नमस्कार मित्रांनो , आज आपण विद्याधन स्कॉलरशिप (Vidyadhan Scholarship ) विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला ही स्कॉलरशिप हवी असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात , काय आहे Vidyadhan Scholarship आणि त्यासाठी काय लागणार आहे, कोण या स्कॉलरशिप साठी पात्र आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही स्कॉलरशिप तुम्हाला कशा प्रकारे मिळू शकते इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
विद्यार्थ्यांन स्कॉलरशिप इयत्ता दहावी मध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती आहे. आधी संस्थेचे काम दक्षिण भारतामध्ये चालत होते पण नंतर समाजकार्य वाढवण्यासाठी संस्थेने संपूर्ण भारतभर आपले कार्य पसरवण्याचे ठरवले. त्याचं अंतर्गत महाराष्ट्र मध्ये देखील 2019 ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांना दहावी मध्ये स्कॉलरशिप मिळाली तर पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षणासाठी देखील स्कॉलरशिप चालू ठेवली जाते. म्हणजे एकदा दहावीमध्ये मिळाली तर पुढे शिक्षण पूर्ण होईपर्यंत सुरू राहील.पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची रक्कम ही दहा हजार ते साठ हजार यादरम्यान असू शकते.
Vidyadhan Scholarship मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन टप्प्यांमधून जावे लागते. पहिला टप्पा म्हणजे ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षा द्यावी लागेल. दुसऱ्या टप्प्यामध्ये निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचा इंटरव्यू घेतल्या जाईल. त्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे वेरिफिकेशन करण्यासाठी त्यांच्या घरी भेट दिली जाईल. ही होम व्हिजिट संस्थेच्या स्वयंसेवकांकडून केली जाते. या तिन्ही टप्प्यांमधून जो विद्यार्थी पास होईल तो विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी पात्र असेल.
शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर विद्यार्थ्याला त्याच्या परीक्षेतील गुणवत्ता योग्यरित्या राखायचे असते. तसे न झाल्यास शिष्यवृत्ती बंद देखील केली जाऊ शकते. शिष्यवृत्ती सोबतच करिअर गायडन्स, तज्ञ मार्गदर्शन, निवासी मार्गदर्शन शिबिर विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जातात. तसेच विद्यार्थ्यांना जर काही इतर मदत लागत असेल ती देखील शक्य तेवढ्या परीने संस्थेकडून वारंवार केली जाते. संस्थेचे कार्य केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, पोंडिचेरी, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, गोवा, ओडिसा, नवी दिल्ली आणि लडाख या ठिकाणी चालू आहे.
Vidyadhan Scholarship शिष्यवृत्ती रक्कम
अकरावी आणि बारावी या वर्गांसाठी शिष्यवृत्ती ही जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति वर्ष असेल. बारावी पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यावेळेसच्या अभ्यासक्रमानुसार व विद्यार्थ्यांच्या गुणांनुसार शिष्यवृत्ती ठरवली जाईल.
सरोजिनी दामोदरन फाउंडेशन विषयी
या संस्थेची स्थापना एस. डी शिबुलाल यांनी केली आहे. ते इन्फोसिस या कंपनीचे सहसंस्थापक आहेत. त्यांच्यासोबतच त्यांचे संपूर्ण कुटुंब संस्थेचे कार्य पाहत असते. संस्थेचे ध्येय आहे की आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत करणे. त्यांचे ध्येय एक लाख Vidyadhan Scholarship वितरीत करणे व देशातील सर्व राज्यांमध्ये आपले कार्य प्रसारित करणे हे आहे.
पात्रता
ज्या विद्यार्थ्यांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखांपेक्षा कमी आहे आणि 2023 मध्ये महाराष्ट्र बोर्ड मधून दहावी पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांनी यावर्षी त्यांची एसएससी परीक्षा महाराष्ट्रातून 85 टक्के (अपंग विद्यार्थ्यांसाठी 75 टक्के) किंवा सर्व विषयात ए प्लस ग्रेड सह उत्तीर्ण केली पाहिजे.
