Bal Sangopan Yojana Maharashtra 2024:-शासनाची बाल संगोपन योजना ज्या मुलांना आई किंवा वडील नसतील व ज्या मुलांना आई व वडील दोन्ही हीनसतील अशा बालकांना या योजनेचा लाभ मिळतो ० ते १८ वयोगटातील बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतो. एका कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांना ही लाभ दिला जातो.
किती रक्कम मिळते ?
एका मुलांसाठी ११०० रुपये प्रतिमहिना ( एका वर्षाला *१३२००/- रु मिळतात वय १८ पुर्ण होई पर्यत दर महिन्याला रक्कम मिळते.
Bal Sangopan Yojana Maharashtra 2024
कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत…?
१)योजने साठी करावयाचा अर्ज व अर्जा सोबत
२)आधार कार्ड च्या झेराँक्स पालकांचे व बालकांचे
३)शाळेचे बोनाफाईड सर्टफिकेट
४)तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला.
५) पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र .(मृत्युचा दाखला)
६) पालकाचा रहिवासी दाखला.
७) मुलांचे बॅक पासबुक झेराँक्स.
८) मृत्यूचा अहवाल.
९) रेशन कार्ड झेराँक्स .
१०) घरा समोर पालका सोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड मापाचा फोटो ( प्रत्येक मुलासोबत पालकाचा शेफरेट फोटो )
१०)मुलांचे पासपोर्ट फोटो 2
११)पालकाचे पासपोर्ट फोटो
सदर सर्व कागद पत्रांची पुर्तता करुन अर्ज करता येतो .Bal Sangopan Yojana
Bal Sangopan Yojana Maharashtra
ही योजना मंजूर कोण करते ?
- हा अर्ज मंजूर करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी बाल कल्याण समितीकडे सादर केला जातो व ती समिती अर्ज मंजुर करते.
- जिल्हा परिषद शाळेत व महाविदयालय शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला बोनाफाईट आत्ताच शाळेतून काढून ठेवावा
- या योजनेचा लाभ घ्या व १८ वर्षापर्यंत बालकांच्या शिक्षणाच्या खर्चा साठी चिंता मुक्त व्हा.
सदर योजना अनेक वर्षा पासुन चालु आहे .पण अनेक पालकांना ही योजना माहीत नाही म्हणुन आपण हा मेसेस इतर नंबर व ग्रुप वर सामाजिक भुमिकेतुन पाठवावा 🙏 व अनेक निराधार ,गरजु बालकांना या योजनेचा लाभ घेता येईल
GR शासन निर्णय – येथे पहा
अधिक माहीती साठी
संस्था सचिव / बालगृह व्यवस्थापक
साहेब, पालकाचे आणि पाल्याचे बँक खाते जॉईंट अकाउंट असेल तर चालते का.
बालसंगोपन अर्ज कुठे सबमिट केला जातो
मृत्यू अहवाल म्हणजे नेमके काय