यक्ती ज्यांनी यापूर्वी अर्ज केला नाही त्यांनी संदर्भाधीन दिनांक 3 जुलै, 2018 च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या परिशिष्टातील शपथपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांकडे नव्याने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 31/10/2022 असा राहिल. त्यामुळे नवीन अर्ज या दिनांकापर्यंत सादर करण्याची दक्षता अर्जदारांनी घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाने निदर्शनास आणून द्यावे. या योजनांतर्गत मानधन मंजूर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना असतील. संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून नव्याने मानधन मंजूर झालेल्या व्यक्तींची यादी शासनाकडे सादर करावी. सदर यादीनुसार शासनाद्वारे संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयास निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. [Aanibani Pension Yojana]
  4. या योजनेंतर्गत आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तीना पूर्वीप्रमाणेच मासिक रु.10,000/- व त्यांच्या पश्च्यात त्यांच्या पत्नीस / पतीस रु.5,000/- मानधन देण्यात येईल. तर, एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक रु.5,000/- तर त्यांच्या पश्च्यात त्यांच्या पत्नीस / पतीस रु.2,500/- मानधन अनुज्ञेय राहील.
  5. सदर धोरणांतर्गत लाभार्थी/जोडीदार हयात असेपर्यंत मानधनास पात्र राहतील. तद्नंतर वारसदार सदर मानधनास पात्र ठरणार नाहीत.
  6. सदर शासन निर्णय हा वित्त विभागाच्या अनौ.सं.क्र.396/व्यय-4/2022, दि. 13/7/2022 अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीने व दिनांक 14 जुलै 2022 रोजी मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. (Aanibani Pension Yojana)

अर्ज डाऊनलोड करा – येथे क्लिक करा 

आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तीना मासिक किती मानधन अनुज्ञेय राहील?

आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तीना मासिक रु.10,000/- व त्यांच्या पश्च्यात त्यांच्या पत्नीस / पतीस रु.5,000/- मानधन देण्यात येईल.

एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक किती मानधन अनुज्ञेय राहील.?

एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक रु.5,000/- तर त्यांच्या पश्च्यात त्यांच्या पत्नीस / पतीस रु.2,500/- मानधन अनुज्ञेय राहील.

Leave a Comment

close button