राज्यातील वाढते उद्योग व शहरीकरण या कारणामुळे विजेची मागणी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर होत आहे. सद्यस्थितीत वीजनिर्मिती कोळसा, पेट्रोलजन्य पदार्थ व नैसर्गिक वायू या विविध संसाधनापासून होते; परंतु ही संसाधने मर्यादित स्वरुपात असल्यामुळे भविष्यात संपुष्टात येऊ शकतात आणि सोबतच यांचा वातावरण, तापमान वाढ, पर्यावरण बदल अश्या विविध घटकांवर विपरीत परिणाम होतो.
वरील सर्व बाबींचा विचार करून शासनाकडून सन 2030 पर्यंत 50 टक्के इतकी ऊर्जा अपारंपारिक माध्यमातून निर्मिती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. या अनुषंगाने शासनाकडून विविध प्रकारच्या Solar योजना शेतकरी व नागरिकांसाठी राबविण्यात येत आहेत.
शासनाच्या विविध सोलर योजनापैकी नुकतीच दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांसाठी नुकतीच जाहीर करण्यात आलेली योजना म्हणजे महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलर योजना होय.
महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलर योजना
आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांसाठी शासनाकडून आता त्यांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी नव्याने “स्वयंपूर्ण महाराष्ट्र अवासीय रूफ टॉप (SMART) सोलार योजना” सुरू करण्यात आलेली आहे. सदर प्रणाली द्वारे निर्मित विजेचा वापर करून ग्राहकांना उर्वरित विजेतून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल.
या योजनेच्या माध्यमातून जवळपास महाराष्ट्रातील दारिद्र्यरेषेखालील 1,54,622 घरगुती वीज ग्राहकांना व त्याचप्रमाणे वीज वापर 100 युनिट पेक्षा कमी असणाऱ्या घरगुती ग्राहकांना आपल्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे.
तब्बल 655 कोटी निधीची तरतूद
स्वयंपूर्ण महाराष्ट्र अवासीय रूफ टॉप सोलार योजनेसाठी सन 2025-26 या वर्षाकरिता 330 कोटी रुपये, तर सन 2026-27 या वर्षासाठी 325 कोटी इतके रकमेची तरतूद शासन निर्णयाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.
सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्र वीज वितरण कंपनीस सहाय्यक अनुदान वितरित करण्यासंदर्भातील लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे दारिद्र्य-रेषेखालील नागरिकांना नक्कीच फायदा होईल.
योजनेचे उद्दिष्ट काय ?
- दारिद्र्यरेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या खेड्यापाड्यातील वीज ग्राहकांना विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे.
- दारिद्र्यरेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा एक नवीन मार्ग उपलब्ध करून देणे.
- अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतापासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्मिती करणे.
- वातावरणातील अनुमानीत कार्बन उत्सर्जन, कार्बन तीव्रता कमी करणे.
- छतावरील सौर ऊर्जा निर्मितीच्या क्षमतेमध्ये जास्तीत-जास्त प्रमाणात वाढ करणे.
- सौर ऊर्जेच्या माध्यमातून स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे व अर्थव्यवस्थेचा विकास करणे.
प्रवर्गनिहाय निधी व हिस्सा ?
सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी प्रति किलोवॅट आधारभूत किमतीच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत प्रस्तावित अनुदानाचा हिस्सा खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे.

यासोबतच प्रति किलोवॅट आधारभूत किंमत 50,000 रुपये इतकी धरल्यास वीज ग्राहक/राज्यशासन/केंद्रशासन यांचा हिस्सा सुद्धा वरीलप्रमाणे देण्यात आलेला आहे.
योजनेसाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार वीज ग्राहकांकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक.
- ग्राहकाच्या सौर छतावर पॅनल बसून या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- इच्छुक ग्राहकांनी राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा ग्राहक थकबाकीमुक्त असावा.
निकष :
1. ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर वर्ष २०२५ (ऑक्टोबर – २०२४ ते सप्टेंबर – २०२५ ) मधील कुठल्याही महिन्यांत १०० युनिटपेक्षा जास्त नसेल, असेच ग्राहक योजनेस भाग घेण्यास पात्र असतील.
2. फक्त सिंगल फेज वीज ग्राहकच या योजनेत भाग घेण्यास पात्र असतील.
3. दारिद्रयरेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व द्रारिद्रय रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वावर राबवावी.
4. डिसेंबर २०२५ पर्यंत योजनेम्ये दारिद्रय रेषेखालील ग्राहकांची संख्या १,५४,६२२ पेक्षा कमी असल्यास सदर कोटा ० – १०० युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी वळविण्याचा अधिकार महावितरण कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना राहील.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- ग्राहकांचा आधारकार्ड क्रमांक
- घरगुती वीज ग्राहक बिल
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँकेचा पासबुक झेरॉक्स
ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
- सर्वप्रथम शासनाकडून देण्यात आलेल्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
- Apply for Rooftop Solar या पर्यायावर क्लिक करून तुमची माहिती व्यवस्थित भरा, ज्यामधे तुमचे राज्य, जिल्हा आणि वीज वितरण कंपनी (उदा. महावितरण) निवडा.
- त्यानंतर तुमचा ग्राहक क्रमांक (Consumer Number) आणि मोबाईल नंबर टाका. तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाकून नोंदणी पूर्ण करा.
- त्यानंतर परत Login करून अर्जात विचारण्यात आलेली सर्व मूलभूत माहिती भरून घ्या व आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
- सर्व माहिती व कागदपत्र अपलोड केल्यानंतर अर्जाची एक वेळेस छाननी करा व तुमचा अंतिम अर्ज Submit करा.
📢 महत्त्वाची माहिती : सदर योजनेचा कालावधी मार्च 2027 पर्यंत असेल. सोलर पॅनल तुमच्या छतावर बसल्यानंतर संबंधित सोलारची पुढील 5 वर्षासाठी दुरुस्ती व देखभालची जबाबदारी ठेकेदाराची असेल, यासंदर्भात महावितरणकडून तशा प्रकारचा 100 रुपयांच्या बॉण्डवर करारनामा करून घेण्यात येईल.