लाडकी बहीण – KYC शेवटची तारीख : Ladki Bahin Yojana KYC Last Date

By Marathi Corner

Published on:

महायुती सरकारकडून राज्यातील महिलांसाठी विशेष अशी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जातो.

आत्तापर्यंत या योजनेत अर्ज केलेल्या पात्र व अपात्र सर्व लाभार्थी महिलांना पैसे मिळालेले आहेत; परंतु आता यापुढे अपात्र लाभार्थ्यांना वगळून टाकण्यासाठी शासनाकडून ही केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला असून लाभार्थी महिलांना केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

EYC मधील तांत्रिक अडचणी सुटली

लाभार्थी महिलांना केवायसी करण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून त्यासंदर्भातील पोर्टल तयार करण्यात आला आहे. संबंधित पोर्टलवर केवायसी पडताळणी करत असताना संबंधित पोर्टलवर केवायसी पडताळणी करत असताना बहुतांश लाभार्थी महिलांना ओटीपी संदर्भात तांत्रिक अडचणी येत होत्या.

यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लवकरच ओटीपी संदर्भातील अडचणी दूर केल्या जातील अशी माहिती दिली होती. केवायसी प्रक्रिया सुरळीत झाल्यानंतर आता केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आली आहे.

KYC साठी शेवटची तारीख

शासनाकडून देण्यात आलेला पोर्टलमधील तांत्रिक अडचण दूर केल्यानंतर आता केवायसी करण्यासाठी लाडक्या पात्र बहिणींना शेवटची तारीख देण्यात आली आहे. या तारखेच्या आधी लाडक्या पात्र बहिणींना केवायसी पूर्ण करावी लागेल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी ही e-KYC सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.

फक्त पात्र लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा यासाठी मंत्रालयात घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये 18 सप्टेंबर 2025 पासून अधिकृत संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी पात्र लाभार्थी महिलांना फक्त दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.

बहुतांश लाभार्थी महिलांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. उर्वरित लाभार्थी महिलांना 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, अशी माहिती आदिती तटकरे यांच्यामार्फत देण्यात आली.

लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ekyc प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम शासनाकडून देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाईट उघडल्यानंतर ई-केवायसी या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि कॅपच्या कोड टाकून आधार प्रमाणीकरण करण्यासाठी Send OTP या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या आधार नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी पाठवण्यात येईल. ओटीपी त्याठिकाणी टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
  • ओटीपी टाकल्यानंतर पुढील स्टेपमध्ये तुमच्या पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक मागितला जाईल, आधार क्रमांक टाकून कॅपचा टाका.
  • त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल व खालील संमती देताना प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
    • माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय विभाग, उपक्रम, मंडळ किंवा स्थानिक संस्थेत कायमस्वरूपी नोकरीत नाही आणि निवृत्तीवेतन घेत नाही.
    • माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.
  • ही माहिती भरून चेक बॉक्सवर क्लिक करा त्यानंतर सर्वात शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा.
  • संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे, असा मेसेज दिसेल.

लाभार्थी महिला वरील पद्धतीने आपली ई-केवायसी प्रक्रिया 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी पूर्ण करू शकतात. त्यानंतर लाभार्थी महिलांना केवायसी करता येणार नाही याची नोंद घ्यावी.

Leave a Comment