म्हाडा लॉटरी 2024 योजना अर्ज सुरू पहा सर्व माहिती | MHADA LOTTERY SCHEME MAHARASHTRA 2024

By Shubham Pawar

Updated on:

MHADA LOTTERY SCHEME MAHARASHTRA: मित्रांनो, म्हाडा अंतर्गत 5990 घरांची ऑनलाईन लॉटरी निघाली आहे. या लॉटरी अंतर्गत पुणे येथे राहण्यास अतिशय चांगली अशी घरे दिली जातात. संपूर्ण महाराष्ट्रातून कोणताही लाभार्थी यासाठी अर्ज करू शकतो. सामान्य लोकांना ही घरे अतिशय स्वस्त दरात मिळावी, हा शासनाचा उद्देश असतो म्हणून ही म्हाडा लॉटरी काढली जात असते. तर आजच्या ह्या लेखात आपण याचविषयी सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MHADA LOTTERY SCHEME MAHARASHTRA TIME TABLE

मित्रांनो, सर्वप्रथम म्हाडा लॉटरी 2023 योजनेंतर्गत अर्जदारांची नोंदणी, ऑनलाईन अर्ज भरणे व स्वीकृतीचे वेळापत्रक पाहुयात.

  • ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची व अर्जाची सुरुवात – 05/01/2023 दु. 12:00 वाजता
  • ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची शेवटची तारीख व वेळ – 06/02/2023 सां. 05:00 पर्यंत
  • सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख व वेळ – 07/02/2023 रात्री 11:59 पर्यंत
  • ऑनलाईन पेमेंट स्वीकृती अंतिम दिनांक – 08/02/2023 रात्री 11:59 पर्यंत
  • बँकेत RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याचा अंतिम दिनांक – 09/02/2023 संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत
  • सोडतीसाठी स्विकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिध्दी – 16/02/2023 सां. 06:00 वाजता
  • सोडतीसाठी स्विकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिध्दी – 20/02/2023 सां. 06:00 वाजता
  • सोडत दिनांक – 24/02/2023 सकाळी 10:00 वाजता
  • सोडतीमधील यशस्वी व प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणे – 24/02/2023 सां. 06:00 वाजता
  • सोडतीचे स्थळ-गृहनिर्माण भवन आगरकर नगर, म्हाडा कार्यालय, पुणे

नोंदणीसाठी व अर्ज करण्यासाठी आवश्यक बाबी

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • बँकेचा रद्द केलेला चेक अथवा पासबुकचे पहिले पान
  • पासपोर्ट फोटो (50 केबी साइज पर्यंत)
  • मोबाईल क्रमांक (व्हॉट्सॲप)
  • ईमेल आयडी

सविस्तर जाहिरात 👉 येथे क्लिक करून पहा

MHADA LOTTERY SCHEME MAHARASHTRA REQUIRED DOCUMENTS

अर्जदारांना पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे जाहिरात प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही त्यामुळे पात्रतेसाठी आवश्यक पुढील कागदपत्रे तयार ठेवावीत

  1. अधिवास / १५ वर्ष महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला.
  2. उत्पन्नाचा पुरावा ०१/०४/२०२१ ते ३१/०३/२०२२ (उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आयकर विवरण पत्र अथवा तहसिलदार दाखला यातील एकुण उत्पन्न ग्राह्य धरले जाईल. गटनिहाय उत्पन्न मर्यादा खाली दर्शविल्या प्रमाणे आहे.
  3. राखीव गटाकरिता पात्रता सिध्द करणारे पुरावे (अधिक माहितीसाठी संकेत स्थळावरील माहिती पुस्तिका पहावी.)
    अर्जदार किंवा त्याची पत्नी / पती किंवा अज्ञान मुले यांच्या नावे मालकी तत्वावर व इतर हक्काव्दारे संपादित केलेले निवासी घर अथवा निवासी भूखंड अर्ज करित असलेल्या योजनेच्या ग्रा. पं./ न. पा./ मनपा हद्दित नसल्याबाबत प्रतिज्ञा पत्र व क्षतीपूर्ती बंधपत्र (Indemnity Bond)) (नमुन्यासाठी संकेतस्थळावरील माहिती पुस्तिका पहावी.)

उत्पन्न मर्यादा खालील प्रमाणे राहील.

