दिव्यांग अपंग प्रमाणपत्र (UDID Card) ऑनलाईन घरबसल्या तुमच्या मोबाईलवर काढा !

By Marathi Corner

Published on:

सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय विभागाकडून महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग नागरिकांना ओळख देण्यासाठी UDID कार्ड सुरू करण्यात आले. UDID कार्ड म्हणजे अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र होय. हे कार्ड हे अपंग व्यक्तींना एक सामान्य ओळख प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आल आहे.

UDID कार्डच्या माध्यमातून दिव्यांग नागरिकांना विविध सेवा, फायदे व योजना दिल्या जातात. या कार्डवर वैयक्तिक माहिती, अपंगत्वाचा प्रकार आणि अद्वितीय अपंग प्रमाणपत्र क्रमांक इत्यादी माहिती असते.

अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र (UDID)

शासन निर्णय 2016 नुसार महाराष्ट्र राज्यातील त्याचप्रमाणे भारतातील सर्व दिव्यांग बांधवांना केंद्रीय स्तरावर एक शासन निर्णय घेण्यात आला, त्याची अंमलबजावणी 2016 पासून सुरू करण्यात आलेली असून या अंमलबजावणीच्या माध्यमातून UDID आयडीकार्ड/स्वावलंबन कार्ड/दिव्यांग कार्ड अपंग व्यक्तींना आयडी कार्ड देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र शासनाने घेतला.

आधार कार्डवर ज्याप्रमाणे नागरिकांची सामान्य माहिती असते, त्याचप्रमाणे एवढी UDID कार्डवरती अपंग व्यक्तीची सविस्तर माहिती देण्यात आलेली असते. ज्यामुळे विविध योजनांचा लाभ घेत असताना शासकीय अधिकाऱ्यांना अपंग व्यक्तीची ओळख लवकर पडते.

UDID कार्डचे फायदे

1. आपण व्यक्तींना अपंगत्व असल्याबाबत विविध प्रकारची कागदपत्र सोबत बाळगण्याची गरज नाही, कारण UDID कार्डधारकांचा सर्व तपशील एकाच कार्डमध्ये साठविण्यात आलेला आहे.

2. शासनाकडून चालू असलेल्या योजना व भविष्यात विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या कार्डचा फायदा होईल. अपंगत्व सिद्ध करण्यासाठी हे एकच कार्ड शासनाकडून मान्य करण्यात येत.

3. इन्कम टॅक्समध्ये दिव्यांग व्यक्तीला काही सवलती देण्यात आलेले आहेत, या सवलती दिव्यांग व्यक्तीच्या अपंग टक्केवारीवर अवलंबून आहेत.

4. शासकीय नोकरीत दिव्यांग व्यक्तीसाठी विशेष 4% राखीव आरक्षण दिलं जातं.

5. UDID कार्डच्या माध्यमातून एखादा विद्यार्थी शिक्षण घेत असेल, तर अशा विद्यार्थ्यांना शासनाकडून विविध सवलती व विद्यार्थी स्कॉलरशिप उपलब्ध करून दिली जाते.

6. दिव्यांग जर आपल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असेल, तर NHFDC च्या माध्यमातून बँकेकडून लोन दिलं जातं.

7. दिव्यांग व्यक्तींना UDID कार्ड फ्री प्रवास पास व सोबत प्रवासामध्ये डिस्काउंटचा लाभ दिला जातो, यामध्ये मेट्रो प्रवास, महाराष्ट्र परिवहन महामंडळ बसचा प्रवास, रेल्वेचा प्रवास इत्यादींचा समावेश आहे.

8. दोन चाकी किंवा चार चाकी वाहन खरेदी करताना मॉडिफिकेशन दरम्यान कमीत कमी 18% पर्यंत डिस्काउंट दिव्यांग व्यक्तींना दिल जात.

9. बाहेर देशात जाण्यासाठी एअर इंडियाच्या मार्फत प्रवास खर्चात 50% पर्यंत विशेष सूट दिव्यांग व्यक्तींना देण्यात येते.

10. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिव्यांग यांना राहण्यासाठी मोफत घरकुल योजना मिळते.

◾ वरील नमूद विविध लाभाव्यतिरिक दिव्यांग व्यक्तींना इतर खाजगी संस्थांकडून विविध प्रकारचे लाभ देण्यात येतात.

UDID कार्डसाठी पात्र कोण ?

पूर्णत/अंशिक अपंगत्व असलेला महाराष्ट्र राज्यातील कोणताही नागरिक दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजेच UDID कार्डसाठी अर्ज करू शकतो. अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवरून किंवा जवळच्या महा-ई-सेवा केंद्र/CSC सेंटरमध्ये जाऊन सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकता.

यूडीआयडी कार्डसाठी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • उत्पन्न दाखला
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • अर्जदार अपंग असावा.
  • अर्जदार भारताचा नागरिक असावा.

वरील नमूद कागदपत्रा व्यतिरिक्त अर्ज केल्यानंतर किंवा अर्ज करण्यापूर्वी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय विभागाकडून इतर आवश्यक कोणत्याही कागदपत्राची मागणी केल्यास दिव्यांग व्यक्तींना विहित मुदतीत ती कागदपत्र पुरवावी लागतील.

UDID कार्डसाठी ऑनलाईन अर्ज

  • दिव्यांग आपण प्रमाणपत्र कार्ड म्हणजेच UDID कार्ड अर्ज करण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या युनिक डिसेबिलिटी आयडी च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • होम पेजवर ‘अपंगत्व प्रमाणपत्र आणि UDID साठी अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमची मूलभूत माहिती, अपंगत्व प्रकार, रोजगार ओळख, जन्मतारीख, रहिवासी पत्ता इत्यादी माहिती भरून घ्या.
  • त्यानंतर अर्जामध्ये विचारण्यात आलेली आवश्यकते कागदपत्र योग्य त्या फॉरमॅट व आकारामध्ये अपलोड करा आणि Submit करा.

 

संपर्क माहिती

UDID कार्डशी संबंधित काही प्रश्न असल्यास तुम्ही खालीलप्रमाणे दिलेल्या विविध माध्यमाच्या माध्यमातून संपर्क साधू शकता.

पत्ता – श्री विनीत सिंघल, संचालक सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभाग खोली क्रमांक 517, बी-2 ब्लॉक, अंत्योदय भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003

◾हेल्पलाइन नंबर – 011-24365019

◾व्हाट्सअ‍ॅप नंबर – 9354939703

◾ईमेल पत्ता – disability-udid@gov.in

Leave a Comment