पोलिस भरती 2025 ऑनलाईन फॉर्म सुरू, 12 वी पास एकूण 15000+ जागा : Police Bharti 2025 Maharashtra

By Marathi Corner

Published on:

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 करिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्जाची सुरुवात आज दिनांक 29 ऑक्टोबर पासून सुरू असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे. संबंधित भरतीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

विभाग नाव : महाराष्ट्र शासन गृह विभाग

पदाचे नाव : पोलीस शिपाई, पोलीस चालक, कारागृह पोलीस ,बॅण्डमन इ.

एकूण जागा : 15,000 पेक्षा जास्त

शैक्षणिक पात्रता : संबंधित भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांच शिक्षण बारावी (HSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे फक्त बँड्समन साठी 10 उत्तीर्ण.

Age Limit : उमेदवारांची वयोमर्यादा त्यांच्या जात प्रवर्गनिहाय वेगवेगळी आहे. तुम्ही खालील चार्टमध्ये फक्त 3 जातीच्या वयोमर्यादा संदर्भात माहिती दिली आहे. त्याची तुम्ही Website वरून खात्री करून घेणे व पोलीस भरतीसाठी अर्ज करणे.

जात प्रवर्ग वयोमर्यादा
General (सर्वसाधारण) 18 ते 28 वर्ष
SC/ST 05 वर्ष सूट
OBC 03 वर्ष सूट

निवड प्रक्रिया : निवड प्रक्रिया सामान्यतः 3 टप्प्यात पार पाडण्यात येईल, ज्यामध्ये सर्वप्रथम मैदानी चाचणी (Ground), लेखी परीक्षा (Written Exam) व अंतिम कागदपत्र पडताळणीनंतर (Document Verification) उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

शारीरिक पात्रता : पुरुष व महिला यांच्यासाठी लागणारी शारीरिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • पुरुष किमान उंची 165 सें.मी
  • महिला किमान उंची 158 सें.मी

✅ अर्जाची पद्धत : ऑनलाइन

✅ अर्ज सुरुवात : 29 ऑक्टोबर 2025

✅ अर्जासाठी शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2025

पोलीस भरती सर्व जिल्ह्यांची जागांची PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

How To Apply For Police Bharti 2025

  • अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम पोलिस भरतीच्या अधिकृत संकेतस्थळला भेट द्या. policerecruitment2025
  • मुख्य पानावर New Registration/नवीन नोंदणी करा हा पर्याय निवडा.
  • तुमच संपूर्ण पूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका आणि Registration फॉर्म पूर्ण करा.
  • नोंदणी झाल्यानंतर तुमच्या मोबाईल/ईमेलवर User ID व Password येतील.
  • मिळालेल्या User ID व Password टाकून वेबसाईटवर लॉगिन करा.
  • तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करावयाचा आहे जस पद (उदा. पोलीस शिपाई) निवडा आणि अर्जातील सर्व माहिती नीट भरून पुढे जा.
  • अर्ज भरल्यानंतर अर्ज शुल्क असेल, तर ते ऑनलाईन भरा आणि नंतर सबमिट करा.
  • अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून ठेवा, परीक्षेच्या वेळी उपयोगी पडेल.

Leave a Comment