प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महाराष्ट्र | Pradhan Mantri Matru Vandana Yojana in Marathi

By Shubham Pawar

Published on:

Pradhan Mantri Matru Vandana Yojana in Marathi: देशात दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसूतीनंतर शारिरीक क्षमता नसतानाही मजूरीसाठी काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. परिणामी देशाच्या मातामृत्यू व बालमृत्यूच्या दरात वाढ होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माता व बालमृत्यू दरावर नियंत्रण ठेवून हा दर कमी करण्यासाठी आणि माता व बालकाचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने १ जानेवारी २०१७ पासून केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना संपूर्ण देशात सुरु केली आहे.

या योजनेंतर्गत माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात रहावा हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 

Pradhan Mantri Matru Vandana Yojana Maharashtra

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत शासनाने अधिसूचना केलेल्या संस्थेत अथवा शासकीय रुग्णालयात नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस पहिल्या जीवित अपत्यापर्यंत लाभ दिला जात असून ५ हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येते.

वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. पात्र गर्भवती महिलेस ३ टप्प्यात डीबीटीद्वारे संबंधित गर्भवती लाभार्थी महिलेच्या थेट संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यामध्ये लाभाची रक्कम थेट जमा केली जाते.

मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर एक हजार रुपये दिले जातात. किमान एकदा प्रसूतीपूर्व तपासणी केल्यास गर्भ धारणेच्या ६ महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा दोन हजार रुपयांचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जातो

तर प्रसुतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही, डिपीटी आणि हिपॅटॅटीस व तसेच पेन्टाव्हॅलेन्ट च्या ३ मात्रा अथवा समतुल्य लसीकरण पूर्ण झाल्यावर दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता लाभार्थ्याच्या खात्यात जमा केला जातो.

 

Pradhan Mantri Matru Vandana Yojana Contact

संपर्क: आशा स्वयंसेविका/अंगणवाडी सेविका/ आरोग्य सेविका/प्राथमिक आरोग्य केद्र/उपकेंद्र/ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय

काम करणाऱ्या महिलांच्या वेतनाचे नुकसान भरून काढण्यासाठी आणि त्यांना योग्य विश्रांती आणि पोषण सुनिश्चित करण्यासाठी. गर्भवती महिला आणि स्तनपान करणा-या मातांचे आरोग्य सुधारणे आणि रोख प्रोत्साहनाद्वारे कमी पोषणाचा प्रभाव कमी करणे.

पहिल्या जिवंत मुलाच्या जन्मादरम्यान गर्भवती महिला आणि स्तनपान करणा-या मातांना 5000/- हप्त्यांमध्ये थेट DBT द्वारे बँक खात्यात पाठवले जातील. योजनेसाठी हेल्पलाईन क्र. : 011-23382393

 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लाभार्थी व नफा

लाभार्थी:
पहिल्या जिवंत मुलाच्या जन्मादरम्यान गर्भवती महिला आणि स्तनपान करणा -या मातांना फायदा होईल.

नफा:
योजनेच्या लाभाची रक्कम थेट DBT द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाईल. सरकार खालील हप्त्यांमध्ये रक्कम भरेल. पहिला हप्ता: गर्भधारणेच्या नोंदणीच्या वेळी 1000 रुपयेज्ञ दुसरा हप्ता: 2000 रुपये, जर लाभार्थीने गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर किमान एक जन्मपूर्व तपासणी केली असेल.

तिसरा हप्ता: 2000 रुपये, जेव्हा मुलाच्या जन्माची नोंदणी केली जाते आणि मुलाने बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हिपॅटायटीस-बीसह पहिली लस सायकल सुरू केली Pradhan Mantri Matru Vandana Yojana in Marathi

 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अर्ज

Scheme या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गर्भवती महिलांना अंगणवाडी केंद्रात तीन फॉर्म (पहिला फॉर्म, दुसरा फॉर्म, तिसरा फॉर्म) भरावा लागेल.

