महाराष्ट्र शासनाकडून माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर 2025 चा हप्ता वितरित करण्याचा शासन निर्णय नुकताच जारी केला आहे. हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय 29 ऑक्टोबर 2025 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून निर्गमित करण्यात आला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाकडून 410.30 कोटी इतका प्रशासकीय निधी वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी 410 कोटी
आर्थिक वर्ष 2025-26 ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना वितरित करण्यासाठी 410.30 कोटी (410 कोटी 30 लाख रुपये) इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. पात्र महिलांना आता 1,500 रुपयांचा हप्ता लवकरच वितरित केला जाईल.
शासनाच्या या निर्णयामुळे निधी वितरणाची प्रक्रिया नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होऊन लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल.
कोणत्या महिलांना मिळणार हा हप्ता
ज्या महिलांना यापूर्वीचा 15 वा हप्ता मिळाला आहे आणि ज्यांचे DBT ॲक्टिव्ह आहे, त्यांना 16 वा हप्ता 100% गॅरंटीसह मिळणार आहे.
ज्या महिलांच e-KYC अद्याप प्रलंबित (Pending) आहे, त्यांनाही हा हप्ता मिळेल. सरकारने e-KYC नसतानाही हप्ता देण्याचे निर्देश दिले आहेत.
अर्ज करताना Approved किंवा Pending असलेले स्टेटस असलेले लाभार्थी काळजी करू नयेत. फक्त Reject झालेले अर्ज असलेल्या महिलांनी आपल्या स्थितीबद्दल अधिक माहिती घ्यावी.
ज्यांना 12 वा, 13 वा, किंवा 14 वा हप्ता मिळाला नव्हता, पण ज्यांची पडताळणी झाली आहे, अशा अपडेट झालेल्या लाभार्थ्यांनाही यावेळेस 16 वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
हप्ता न मिळाल्यास काळजी करू नका. वितरण प्रक्रिया सलग तीन दिवस सुरू राहील आणि टप्प्याटप्प्याने सर्व पात्र महिलांना लाभ मिळेल