लाडकी बहीण योजना KYC केल्यानंतर या महिलांचे पैसे बंद होणार ! जाणून घ्या सविस्तर माहिती

By Marathi Corner

Published on:

महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी विशेष सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता एक महत्त्वपूर्ण अट ठेवण्यात आली आहे. आता लाडक्या बहिणींना पुढील हप्ता मिळवण्यासाठी eKYC करणे शासनाकडून अनिवार्य करण्यात आले आहे.

लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी करण्यासाठी शासनाकडून शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. या महिन्याच्या 18 तारखेपर्यंत पात्र महिलांना मोबाईलवरून किंवा जवळील सीएससी, आपले सरकार सेवा केंद्रच्या माध्यमातून ई-केवायसी करता येईल.

लाडकी बहीण योजना KYC

पात्र महिलांकडून केवायसी केल्यानंतर शासनाला महिलांची संपूर्ण माहिती मिळणार आहे. कारण के-वायसी करत असताना महिलांच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक मागितला जात आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता सतत मिळवण्यासाठी शासनाकडून काही महत्त्वपूर्ण अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये जर तुम्ही बसत नसाल, तर तुमचा पुढील येणार केवायसी केल्यानंतर सुद्धा बंद पडू शकतो.

हप्ता बंद पडण्याची महत्त्वाची कारण

1. पात्र महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.

2. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत परितक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित स्त्री या योजनेचा लाभ घेऊ शकते.

3. लाडक्या बहिणीसाठी किमान वयाची मर्यादा 21 वर्ष, तर कमाल वयाची मर्यादा 65 वर्षापर्यंत देण्यात आली आहे.

4. लाभार्थी महिलांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक.

5. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

6. ज्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबात एखादा सदस्य इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयकरदाता असेल, तर अशा महिलांचा हप्ता सुद्धा बंद होईल.

7. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारचा स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत तथापि रुपये 2.50 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी/स्वयंसेवी कामगार कर्मचारी पात्र ठरतील.

8. अशा महिलांचा सुद्धा हप्ता बंद केला जाणार आहे, ज्या महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असतील.

9. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार असतील अशा महिलांचा हप्ता सुद्धा बंद केला जातो.

10. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक सदस्य आहेत यांचा हप्ता बंद करण्यात येईल.

11. ज्यांच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदीकृत आहे, अशा लाभार्थी कुटुंबातील महिलांचा हप्ता बंद करण्यात येईल.

वरील सर्व कारणाव्यतिरिक्त महिलांनी ऑनलाईन ई-केवायसी करत असताना कोणत्याही प्रकारची चूक केल्यास त्यांचा पुढील येणारा हप्ता कायमस्वरूपी बंद होऊ शकतो, याची लाभार्थी महिलांनी नोंद घ्यावी.

त्यामुळे तुम्ही अद्याप केवायसी केलेली नसेल, तर केवायसी करत असताना काळजीपूर्वक संपूर्ण माहिती वाचून त्यानंतरच केवायसी करावी. जेणेकरून तुमच्या हातून केवायसी करत असताना कोणतीही चूक होऊ नये; कारण केवायसी एकदा झाल्यास अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्याचा पर्याय संबंधित विभागाकडून देण्यात आलेला नाही.

Leave a Comment