Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024 – महाराष्ट्र राज्यातील 6 वर्षांखालील बालकांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करणे हे आयसीडीएस आयुक्तालयाचे दायित्व आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि शाला-पूर्व शिक्षण यांची संकलित सेवा पुरवू इच्छिते. लहान बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या समस्या त्याच्या किंवा तिच्या मातेचा विचार न करता सोडविता येणे शक्य नाही आणि म्हणूनच हा उपक्रम किशोरावस्थेतील मुली, गरोदर महिला तसेच स्तनदा माता यांच्यापर्यंत विस्तारीत करण्यात आला आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालयाची प्रमुख उद्दिष्टे :
- 6 वर्षा खालील गरीब लहान मुलांच्या आरोग्य आणि पोषणचा दर्जा वृध्दीगंत करणे.
- लहान मुलांच्या सुयोग्य संतुलित मानसिक, शाररिक आणि सामाजिक विकासाचा पाया तयार करणे.
- लहान मुलांमधील आकस्मिक मुत्यूचे प्रमाण कमी करणे, कुपोषण आणि शाळा बाह्यतेला प्रतिबंध करणे.
- राज्यातील मुलांच्या विकासाच्या उद्देशाने विविध शासकीय उपक्रम आणि योजना राबविणाऱ्या विविध शासकीय विभागामध्ये धोरण सुनिश्चिती आणि अंमलबजावणी करण्याकरिता समन्वय साधणे.
- राज्यातील लहान मुलांच्या मातांना आरोग्य आणि पोषण मुल्यांची माहिती आणि प्रशिक्षण देणे जेणे करून मुलांचे संगोपन करण्याच्या त्यांच्या क्षमता वृध्दीगंत होतील. [Ekatmik Bal Vikas Seva Yojana ]
- लहान मुलांच्या मातांना आणि गर्भवती महिलांना देखील पोष्टिक आहार पुरविणे.
- योग्य पोषण आहार व आरोग्य शिक्षण याद्वारे बालकांचे आरोग्य पोषणयुक्त राहिल याबाबतच्या आवश्यकते बाबतची काळजी घेण्यासाठी मातांना सक्षम व योग्य बनविणे.
Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2024
आयसीडीएसच्या सुविधा आयसीडीएसच्या केंद्रांच्या मार्फत पुरविण्यात येतात, ज्यास “अंगणवाडी” म्हणून ओळखले जाते. लहान मुलांची चांगली देखभाल आणि विकासाचे केंद्र, जे कमीत कमी खर्चात स्थानिकपातळीवरील उपलब्ध साधन सामुग्रीतून अगदी अंगणातच चालविता येते अशी अंगणवाडीची संकल्पना आहे. {Ekatmik Bal Vikas Seva Yojana }
अंगणवाडी केंद्र हे “अंगणवाडी कर्मचारी” (AWW) आणि “अंगणवाडी सहायिका” (AWH) चालवितात. स्थानिक पातळीवरील अंगणवाडी केंद्र हा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा प्रमुख आधारभूत उपक्रम आहे.
आय सी डी एस, हा भारत सरकारने पुढाकार घेऊन सुरु केलेल्या उपक्रमापैकी एक असून राज्यातील महिला व बाल विकास विभागामार्फत कार्यान्वित करण्यात येतो.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना
आय सी डी एस लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि शालापूर्व शिक्षण सेवा संकलित स्वरुपात पुरवू इच्छिते.
लहान बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या समस्या त्याच्या किंवा तिच्या मातेचा विचार न करता सोडविता येणे शक्य नाही आणि म्हणूनच या उपक्रमाची व्याप्ती किशोरावस्थेतील मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यापर्यंत विस्तारण्यात आली आहे. \”Ekatmik Bal Vikas Seva Yojana \”
आय सी डी एस उपक्रम मुलांना आणि मातांना त्यांच्या गावात किंवा वार्डात सर्व पायाभूत आवश्यक सेवा एकत्रितपणे पुरवू इच्छिते. ही योजना शहरी झोपडपट्ट्यामधून आणि ग्रामीण तसेच आदिवासी विभागातून टप्याटप्याने विस्तारली आहे.
राज्यात आय सी डी एस उपक्रमाचे एकूण 553 प्रकल्प कार्यरत असून 364 ग्रामीण, 85 आदिवासी विभागात आणि 104 शहरी झोपडपट्ट्यांमध्ये आहेत.
या योजनेतंर्गत लाभार्थींना पुरविण्यात येणाऱ्या काही प्रमुख सेवा :
- पुरक पोषण आहार
- लसीकरण
- आरोग्य तपासणी
- संदर्भ आरोग्य सेवा
- अनौपचारीक शाला-पूर्व शिक्षण
- पोषण आणि आरोग्य शिक्षण
Ekatmik Bal Vikas Seva Yojana