Jilha Parishad ZP Bharti 2022 – जिल्हा परिषदांत भरतीचा मार्ग मोकळा 80% टक्के जागा भरण्यासाठी शासनाची मान्यता.
Jilha Parishad ZP Bharti 2022
जिल्हा परिषदेतील गट ‘क’ संवर्गातील विविध पदांची भरती तब्बल चार वर्षांनंतर होत आहे. राज्य सरकारने मंगळवारी (ता. 15) वाहनचालक व गट ‘ड’ संवर्गातील पदे वगळून गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पदे सरळ सेवा प्रक्रियेने भरण्यास मान्यता दिली आहे. मध्यंतरी सर्व पदे महापरीक्षा पोर्टलद्वारे भरण्याचा निर्णय अयशस्वी झाल्यानंतर सरकारने पूर्वीप्रमाणे जिल्हास्तरीय निवड मंडळामार्फेतच जिल्हा परिषदेची पदे भरण्यास मान्यता दिली आहे.
त्यानुसार जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातूनच ही भरती होणार असून त्यासाठी सरकारने भरतीचा कालबद्ध कार्यक्रमही जाहीर केला आहे. जिल्हा परिषदेतील विविध पदांच्या भरतीला चार वर्षांपासून मुहूर्त लागत नसल्याची स्थिती आहे. यापूर्वी जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातून होणारी ही भरती रद्द करता महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून ती हाती घेतली होती. त्यासाठी विविध पदांसाठी जाहिराती काढून अर्ज मागवण्यात आले. Jilha Parishad ZP Bharti 2022
कशी होणार ZP भरती? येथे क्लिक करा
हजारो उमेदवारांनी अर्ज केले व त्यासाठी परीक्षा शुल्कही भरले. मात्र, प्रत्यक्षात परीक्षा झाली नाही, कोट्यवधी रुपयाचे परीक्षा शुल्क वाया गेले. त्यानंतर कोरोनामुळे पदांच्या भरतीला बंदी घालण्यात आली व गेल्यावर्षी तातडीने आरोग्य विभागातील विविध पदे भरण्यासाठीही स्वतंत्र पोर्टल सुरू करून अर्ज मागवण्यात आले. काही पदांसाठी लेखी परीक्षाही घेण्यात आली. या भरती प्रक्रियेतील गैरव्यवहारामुळे त्याचा फायदा झाला नाही.
त्यानंतर आरोग्य विभागातील पदांच्या भरतीला सातत्याने मुदतवाढ दिली गेली. या सर्व गोंधळात मागील चार वर्षांपासून पदांची भरती झाली नाही. यातच सरकारने जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध करण्याचे काम हाती घेतले. ते पूर्ण करूनच भरती प्रक्रिया राबवण्याचे धोरण सरकारने ठेवले होते. मात्र, आकृतिबंधासाठी उशीर होत असल्याने मंगळवारी सरकारने रिक्त असलेल्यांपैकी 80 टक्के पदांची भरतीस मान्यता दिली. येत्या 15 ऑगस्ट 2023 पर्यंत भरतीची ही ऐंशी टक्क्याची मर्यादा कायम ठेवली. सरकारच्या निर्णयानुसार गट ‘क’ संवर्गातील पदांची भरती पूर्वीच्या जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हा निवड मंडळामार्फत होणार आहे. “Jilha Parishad ZP Bharti 2022”
मान्यतेनंतरच आकृतिबंधानुसार भरती Jilha Parishad ZP Bharti 2022
सरकारकडून जिल्हा परिषदेचा सुधारित आकृतिबंध करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. तीस टक्के पदांची कपात करून क्षेत्रीय पातळीवरील पदांच्या संख्येत वाढ करण्याचे प्रयत्न सुरू होते. यातच सरकारने मंगळवारी भरतीचा निर्णय घेत 15 ऑगस्ट 2023 पर्यंत रिक्तपदांच्या ऐंशी टक्के मर्यादिपर्यंत पदे भरण्यास मान्यता दिली. त्यापुढील भरती सुधारित आकृतिबंध मान्य झाल्यानंतर करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे पूर्वीच्या आकृतिबंधानुसारच पदांची भरती होणार असून मोठ्या संख्येने होणाऱ्या पदांच्या भरतीचा लाभ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना होणार आहे. Jilha Parishad ZP Bharti 2022
Recruitment to be fair without corruption and to near & dears. It is a challenge.