बांधकाम कामगारांना आनंदाची बातमी ! नवीन नोंदणी अशी काढा ऑनलाईन पावती/नूतनीकरण, पेमेंट करायची गरज नाही

By Marathi Corner

Published on:

शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून राज्यातील सर्व बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे. आता बांधकाम कामगाराच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क कामगारांकडून आकारला जाणार नाही.

शासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे खेड्यापाड्यातील गोरगरीब दारिद्र्यरेषेखालील कामगारांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. या संदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय काही दिवसापूर्वी संबंधित विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे.

काय आहे बांधकाम कामगार योजना ?

आपण आपल्या आजूबाजूला किंवा तालुकास्तरावर मोठ मोठ्या इमारती बघितलेल्या असतील. या सर्व मोठ्या मोठ्या इमारती गोरगरीब व काबाडकष्ट करणाऱ्या बांधकाम कामगाराच्या कष्टातून उभ्या केलेल्या असतात. अशा बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून विविध योजना राबविण्यात येतात.

या विविध योजनांनाच बांधकाम कामगार योजना या नावाने ओळखलं जातं. यामध्ये विशेषता कामगाराच्या कुटुंबातील लहान मुलाच्या शिक्षणापासून ते कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या आरोग्यापर्यंत अनेक फायदे शासनाकडून दिले जातात.

नवीन नोंदणी/नूतनीकरण

खेड्यापाड्यातील कामगारांना बऱ्याच वेळी माहिती नसते की, नोंदणी कशी करावी किंवा जुनी नोंदणी असेल तर रिन्यू कशी करावी ? सगळ्यात मोठा गैरसमज असतो की, यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे लागतील सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतील.

या सर्व बाबींचा विचार करून शासनाकडून या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आलेले आहे. ज्यामुळे तुम्ही घरी बसून मोबाईलवरून नवीन नोंदणी आणि नूतनीकरण करू शकता. विशेष म्हणजे शासनाकडून आता यासाठी एकही रुपयाचा खर्च ठेवण्यात आलेला नाही.

कामगार योजना का महत्त्वाची आहे ?

शासनाकडून सुरू करण्यात आलेली ही योजना बांधकाम कामगारांसाठी मोठा आधार आहे. कारण यामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विविध कामगारांसाठी विशेष योजनांची तरतूद करण्यात आली आहे. जशाप्रकारे गवंडी काम, बिगारी काम, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशन, प्लंबर, सुतारकाम किंवा बांधकामाच्या जागेवर दुसरा कोणताही काम असेल.

1. सर्वप्रथम मुलांच्या शिक्षणासाठी बांधकाम कामगार योजना अत्यंत महत्त्वाची आहे. कारण पहिलीपासून ते पदवी, इंजीनियरिंग, मेडिकलच्या शिक्षणापर्यंत हजारो रुपयांची मदत शासनाकडून केली जाते.

2. गंभीर आजारपणात किंवा अपघातात वैद्यकीय खर्चासाठी बांधकाम कामगार योजना आरोग्यवर्धिनी प्रमाणे काम करते.

3. बांधकाम कामगाराच्या कुटुंबातील मुला मुलींच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य संबंधित विभागाकडून दिलं जातं.

4. अवजार खरेदीसाठी, घर बांधकामासाठी, साठ वर्षे झाल्यानंतर दरमहा पेन्शनचा आधार अशा विविध बाबींचा समावेश बांधकाम कामगार योजनेत करण्यात आलेला आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • कामगारांचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 90 दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र
  • स्वतःच्या सहीच्या नमुना
  • मोबाईल क्रमांक

ऑनलाईन नोंदणी कशी करावी ?

  • शासनाकडून देण्यात आलेल्या अधिकृत mahabocw.in या वेबसाईटला भेट द्या.
  • महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाची वेबसाईट उघडल्यानंतर त्याठिकाणी ‘बांधकाम कामगार नोंदणी’ नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • तुमचा जिल्हा, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादी आवश्यक माहिती टाकून घ्या. तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवण्यात येईल.
  • त्यानंतर एक अर्ज किंवा फॉर्म तुमच्यासमोर दिसेल त्यामध्ये तुमचं संपूर्ण नाव, तुमचा पत्ता, जन्मतारीख, बँकेची माहिती इत्यादी व्यवस्थित भरून घ्या.
  • वरील विचारण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांना योग्य स्कॅन करून अपलोड करा.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर व कागदपत्र व्यवस्थित अपलोड केल्यावर Submit किंवा अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज यशस्वीरित्या भरला गेल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल ती पावती डाऊनलोड करून प्रिंट काढून ठेवा.

नूतनीकरण (Renewal) कसे करावे ?

नूतनीकरणाचे प्रक्रिया एकदम सोपी आहे यासाठी बांधकाम कामगारांना फक्त चालू वर्षातील 90 दिवस काम केल्याचा प्रमाणपत्र व नोंदणी केलेला जुना नोंदणी क्रमांक लागेल.

  • नूतनीकरणासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत mahabocw.in या वेबसाईटवर जावा.
  • त्यानंतर बांधकाम कामगार नूतनीकरण या पर्यायावर क्लिक करा, त्याठिकाणी तुमचा जुना नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा.
  • तुमची जुनी माहिती त्याठिकाणी दाखवली जाईल त्यामध्ये काही बदल करायचा असेल, तर तुम्ही तो त्याठिकाणी करू शकता.
  • आता पुढील स्टेपमध्ये नवीन 90 दिवसाच्या कामाचा प्रमाणपत्र अपलोड करा, त्यानंतर अर्ज सादर करा.
  • लगेच नूतनीकरणाची पावती मिळवण्यासाठी तुमच्या आधार लिंक मोबाइलवरती ओटीपी पाठवण्यात येईल. तो ओटीपी त्याठिकाणी टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करा.
  • तुमचा अर्ज नूतनीकरण झालेला असेल व संबंधित नूतनीकरणाची पावती डाऊनलोड करून भविष्यकाळातील कामासाठी प्रिंट काढून ठेवा.

शासनाकडून बांधकाम कामगार योजनेमध्ये योग्य ते बदल करण्यात आलेले आहेत, त्यामुळे या सरकारी योजनांचा लाभ घेणे आता एकदम सोपं झालं आहे.

घरबसल्या तुम्ही मोबाईलवरच बांधकाम कामगार योजने संदर्भातील संपूर्ण बाबींचा लाभ घेऊ शकता. यासाठी बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट नक्की चेक करा.

Leave a Comment