नमस्कार मित्रांनो , आज आपण दहावी , बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.
चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय आहे दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना आणि त्यासाठी काय लागणार आहे, कागदपत्रे, अटी, नियम आणि कोणाला या योजनेचा लाभ घेण्यात येईल, इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
Abdul Kalam Yojana 2024
पुणे महानगरपालिकेतर्फे दरवर्षी १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना Abdul Kalam Yojana व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या योजनांतर्गत शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येते. यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज दि. २४ एप्रिल २०२३ ते ३० जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांनी dbt.punecorporation.org या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरावा. सोबत आवश्यक मूळ कागदपत्रे स्कॅनिंग करून अपलोड करावीत.
काय आहे योजना? किती मिळणार मदत?
दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यासाठी महानगरपालिकेच्या या दोन योजना आहेत. दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १५,०००/- (अक्षरी पंधरा हजार रुपये) रुपयांची मदत देणारी भारतरत्न मौलाना आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना असून बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २५,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार) रुपयांची मदत करणारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना आहे.
योजनेसाठीची पात्रता 2024
- योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावा.
- या योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्याला फेब्रुवारी-मार्च २०२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी किंवा बारावीमध्ये कमीत कमी ८० टक्के गुण असणे आवश्यक.
- पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा रात्रशाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा मागासवर्गीय विद्यार्थी असल्यास अशा विद्यार्थ्याला किमान ७० टक्के गुण असणे आवश्यक.
- योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थी/विद्यार्थीनी जर ४० टक्के अपंग असेल तर अशा विद्यार्थी/विद्यार्थीनीला दहावी किंवा बारावीमध्ये किमान ६५ टक्के गुण असणे आवश्यक.
- योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनीने दहावी किंवा बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतलेला असावा.
अधिक माहितीसाठी 18001030222 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा.
अर्ज करण्याची लिंक – http://dbt.punecorporation.org/
आता शेतकऱ्यांना दर चार महिन्याला मिळणार ४,००० रू. या दिवशी पहिला हफ्ता namo shetkari sanman nidhi yojana 2023
अटी नियम
- रेशनिंग कार्डची पहिले व शेवटचे पान अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक.
- कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावली भाडे करारनामा यांपैकी आवश्यक.
- अर्जदाराचे आधार कार्ड व बँक पासबुक आवश्यक.
- वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला / शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक.
- मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे व अपंगांनी अपंगत्वाचा दाखला आवश्यक राहील.
- बोर्ड मार्कशीट तसेच CBSE & ICSE शाळेतून उत्तीर्ण झाले असल्यास शाळेचे टक्केवारी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक. इयत्ता १० वी इयत्त १२ वी परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ८०% पेक्षा जास्त गुण, पुणे महानगरपालिकेच्या शाळेत अथवा रात्र प्रशालेत शिकत असलेले विध्यार्थी, मागासवर्गीय प्रवर्गातील विध्यार्थी यांना ७०% पेक्षा जास्त गुण ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना ६५% तसेच कचरा वेचक / बायोगॅस प्रकल्पावर काम करणारा/ कचऱ्याशी संबंधित काम करणारा असंघटीत कष्टकरी कामगार यांचे पाल्यास ६५% पेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी लाभासाठी पात्र ठरतील.
- महाविद्यालय प्रवेश शुल्क पावती जोडणे आवश्यक. महाविद्यालय प्रमुखाच्या शिफारसीमधील सर्व रकाने भरून स्कॅनिंग करून अर्ज सोबत अपलोड करावेत.
- दिनांक ०९/०५/२००१ नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यांमुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
- इयत्ता १० वी इयत्ता १२ वी नंतर शासनमान्य वा विद्यापीठ मान्य संस्थेत कोणत्याही एका शाखेत प्रवेश घेतला असल्यास शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येईल.
- पुणे महानगरपालिका अर्थसंकल्पातील उपलब्ध तरतुदीपेक्षा एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास अर्जदारांना समान रक्कम किंवा इयत्ता १० वी कमाल रक्कम रु. १५,०००/- अर्थसहाय्य दिले जाईल व इयत्ता १२ वी कमाल रक्कम रु.२५,०००/- अर्थसहाय्य दिले जाईल.
- मूळ कागदपत्रे स्कॅनिंग करून अर्ज सोबत अपलोड करावेत.
- उपलब्ध आर्थिक तरतूद व नियम अटींचा विचार करुन अर्ज नाकारण्याचा वा स्वीकारण्याचा अधिकार मा. मुख्य समाज विकास अधिकारी, स.वि.वि. पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील. तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील.
conclusion
मित्रांनो , ह्या लेख मध्ये आम्ही दहावी , बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे कि , त्याच हेतू , उद्दिष्ट , ती योजना म्हणजे काय, पात्रता, अटी नियम, अर्ज, कसा करावा इत्यादी, मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल. धन्यवाद !!