Sharad Pawar Inspire Fellowship – \’शरद पवार इन्स्पायर फेलोशिप\’ साठी अर्ज करा. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहवचंद्र दर्शननिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
Sharad Pawar Inspire Fellowship Online Application Form
कृषी, साहित्य, शिक्षण क्षेत्रातील तरुणांना संधी कृषी साहित्य आणिशिक्षण यासाठी 12 ऑक्टोंबर अर्ज पाठवता येणार आहेत.
महाराष्ट्रातील होतकरू, गुणवंत आणि नव्याने काही करू पाहणाऱ्या तरुण – तरुणींना संधीचे नवे अवकाश खुले करुन देण्यासाठी ही फेलोशिप देण्यात येते. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या दुसऱ्या वर्षाच्या फेलोशिपची घोषणा करण्यात आली.
भविष्य काळातील नेतृत्व तयार करणे हा या फेलोशिपमागील उद्देश असल्याचे सुळे यांनी सांगितले. या वेळी मुख्य समन्वयक विवेक सावंत, निलेश नलावडे, प्रा. नितीन रिंढे उपस्थित होते. शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी अर्ज करण्यास www.sharadpawarfellowship.com या वेबसाइटला भेट द्यावी. कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी कृषी पदवीधारक विद्यार्थी पात्र असतील. \”Sharad Pawar Inspire Fellowship\”
आलेल्या प्रस्तावांची तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 13 ऑक्टोंबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत तपासणी होऊन निवड प्रक्रिया पूर्ण होईल.
निवड समितीच्या वतीने \”शरद पवार इन्स्पायर फेलोशीप इन एग्रीकल्चर साठी 80 शरदचंद्र पवार साहित्य फेलोशिपसाठी 10 अशा तर शरदचंद्र पवार शिक्षण फेलोशीप साठी 40 अशा एकूण १३० लगी निवड केली जाणार आहे.
निवडीची घोषणा दिनांक 11 नोव्हेंबर रोजी केली जाईल. कार्यशाळा, क्षेत्रभेट आणि अहवाल अशा तीन टप्प्यांत फेलोना काम करावे लागणार आहे.