307 Kalam In Marathi – ब्रिटिश राजवटीत १८६२ मध्ये भारतीय दंड संहिता लागू करण्यात आली होती आणि त्यानंतर अनेक वेळा त्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या विभागात महत्त्वपूर्ण बदल झाले. पाकिस्तान आणि बांगलादेशनेही भारतीय दंड संहिता स्वीकारली आहे आणि ती बर्मा, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर आणि ब्रुनेईसह इतर देशांमध्ये लागू केली गेली आहे.
[hide]
307 kalam in marathi
भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 307 मध्ये हत्येचा प्रयत्न समाविष्ट आहे. त्यात असे नमूद केले आहे की, जर कोणी मृत्यूला कारणीभूत ठरेल, या हेतूने किंवा ज्ञानाने कृत्य करेल, तर तो खुनाचा दोषी असेल, त्याला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होईल. या कृत्यामुळे एखाद्याला दुखापत झाल्यास, अपराध्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
जेव्हा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जीवे मारण्यासाठी त्या व्यक्तीच्या शरीरावर धोकादायक शस्त्रानी हल्ला केला आहे. तसेच आरोपीने फिर्यादीच्या पोटात नाभीजवळ चाकूने वार केला असेल तर त्या व्यक्तीला कलम 307 नुसार शिक्षा होऊ शकते. कलम 307 नुसार कधी दोषी ठरवल्या जाऊ शकते
भारतीय दंड संहितेचे कलम 307 नुसार एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवायचं असेल तर आरोपीच्या खून करण्याचा उद्देश होता हे सिद्ध करणे आवश्यक आहे.
कलम 307 अंतर्गत 307 kalam in marathi आरोपीचा हेतू निश्चित करण्यासाठी आरोपीने वापरले गेलेले शस्त्राचे स्वरूप, हल्ला करण्याची पध्दत, हल्ल्याची तीव्रता, शरीराला झालेली ईजा जर एखाद्या प्रकरणात आरोपीकडे धोकादायक शस्त्र होती पण त्यांनी फिर्यादीला फक्त किरकोळ जखमा केल्या.
IPC Section 307 kalam in Marathi
Offense | Punishment |
---|---|
Attempt to murder If such act causes hurt to any person Attempt by life-convict to murder, if hurt is caused | 10 Years + Fine Imprisonment for Life or 10 Years + Fine Death or 10 Years + Fine |
कलम 307 नुसार दोषी ठरवल्यास शिक्षा
३०७ कलमांतर्गत दोषी आढळल्यास त्या व्यक्तीला दहा वर्षापर्यंत करावासाची शिक्षा होऊ शकते किंवा दंड लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
परंतु हत्येच्या प्रयत्नात पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाली असेल तर ती शिक्षा जन्मठेपेपर्यंत वाढवल्या जाऊ शकते. जेव्हा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न करतो आणि तो त्या व्यक्तीला जीवे मारण्यास अपयशी ठरतो तेव्हा भारतीय दंड संहितेतील कलम 307 नुसार गुन्हा दाखल होतो.
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्ती जीवे मारण्यास किंवा हत्येचा प्रयत्न केला परंतु ती व्यक्ती थोडक्यामध्ये बचावली किंवा ज्या व्यक्तीवर हल्ला झाला आहे त्या व्यक्तीला जीव गमावला लागला नाही तर अशा परिस्थितीत हल्ला करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधानातील कलम 307 नुसार शिक्षा होईल.
गुन्हा | शिक्षा | जाणीव | जामीन | ट्रायबल |
---|---|---|---|---|
खुनाचा प्रयत्न | 10 वर्षे + दंड | आकलनीय | अजामीनपात्र | सत्र न्यायालय |
अशा कृत्यामुळे कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली तर | जन्मठेप किंवा 10 वर्षे + दंड | आकलनीय | अजामीनपात्र | सत्र न्यायालय |
दुखापत झाल्यास जन्मठेपेने खून करण्याचा प्रयत्न | मृत्यू किंवा 10 वर्षे + दंड | आकलनीय | अजामीनपात्र | सत्र न्यायालय |
IPC च्या कलम 307 अंतर्गत गुन्ह्याचे स्वरूप
- दखलपात्र: गुन्ह्यांची दखलपात्र आणि अदखलपात्र अशी विभागणी केली जाते. कायद्यानुसार, दखलपात्र गुन्ह्याची नोंद करणे आणि तपास करणे पोलिसांचे कर्तव्य आहे.
- अजामीनपात्र: याचा अर्थ कलम ३०७ अन्वये दाखल केलेल्या तक्रारीत, दंडाधिकाऱ्यांना जामीन नाकारण्याचा आणि एखाद्या व्यक्तीला न्यायालयीन किंवा पोलिस कोठडीत ठेवण्याचा अधिकार आहे.
- नॉन-कंपाउंडेबल: याचिकाकर्त्याला त्याच्या इच्छेनुसार नॉन-कम्पाउंडेबल केस मागे घेता येत नाही.
307 kalam in marathi नुसार फिर्याद कशी द्यावी?
उदाहरण – एखाद्या व्यक्तीवर हल्ला झाला आणि त्या हल्ल्यात ती व्यक्ती गंभीर जखमी झाली तर
मा. पोलिस निरीक्षक साहेब, शहर पोलिस स्टेशन………….
फिर्यादी- श्रीकांत कारंडे वय-30 वर्ष, धंदा-शेती रा वसमत ता वसमत
आरोपी – प्रारंभ पाडवे वय-40 वर्ष, धंदा-शेती रा वसमत ता वसमत
महोदय,
मी फिर्यादी वरील ठिकाणचा राहणारा असून आरोपी नामे प्रारंभ यांचा आणि माझा शेती संदर्भात वाद आहे आज सकाळी दहा वाजता मी माझ्या शेतावर काम करत असतांना आरोपी नामे प्रारंभ तिथे आला व माझ्याशी वाद घालू लागला मी त्याला समजून याचा प्रयत्न केला परंतु तो मला शिवीगाळ करू लागला व त्यांनी मला अचानक चाकूने माझ्यावर हल्ला केला.
त्यामुळे माझ्या हाताला व पाठीवर व पोटावर खोल जखम झाली मी आरडाओरडा करू लागलो तेव्हा माझ्या शेत जवळची शेजारी धावून आले व त्यांनी मला त्यांच्या तावडीतून वाचवली अन्यथा आरोपी माझा खून करण्याचा प्रयत्न करत होता सध्या मला खोल जखम असल्यामुळे मला हालचाल करता येत नाही मी शासकीय दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहे तरी माझी आरोपी विरुद्ध कायदेशीर फिर्याद असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती.
फिर्यादी