नमस्कार मित्रांनो , आज आपण आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप (Aditya Birla capital scholarship) विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला ही स्कॉलरशिप हवी असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात , काय आहे Aditya Birla capital scholarship आणि त्यासाठी काय लागणार आहे, कोण या स्कॉलरशिप साठी पात्र आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही स्कॉलरशिप तुम्हाला कशा प्रकारे मिळू शकते इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
Aditya Birla capital scholarship ही आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन यांच्यातर्फे दिली जाणारी स्कॉलरशिप आहे. इयत्ता पहिली पासून बारावीपर्यंत तसेच पदवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील स्कॉलरशिप मिळते. या स्कॉलरशिपचा उद्देश हा आहे की आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासामध्ये मदत करणे. स्कॉलरशिपची रक्कम 60000 पर्यंत दिली जाते. शाळा महाविद्यालयांचे शुल्क तसेच व इतर शैक्षणिक खर्चासाठी या स्कॉलरशिप चा उपयोग विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी स्कॉलरशिप दिली जाते. Aditya Birla capital scholarship
Aditya Birla Capital Foundation
आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन ही एक नॉन प्रॉफिट कंपनी आहे. आरोग्य सेवा शिक्षण महिला सक्षमीकरण क्रीडा व इतर क्षेत्रांमध्ये हे फाउंडेशन काम करते.
Aditya Birla capital scholarship पात्रता
- मागच्या वर्गामध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण आवश्यक
- वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा जास्त नसावे
- आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड आणि त्यांच्या इतर कंपनीमधील कर्मचाऱ्यांचे मुले मुली पात्र नाहीत.
फायदे
इयत्ता पहिली ते आठवी | 18000 |
इयत्ता नववी ते बारावी | 24000 |
पदवी | 36000 |
आर्थिक मदती सोबतच विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये मदत होईल अशा प्रकारचे मार्गदर्शन देखील दिले जाते. जसे करिअर काउंसलिंग आणि लाईफ स्किल्स सेमिनार. आर्थिक मदत विद्यार्थी त्यांची शैक्षणिक फी, होस्टेल फी, अन्न, इंटरनेट, उपकरणे, पुस्तके, स्टेशनरी, ऑनलाईन लर्निंग इत्यादी गोष्टींसाठी वापरू शकतो.
कागदपत्रे
- पासपोर्ट साईज फोटोग्राफ
- मागील वर्गाचे मार्कशीट
- ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड)
- चालू वर्षांमध्ये ऍडमिशन घेतल्याचा पुरावा ( फी पावती, ॲडमिशन लेटर, शाळा/कॉलेज आयडी कार्ड, बोनाफाईड सर्टिफिकेट)
- बँक अकाउंट पासबुक
- उत्पन्नाचा दाखला
अर्ज कसा करावा
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- तेथे तुम्ही पात्र असलेल्या स्कॉलरशिप साठी Apply Now या बटनावर क्लिक करा.
लॉग इन करा - त्यानंतर तुम्ही आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप 2024-25 साठीच एप्लीकेशन फॉर्म च्या पेजवर पोहोचाल
- स्टार्ट अप्लिकेशन या बटनावर क्लिक करा.
- तुमची संपूर्ण माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- Terms and conditions वर टिक करा आणि एप्लीकेशन पुन्हा एकदा तपासून घ्या.
- तुमची सगळी माहिती बरोबर असेल तर सबमिट बटन वर क्लिक करा.
- तुमचा अप्लिकेशन फॉर्म यशस्वीरित्या पूर्ण होईल.
अर्ज करण्याची मुदत
इयत्ता पहिली ते पदवी पर्यंतच्या सर्व स्कॉलरशिप साठी एप्लीकेशन करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2023 ही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर एप्लीकेशन पूर्ण करावे तसेच आवश्यक कागदपत्रे नसतील तर ती वेळेत काढावीत जेणेकरून तुम्ही मदत संपण्याआधी या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकाल. स्कॉलरशिप चे लेटेस्ट अपडेट व वेळापत्रकासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट देत राहावी. Aditya Birla capital scholarship
निवड कशी होईल?
स्कॉलरशिप साठी निवड ही विविध टप्प्यांमध्ये केली जाईल. विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती व गुण यांच्या आधारावर ही निवड केली जाईल. त्यामधील टप्पे खालील प्रमाणे आहेत.
- विद्यार्थ्यांचे आर्थिक परिस्थिती व गुणानुसार निवड
- कागदपत्रे पडताळणी
- फोनवर घेतलेली मुलाखत
- फाउंडेशन कडून केले जाणारे अंतिम निवड
Conclusion
मित्रांनो , ह्या लेख मध्ये आम्ही आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप (Aditya Birla capital scholarship) या स्कॉलरशिप बद्दल माहिती दिली आहे. ही स्कॉलरशिप इयत्ता पहिली ते पदवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते. साठ हजार रुपयांपर्यंत हे शैक्षणिक स्कॉलरशिप असते. स्कॉलरशिप साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 ही आहे. या स्कॉलरशिप साठी तुमच्या ओळखीतील कोणी विद्यार्थी पात्र असेल तर त्याच्यापर्यंत ही पोस्ट पोहोचवा. मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल. धन्यवाद !
Thanks
For Diploma nursing can apply for scholarship for that Students required and post basic Bsc Students also eligible for scholarship pl replay message
Yes
Basic Bsc