1) अत्यल्प उत्पन्न गट (EWS)

  • मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे महानगर क्षेत्र (PMRDA), नागपूर महानगर क्षेत्र (NMRDA) नागपूर सुधार प्रन्यास (NIT) प्रदेश तसेच १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र – रूपये 6,00,000/- पर्यंत
  • उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र – रूपये 4,50,000/- पर्यंत

2) अल्प उत्पन्न गट (LIG)

  • मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे महानगर क्षेत्र (PMRDA), नागपूर महानगर क्षेत्र (NMRDA) नागपूर सुधार प्रन्यास (NIT) प्रदेश तसेच १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र – रूपये 9,00,000/- पर्यंत
  • उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र – रूपये 7,50,000/- पर्यंत

3) मध्यम उत्पन्न गट (MIG)

  • मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे महानगर क्षेत्र (PMRDA), नागपूर महानगर क्षेत्र (NMRDA) नागपूर सुधार प्रन्यास (NIT) प्रदेश तसेच १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र – रूपये 12,00,000/- पर्यंत
  • उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र – रूपये 12,00,000/- पर्यंत

4) उच्च उत्पन्न गट (HIG)

  • मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे महानगर क्षेत्र (PMRDA), नागपूर महानगर क्षेत्र (NMRDA) नागपूर सुधार प्रन्यास (NIT) प्रदेश तसेच १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र – कमाल मर्यादा नाही
  • उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत क्षेत्र – कमाल मर्यादा नाही

📢मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना नव्याने सुरू GR आला 👉 पहा सविस्तर माहिती

MHADA LOTTERY SCHEME MAHARASHTRA ELIGIBILITY

मित्रांनो, या योजनेची पात्रता काय आहे आपण पाहुयात.

अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून स्वतःच्या, पत्नीच्या अथवा अज्ञान मुलांच्या नावे मालकी तत्त्वावर भूखंड अथवा निवासी गाळा घेतला नसल्याबाबतचे तसेच शासकीय गृहनिर्माण संस्थेचा सभासद नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. (सदर अट ही प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य योजनेतील घरांसाठी लागू नाही.)

  • अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. अर्जदार किंवा त्याची पत्नी / पती किंवा अज्ञान मुले यांच्या नावे मालकी तत्वावर व इतर हक्काव्दारे संपादित केलेले निवासी घर अथवा निवासी भूखंड अर्ज करित असलेल्या योजनेच्या ग्रा. पं. / न. पा. मनपा हद्दीत नसावा. अर्जदार महाराष्ट्रातील अधिवासी / मागील २० वर्षामधील १५ वर्षाचा रहिवासी असावा. (केंद्र शासन कर्मचारी प्रवर्ग आरक्षण वगळून)
  • राखीव प्रवर्गाच्या पात्रतेसंबंधी तपशीलवार माहिती संकेतस्थळावर जारी केलेल्या माहिती पुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती व विमुक्त जातीच्या प्रवर्गातील लाभार्थीना जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र प्रत्यक्ष गाळयाचा ताबा घेण्यापुर्वी सादर करणे बंधनकारक राहील.
  • सोडत प्रक्रियेमधील सर्व संपर्क ऑनलाईन अपडेट करण्यात येईल. लेखी पत्रव्यवहार करण्यात येणार नाही. मागील जाहिरातीत पुणे सोडतीमध्ये अर्ज केलेला असल्यास तोच युजर आयडी वापरावा. अन्यथा या सोडतीसाठी नवीन युजर आयडी व पासवर्ड वापरावा. युजर आयडी व पासवर्ड लक्षात ठेवावा. अर्ज भरताना नमूद केलेल्या बँकेच्या खात्यावरच अनामत रक्कमेचा परतावा करण्या येणार असल्यामुळे बँक खातेक्रमांक IFSC कोड काळजीपूर्वक व अचूक नमूद करावा. नियोजित प्रकल्पातील योजनांचे चटई क्षेत्रफळ, विक्री किंमत व सदनिकांची संख्या अंदाजित असून त्यामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यशस्वी अर्जदार पात्र ठरल्यास अशा लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आवश्यक मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क व जी.एस.टी. अदा करावा लागेल.
  • म्हाडाने कोणत्याही प्रकारच्या एजंटची नेमणूक केलेली नाही तसेच संगणकीय सोडतीत कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेप होऊ शकत नाही. याकरिता अर्जदारांना सुचित करण्यात येते की, अशा प्रकारच्या कोणात्याही प्रलोभनाला बळी पडू नये. * या योजने अंतर्गत आलेला कोणताही अर्ज किंवा सर्व अर्ज कोणतेही कारण न देता नाकारण्याचा किंवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचा अधिकार मुख्य अधिकारी / पुणे मंडळ यांनी राखून ठेवला आहे.
  • जाहिरात व सोडतीच्या अनुषंगाने काही नवीन सूचना असल्यास www.mhadamaharashtra.gov.in तसेच https://lottery.mhada.gov.in संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील.
  • जाहिरातीमध्ये अनावधानाने झालेल्या छपाईच्या चुकांचा कोणत्याही प्रकारे अर्जदारास फायदा घेता येणार नाही. सदर योजनेतील यशस्वी लाभार्थ्यांनी तेथे स्थापन होणाऱ्या गृहनिर्माण संस्थेचे सभासद होणे बंधनकारक राहील.
  • अनामत रक्कम परताव्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज दिले जाणार नाही. अर्जदारास एका संकेतातील एकाच आरक्षण गटामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज करता येणार नाहीत असे आढळल्यास असे अर्ज सोडतीपुर्वी रद्द केले जातील. विशेष सूचना – यशस्वी झालेल्या अर्जदारांनी अनामत रक्कमेचा परतावा मागितल्यास अर्जासोबत भरलेल्या रक्कमेतून 50% रक्कम कपात करण्यात येईल.