Vidyadhan Scholarship निवड प्रक्रिया
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरून आणि त्यांनी दिलेल्या माहितीवरून सरोजिनी दामोदरं फाउंडेशन विद्यार्थ्यांची लहान यादी बनवते लहान यादीमध्ये निवड झालेले उमेदवार हे ऑनलाईन परीक्षा मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाते.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 सप्टेंबर 2023 16 सप्टेंबर |
अर्जांची पडताळणी | 16 सप्टेंबर 2023 |
मुलाखत परीक्षा या वेळेत घेतली जाईल. | 9 ऑक्टोंबर ते 20 ऑक्टोबर 2023 |
परीक्षेची तारीख आणि वेळ ही लहान यादीमध्ये निवड झालेल्या यादीमधील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम तर तुम्हाला तुमच्या सोबत एक ईमेल आयडी तयार ठेवावा लागेल की जो तुमचा स्वतःचा असेल.
- विद्याधन वेबसाईटवर अप्लिकेशन करत असताना तुम्हाला खालील माहिती भरावी लागेल
- तुमचे संपूर्ण नाव, ईमेल आयडी आणि विद्याधन पासवर्ड.
- या गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला apply now बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्या इमेलवर अकाउंट एक्टिवेशन लिंक सेंड केली जाईल.
- तुमच्या ईमेलवर आलेल्या एक्टिवेशन लिंक वर क्लिक करून तुम्हाला तुमचे अकाउंट ऍक्टिव्हेट करायचे आहे.
- त्यानंतर ईमेल आयडी व विद्याधन पासवर्ड सोबत लॉगिन करायचे आहे.
- लॉगिन केल्यानंतर तुम्ही हेल्प या बटनावर क्लिक करून फॉर्म भरण्यासाठी च्या सूचना वाचू शकता
- त्यापुढे तुम्ही ज्या राज्यामध्ये Vidyadhan Scholarship साठी अप्लाय करणार आहात ते राज्य व योग्य ती स्कॉलरशिप निवडून apply now क्लिक करायचे आहे.
- एप्लीकेशन सबमिट केल्यावर जर तुम्हाला काही एडिट करायचे असेल तर तुम्ही एडिट एप्लीकेशन या बटनावर क्लिक करून करू शकता.
- संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिशन सक्सेसफुल असे नोटिफिकेशन दिसेल.
- तुमचे रजिस्ट्रेशन तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा तुम्ही सर्व आवश्यक कागदपत्रे आणि फोटो अपलोड कराल.
- त्यानंतर तुम्हाला नियमितपणे तुमचा ईमेल चेक करत राहायचे आहे कारण त्यावरच तुम्हाला पुढील माहिती मिळणार आहे.
रजिस्ट्रेशन करण्याच्या पूर्ण प्रोसेस वर आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे की ज्याची तुम्ही मदत घेऊन तुमचा फॉर्म अगदी सुयोग्यपणे कोणतीही चूक न करता भरू शकता. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहून घ्या.
आवश्यक कागदपत्रे
- फोटो इयत्ता
- दहावीची गुणपत्रिका
- उत्पन्नाचा दाखला (रेशन कार्ड चालणार नाही)
मदतीसाठी संपर्क
ई-मेल आयडी | vidyadhan.maharashtra@sdfoundationindia.com |
विद्याधन हेल्प डेस्क | 9663517131 |
Conclusion
मित्रांनो , ह्या लेख मध्ये आम्ही विद्याधन स्कॉलरशिप (Vidyadhan Scholarship ) या स्कॉलरशिप बद्दल माहिती दिली आहे. ही स्कॉलरशिप दहावी मध्ये 85 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते. संस्थेने ठरवलेल्या विविध टप्प्यांमधून जर तुम्ही निवडले गेला तर तुम्हाला ही स्कॉलरशिप तुमचे उच्च शिक्षण होईपर्यंत मिळणार असते. तुम्ही जर या स्कॉलरशिप साठी पात्र असाल तर नक्कीच मुदत संपायच्या आधी अर्ज पूर्ण करा तसेच तुमच्या मित्र परिवारांमधील कोणी विद्यार्थी पात्र असेल तर त्याच्यापर्यंत ही पोस्ट पोहोचवा. मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल. धन्यवाद!