नमस्कार मित्रांनो, आज आपण तार कुंपण योजना या योजनेविषयी (Tar Kumpan Yojana Maharashtra ) संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.
चला तर मग मित्रांनो पाहुयात , काय आहे तार कुंपण योजना आणि त्यासाठी काय आहे नक्की उद्देश्य , काय लागणार आहे , कागदपत्रे , अर्ज कसा भरायचा , कोणाला या योजनेचा लाभ घेण्यात येईल , इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
आता आपण जाणून घेऊ नक्की काय आहे तार कुंपन योजना ?
आपल्या महाराष्ट्रात बरेच असे शेतकरी आहे ज्यांची जमीन शेती हि जंगल जवळ किंवा अभरण्यात आहे ह्यामुळे काय होत कि जे जंगली रानटी प्राणी आहेत त्यांचा त्रास हा शेकऱ्यांना आणि शेतीला सुद्धा ह्या त्रासाचा सामना करावा लागतो. हे प्राणी शेतीच खूप मोठं नुकसान करतात त्याचबरोबर पिक उद्धवस्त करतात. म्हणूनच शेतीचे नुकसान होऊ नये आणि शेतीचे सरंक्षण व्हावे या साठी शेतकऱ्यांना तार कुंपण या योजनेची मदत व्हावी ह्याला म्हणतात तार कुंपण योजना.
तार कुंपण योजना महाराष्ट्र Tar Kumpan Yojana 2024 ही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये कुंपण करून त्यांच्या शेतांचे जनावरांपासून संरक्षण करता यावे याकरिता डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येत असून या योजने अंतर्गत वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या शेती पिकांचे नुकसान टाळण्याकरिता महत्त्वपूर्ण अशी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेताला जाळीचे कुंपण करू शकता.
तार कुंपण योजना उद्देश (Tar Kumpan Yojana Maharashtra )
शेतकऱ्यांना रानटी जनावरांपासून त्यांच्या शेती पिकांचे रक्षण करता यावे याकरिता शासनाच्या वतीने 90 टक्के अनुदान वितरीत करण्यात येणाऱ्या या योजनेचा उद्देश हा तार कंपनीच्या माध्यमातून जनावरे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज येऊ शकणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल.असा उद्देश या योजनेअंतर्गत आहे.
तार कुंपण योजनेसाठी अर्ज कसा कराल ?
महाराष्ट्रात Tar Kumpan Yojana Maharashtra ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा केली असून , शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी जी काही प्रक्रिया करायची आहे ती ऑनलाईन च करायची आहे. त्याचप्रमाणे अर्ज करताना जे काही कागदपत्रे आवश्यक आहेत ती कागदपत्रे सुद्धा ऑनलाईन सादर करायची आहेत. परंतु सध्या ऑनलाईन अर्ज सुरू झालेले नसल्यामुळे आपल्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीमध्ये हा अर्ज करता येतो. तुम्ही ज्या तालुक्यांमध्ये राहतात त्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्हाला तार कंपनी योजना चा ऑफलाइन अर्ज सादर करावा लागेल. पंचायत समितीमधील अधिकारी तुम्हाला तार कंपनी योजना संदर्भात विस्तृत माहिती सांगतील त्याचप्रमाणे अर्जासोबत तुम्हाला कागदपत्र सुद्धा सबमिट करावे लागतील. (Tar Kumpan Yojana Maharashtra ) या योजना अंतर्गत करावयाचा अर्ज सुद्धा तुम्हाला पंचायत समिती मार्फत उपलब्ध करून देण्यात येईल.
तार कुंपण योजना लाभ किती मिळेल?
शेतकरी मित्रांनो तार कुंपण योजना महाराष्ट्र (Tar Kumpan Yojana Maharashtra) अंतर्गत शेताला तार कुंपण पण करण्याकरिता महाराष्ट्र सरकार 90 टक्के अनुदान देत असून उर्वरित दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चाने जमा करून उभारावी लागेल. या योजनेअंतर्गत शासन शेतकऱ्यांना तार कुंपण करण्याकरिता काटेरी तार तसेच त्याकरिता आवश्यक लोखंडी खांब खरेदी करण्यासाठी 90 टक्के अनुदान पुरवित आहे.
तार कुंपण योजना आवश्यक कागदपत्रे
तार कुंपण योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करण्याकरिता तुम्हाला अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करावी लागतात.
- ज्या जमिनीवर तार कुंपण करायचे आहे त्या जमिनीचा सातबारा
- कास्ट सर्टिफिकेट
- आधार कार्ड
इत्यादी कागदपत्रे तुम्हाला पंचायत समितीकडे सादर करून अर्ज करता येतो.
मित्रांनो , ह्या लेख मध्ये आम्ही तार कुंपण योजना (Tar Kumpan Yojana Maharashtra ) या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे कि , त्याच हेतू , उद्दिष्ट , ती योजना म्हणजे काय, कागदपत्रे कोणती लागतील , अर्ज कसा करावा इत्यादी मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल.
धन्यवाद !!