म्हाडा लॉटरी 2023 ऑनलाईन फॉर्म कसा भरावा? 👉हा विडिओ पहा

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत अर्ज करणार्‍या अर्जदारांच्या अटी व शर्ती

  • अर्जदार व अर्जदाराच्या कुटुंबाचे नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे.
  • अर्जदारास अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नोंदणी असणे अथवा नोंदणी करणे आवश्यक आहे. वरील प्रमाणे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घटक क्र. 3 मध्ये नोंदणी केलेला असल्यास अर्ज क्रमांक अर्जात नमूद करणे आवश्यक आहे.
  • प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकासाठी अर्जदार कुटूंबामध्ये पती-पत्नी व अविवाहित मुले यांचा समावेश असेल तसेच सदनिकांसाठी कुंटूबातील कर्त्या महिलाच्या किंवा कुटूंबातील कर्ता पुरुष व महिला यांच्या संयुक्त नावावर असतील.
  • प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यास केंद्र व राज्य शासनाचे मिळून एकूण रू. 2.50 लक्ष प्रति सदनिका अनुदान मिळेल.
  • पात्र अशा लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आवश्यक मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, भुईभाडे व अकृषीक आकार अदा करावा लागेल.
  • विशेष सूचना – यशस्वी झालेल्या अर्जदारांनी अनामत रक्कमेचा परतावा मागितल्यास अर्जासोबत भरलेल्या रक्कमेतून 50% रक्कम कपात करण्यात येईल.

15% सामाजिक गृहनिर्माण अंतर्गत अर्ज करणा-या अर्जदारांच्या अटी व शर्ती

  • विशेष सुचना : या योजनेतील सदनिका महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 08/03/2019 विशेष धोरणानुसार 15% सामाजिक गृहनिर्माण योजने अंतर्गत उपलब्ध होत आहेत. अधि सुचने मधील कलम 9.8 मधील तरतुदिनुसार यशस्वी लाभधारकांना योजनेस भोगवटा प्रमाण पत्र प्राप्त झालेल्या वर्षासाठी लागू असलेल्या वार्षिक दरसूची प्रमाणे सदनिका बांधकाम खर्चाच्या 10% रक्कम एकवेळेस (One time Maintenance) पायाभूत सुविधा देखभाल व इमारत दुरुस्तिच्या देखभाल खर्चा पोटी ठेव स्वरुपात विकसकाकडे जमा करणे बंधनकारक राहिल.
  • कलम 9.10 च्या तरतुदिनुसार सदर योजनेतील यशस्वी लाभार्थ्याना सर्वप्रकारचे शासकीय कर जसे मुद्रांक शुल्क, जीएसटी, इत्यादी तसेच सामायिक सुविधा यांचा प्रत्यक्ष वापर करणे करीता आवश्यक शुल्क विकसकास देणे बंधनकारक राहिल.
  • विशेष सूचना यशस्वी झालेल्या अर्जदारांनी अनामत रक्कमेचा परतावा मागितल्यास अर्जासोबत भरलेल्या रक्कमेतून 50% रक्कम कपात करण्यात येईल.

तर मित्रांनो, आजच्या ह्या लेखात आपण म्हाडा अंतर्गत 5990 घरांची ऑनलाईन लॉटरी (MHADA LOTTERY SCHEME MAHARASHTRA) निघाली आहे, त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्या https://marathicorner.com/ ह्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment