77 व्या स्वातंत्र्यदिनी झालेल्या पंतप्रधानांच्या भाषणामध्ये त्यांनी एका नव्या योजनेची घोषणा केलेली आहे या योजनेचे नाव “लखपती दीदी योजना” Lakhpati Didi Yojana असे आहे. काही राज्यांमध्ये आधीपासून ही योजना अमलात आहे पण आता केंद्र सरकारने दोन करोड लखपती दीदी बनवण्यासाठी ही योजना हाती घेतली आहे. अगदी बँकांपासून अंगणवाड्यांपर्यंत सर्वच क्षेत्रात महिला अग्रणी दिसत आहेत असे नमूद करताना पंतप्रधान म्हणाले की, \”गावांमध्ये बँकांमध्ये काम करणाऱ्या महिला, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवा देणाऱ्या महिला आहेत आणि आता प्रत्येक गावात करोडपती महिला व्हाव्यात, हे त्यांचे स्वप्न आहे. गावांमध्ये दोन कोटी करोडपती भगिनी निर्माण करण्याचे माझे स्वप्न आहे.\”
महिलांना वेगवेगळ्या कौशल्यांचे विकास प्रशिक्षण देणे हे या योजनेचे स्वरूप आहे. या अंतर्गतच त्यांना लघु उद्योग साठी प्रोत्साहन व मदत करणे हे देखील त्यामध्ये समाविष्ट आहे. या विविध कौशल्यांमध्ये प्लंबिंग, एलईडी बल्ब निर्मिती, ड्रोन चालवणे आणि दुरुस्ती करणे अशा प्रकारचे अनेक विविध प्रशिक्षण दिले जाणार आहे.
STEM (Science Technology Engineering and Mathematics) विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रांमध्ये देखील महिला भरीव कामगिरी करत आहेत. महिला नेतृत्व आणि विकासासाठी भारत जे प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नांना स्वतः G20 सुद्धा मान्यता देते. असे पंतप्रधान यांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केले.
लखपती दीदी योजनेचे (Lakhpati Didi Yojana) उद्दिष्ट
या योजनेचा उद्देश हा आहे की बचत गटाशी संलग्न असलेल्या महिलांना लखपती बनवणे.याद्वारे त्या त्यांचे जीवन स्वावलंबीपणे जगू शकतील तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. Lakhpati didi Yojana objective.
लाभधारकांची पात्रता
बचत गटांच्या सदस्य असलेल्या अशा महिला की ज्यांचे वार्षिक उत्पन्न खूपच कमी आहे अशा महिला या योजनेसाठी व प्रशिक्षणासाठी पात्र असतील. पात्र असलेल्या महिलांना योग्य ते प्रशिक्षण दिले जाईल तसेच कर्ज उपलब्ध करून देण्याची देखील सोय या अंतर्गत केली जाणार आहे.
लाभधारकांना मिळणारे फायदे
सर्वात मोठा फायदा या योजनेचा हा असेल की महिलांना लखपती बनवले जाईल. म्हणजेच की त्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षाही वर जाईल. महिलांना लघुउद्योग करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तसेच त्यासाठी लागणारे मार्गदर्शन देखील दिले जाईल. सारांश सांगायचे झाले तर महिलांचे उत्पन्न सुधारेल आणि या योजनेमुळे महिलांचे जीवनमानही उंचावेल.
Conclusion
भारतातील काही राज्यांमध्ये Lakhpati Didi Yojana ही योजना चालू आहे जसं की उत्तराखंड. परंतु केंद्र सरकारकडून केंद्रस्तरावरील संपूर्ण तपशील व अधिक माहिती प्रसिद्ध केले गेलेली नाही. जसे या योजनेविषयी जास्त माहिती प्रकाशित केली जाईल त्यावेळी आम्ही जरूर तुमच्यासाठी सर्व माहिती तपशीलवार घेऊन येऊ. मी आशा करतो की तुम्हाला ही पोस्ट आवडलेली असेल आणि तुम्ही तुमच्या मित्र परिवारामध्ये देखील शेअर कराल. धन्यवाद !