Registration नोंदणी आणि पहिल्या हप्त्यासाठी दावा करण्यासाठी, माता बाल संरक्षण कार्ड किंवा MCP कार्ड, लाभार्थी आणि तिच्या पती आणि तिच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्याच्या तपशीलाची प्रत आणि योग्यरित्या भरलेल्या फॉर्म 1 ए सोबत जमा करणे आवश्यक आहे

  • दुसऱ्या हप्त्यासाठी दावा करण्यासाठी, लाभार्थीने गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर किमान एक जन्मपूर्व तपासणी दाखवणाऱ्या MCP कार्डच्या प्रतीसह योग्यरित्या भरलेला फॉर्म 1B सादर करावा लागतो.
  • तिसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी, लाभार्थीने मुलाच्या जन्म नोंदणीची प्रत आणि एमसीपी कार्ड सादर करावे लागेल जे स्पष्टपणे सूचित करेल की मुलाने लसीकरणाचा पहिला टप्पा जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला आणि बाल विकास कडून विधिवत भरलेला फॉर्म 1 सी सोबत पूर्ण केला आहे.
  • जर वेळोवेळी केलेला अर्ज योग्यरित्या दिला गेला आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जोडली गेली, तर संबंधित अधिकारी हप्त्याची रक्कम जाहीर करेल जी थेट तुमच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्यात जमा होईल. \’Pradhan Mantri Matru Vandana Yojana Maharashtra\’

 

मातृ वंदना योजनेची वैशिष्ट्ये

  • मातृ वंदना योजनेची राज्यात 8 डिसेंबर 2017 पासून अंमलबजावणी झाली आहे. ही योजना केंद्र व राज्य शासन यांच्या सहभागाने आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असून या योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के तर राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग असणार आहे.
  • केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सूचना, निकष, कार्यपद्धती व विकसित केलेल्या संगणक प्रणालीद्वारे आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्यामार्फत प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
  • तसेच त्यांना या योजनेसाठी राज्यस्तरीय समन्वय अधिकारी म्हणून घोषित केले आहे राज्यात 1 जानेवारी 2017 रोजी अथवा त्यानंतर कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील
  • ही योजना एकवेळ आर्थिक लाभाची असून पहिल्या जिवीत अपत्यापुरतीच मर्यादित असून या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल
  • नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ अनुज्ञेय राहील
  • या योजनेत दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही. Pradhan Mantri Matru Vandana Yojana Maharashtra 2024

 

मातृ वंदना योजना संपर्क

ग्रामीण क्षेत्र : एएनएम पात्र लाभार्थींना विनाशूल्य विहित नमुना प्रपत्र 1 अ चा अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्विकारेल व परिपूर्ण अर्ज प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तालुका अधिकाऱ्यांकडे सादर करेल. हा अर्ज भरण्याची जबाबदारी एएनएमची राहील.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अर्जातील माहिती तपासून तो अर्ज तालुका अधिकाऱ्यांकडे जमा करतील. विहित संकेतस्थळावर तालुका अधिकाऱ्यांमार्फत लाभार्थी महिलेच्या अर्जाची माहिती भरण्यात येईल. राज्यस्तरावरुन संगणक प्रणालीद्वारे थेट लाभ अदा करण्यात येईल.

नगरपालिका क्षेत्र : एएनएम पात्र लाभार्थीना विनाशुल्क विहित नमुना प्रपत्र 1 अ चा अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्विकारेल. परिपूर्ण अर्ज हेल्थ पोस्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल.

हेल्थ पोस्ट वैद्यकीय अधिकारी अर्जातील माहिती तपासून तो अर्ज मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करतील. मुख्याधिकारी विहित संकेतस्थळावर लाभार्थी महिलेच्या अर्जाची माहिती भरतील.

महानगरपालिका क्षेत्र : मुंबई तसेच इतर महानगरपालिका क्षेत्रात एएनएम पात्र लाभार्थीं महिलेला विनाशुल्क विहित नमुना प्रपत्र 1 अ चा अर्ज देऊन परिपूर्ण अर्ज स्वीकारतील.

परिपूर्ण अर्ज वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत महानगरपालिकेने निर्धारित केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल. Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2024 Maharashtra

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment