महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वकांक्षी योजना ठरलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 इतकी आर्थिक मदत दिली जाते.
पण लाडक्या बहिणींनो आता लक्षात ठेवा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे आणि. त्यासाठी शासनाकडून देण्यात आलेली मुदत संपलेली आहे फक्त शेवटचे काही दिवस बाकी आहेत.
आता eKYC म्हणजे काय?
ई-केवायसी म्हणल्यानंतर आता बहुतांश लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला असेल, आता ई-केवायसी म्हणजे काय बरं ! Ekyc म्हणजे इलेक्ट्रॉनिक नोंदणी व ओळख पडताळण्याची एक प्रक्रिया आहे.
लाभार्थी लाडक्या बहिणींचा आधार क्रमांक आणि त्यासोबत जोडलेला मोबाईल नंबर याची ऑनलाईन पडताळणी करून शासनाकडून खात्री केली जाते की, लाभ मिळणारी लाभार्थी व्यक्ती खरी आहे आणि लाभ रक्कम त्यांच्याच नावाने जमा होते आणि भविष्यात सुद्धा होईल.
मोबाईल वरुन eKYC कशी करावी?
मोबाईल वरून ई-केवायसी करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. तुम्ही घरबसल्या काही मिनिटात केवायसी पूर्ण करू शकता. Kyc करत असताना काही काळजीपूर्वक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण महत्त्वाचे आहे. केवायसी कशी करावी तुम्ही थोडक्यात खालीलप्रमाणे माहिती पाहू शकता.
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये शासनाकडून देण्यात आलेली लाडकी बहीण योजनेचे अधिकृत वेबसाईट उघडा.
- त्यानंतर होम पेजवर दिसणाऱ्या ई-केवायसी बॅनरवर क्लिक करा.
- त्यानंतर लाभार्थी महिलांचा बारा अंकी आधार क्रमांक आणि कॅपच्या कोड देण्यात आलेल्या बॉक्समध्ये भरा.
- आता Send Otp या बटनावर क्लिक करा आधार लिंक मोबाइल क्रमांकावर 6 अंकी ओटीपी पाठवण्यात येईल.
- आलेला ओटीपी त्या ठिकाणी टाकून
- आता पुढील स्टेटमध्ये लाभार्थी महिलांच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक मागितला जाईल.
- वडिलांचा किंवा पतींचा आधार क्रमांक टाकून त्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल वरती आलेला OTP टाकून Submit करा.
- पुढे दोन विविध पर्याय दिसतील, ज्यामध्ये तुमच्या सोयीनुसार Yes किंवा No हा पर्याय निवडून तुमचा अंतिम केवायसी अर्ज दाखल करा.
ekyc केल्यानंतर काय फायदा
तुमचा लाभार्थी यादीतील नाव निश्चित केला जाईल, म्हणजेच या पुढील तुम्हाला हप्ता दिला जाईल. त्यानंतर महत्त्वाचा फायदा म्हणजे शासनाकडून येणारे पैसे थेट तुमच्या आधार लिंक बँक खात्यात जमा करण्यात येतील. महत्त्वाचा व शेवटचा फायदा म्हणजे भविष्यात योजना बंद पडण्याची किंवा पैसे थांबण्याची शक्यता कमी होईल.
ekyc करताना कोणत्या चुका करू नये
1. ज्या लाभार्थी महिलेची केवायसी करत असाल त्यांचाच आधार क्रमांक टाका, चुकीचा आधार क्रमांक टाकू नका.
2. मोबाईल नंबर आधारशी लिंक असल्याची खात्री करा अन्यथा ओटीपी येणार नाही.
3. वेबसाईटवर केवायसी करत असताना तुमची केवायसी झाली असल्याची खात्री होईपर्यंत अर्ज अर्धवट सोडू नका.
4. इतर कोणत्याही ठिकाणी तुम्ही kyc करत असाल, तर ओटीपी सुरक्षेचा भाग असल्यामुळे स्वतः टाका किंवा समोरासमोर खात्री करून घ्या.