आता जीवन प्रमाणपत्र घरबसल्या तुमच्या मोबाईलवर फक्त 5 मिनिटात काढा : फ्री मध्ये एकदम सोप्पी पद्धत | Life Certificate

By Marathi Corner

Published on:

भारतामध्ये पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र हा अतिशय महत्त्वाचा कागदपत्र आहे. उतार वयात शासकीय कर्मचाऱ्यांना कोणाच्याही हाताकडे न पाहता स्वावलंबी होता याव, यासाठी शासनाकडून रिटायरमेंट नंतर पेन्शन दिलं जातं. पेन्शन सतत चालू ठेवण्यासाठी पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना दरवर्षी एकदा हे प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक असते.

पूर्वी जीवन प्रमाणपत्र संबंधित बँक, पोस्ट ऑफिस किंवा सरकारी कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष पेन्शनधारकांना द्यावे लागत असत

परंतु आता यामध्ये सुधारणा करून घरबसल्या जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता बँकेत किंवा कार्यालयात जाऊन रांगेत थांबण्याची आवश्यकता नाही. Digital Life Certificate (Jeevan Pramaan) शासनाच्या या उपक्रमामुळे पेन्शनधारक व्यक्ती आपले जीवन प्रमाणपत्र घर बसल्या काही मिनिटात तयार करून घेऊ शकतात.

जीवन प्रमाणपत्र म्हणजे काय?

जीवन प्रमाणपत्र म्हणजे पेन्शनधारक व्यक्ती जिवंत असल्याचा एखादा पुरावाच असं आपण समजू शकतो. शासकीय निमशासकीय किंवा खाजगी पेन्शनधारकांना दरवर्षी हे प्रमाणपत्र सादर करावे लागते.

यावरून संबंधित व्यक्तीचा पेन्शन खाते क्रमांक सक्रिय ठेवले जातात व लाभार्थी व्यक्तीला पेन्शन रक्कम नियमित मिळत राहते.

जीवन प्रमाणपत्र फायदे (Benefits)

 
  • घरबसल्या प्रमाणपत्र मिळत.
  • वेळ आणि प्रवास वाचतो.
  • ही प्रक्रिया संपूर्ण डिजिटल असल्यामुळे त्वरित माहिती कोणत्याही विभागाकडून दिली जाते.
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनेचे विशेष मुदत होणार आहे.

जीवन प्रमाणपत्रांसाठी Documents

जीवन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्ही जर अर्ज करत असाल, Jeevan प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही गोष्टींची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. प्रमाणपत्र काढत असताना आवश्यक कागदपत्रे अर्जदारांनी सोबत बाळगणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड
  • पेन्शन आयडी
  • नोंदणीकृत मोबाईल नंबर
  • फिंगरप्रिंट किंवा IRIS स्कॅनर
  • इंटरनेट असलेला कम्प्युटर किंवा मोबाईल

जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन कसा काढावा ?

तुम्ही जर सुशिक्षित असाल, तर जीवन प्रमाणपत्र घरबसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन काढू शकता. जवळील आपले सरकार सेवा केंद्र अथवा सीएससी केंद्रामार्फत सुद्धा ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  • सर्वप्रथम पेन्शन धारकांनी Jeevan Pramaan या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • Get a Certificate या पर्यायावर क्लिक करून Windows किंवा Android साठी जीवन प्रमाण डाऊनलोड करून घ्या.
  • त्यानंतर तुमचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक व इतर माहिती भरून घ्या तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाकून सत्यापण प्रक्रिया पूर्ण करा.
  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर बायोमेट्रिक स्कॅनरच्या माध्यमातून तुमची ओळख निश्चित करा.
  • प्रमाणीकरण यशस्वी झाल्यानंतर Automatic ‘Pramaan ID’ तयार होते. हा आयडी भविष्यात पेन्शन विभागाला प्रमाणपत्र देताना उपयोगात येतो, त्यामुळे याची नोंद करून ठेवा.
  • प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर PDF स्वरूपात जीवन प्रमाणपत्र डाऊनलोड करता येत.

वरील प्रक्रिया करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास Play Store वरुन Jeevan Pramaan App डाऊनलोड करून जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन काढू शकता.

📢 महत्त्वाची सूचना : जीवन प्रमाणपत्र दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पेन्शनधारकांना सादर करणे आवश्यक असते. प्रमाणपत्र दिल्यानंतर बँक किंवा पेन्शन विभागाकडून माहिती अपडेट केली जाते.

Leave a Comment