सध्याच्या डिजिटल युगामध्ये पॅनकार्ड अत्यंत महत्त्वाचा कागदपत्र मानला जातो. कारण कोणताही आर्थिक व्यवहार करत असताना संबंधित विभागाकडून किंवा संस्थांकडून PAN Card संदर्भात चौकशी केली जाते. आणि शासकीय व खाजगी कामासाठी सुद्धा आता प्रत्येक ठिकाणी PAN कार्डची आवश्यकता भासत आहे.
बँकेत नवीन खाते उघडणं असेल किंवा मग बँकेतील एखादा मोठा व्यवहार असेल अथवा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरावयाचा असेल, अशा सर्व ठिकाणी आपल्याला पॅन कार्ड शिवाय पर्याय नाही.
तुम्ही आणखी सुद्धा तुमचा पॅन कार्ड काढले नसेल किंवा तुमचा पॅन कार्ड हरवला असेल, तर काळजी करण्याची आवश्यकता नाही यासंदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
106 रुपयात नवीन PAN CARD
तुम्ही अजूनही तुमच PAN Card काढल नसेल किंवा तुमचं जुन पॅनकार्ड हरवले असेल, तर काळजी करू नका. आता नवीन पॅनकार्ड काढण एकदम सोपं झालं आहे. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही एजंटकडे किंवा ऑनलाइन सर्विस सेंटर, सायबर कॅफेवर जाण्याची गरज नाही.
आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरुन फक्त 106 रुपयात (जीएसटीसह ₹107) नवीन PAN कार्डसाठी अर्ज करू शकता. नवीन नियमानुसार आता डिजिटल पॅन कार्ड फक्त काही तासात अर्जदारांना ऑनलाईन अर्ज केल्यानंतर भेटेल.
नवीन पॅन कार्डसाठी पात्रता
- 18 वर्षाच्या वरील कोणत्याही भारतीय नागरिकांना पॅन कार्डसाठी अर्ज करता येतो.
- 18 वर्षाच्या आतील अर्जदार आपल्या पालकांच्या नावाने पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतात.
- कंपन्या, भागीदारी संस्था (Partnership Firms), हिंदू अविभक्त कुटुंब आणि ट्रस्ट यांनाही पॅन कार्ड घेणे अनिवार्य असते.
- अनिवासी भारतीय (NRI) देखील पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतात.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
नवीन पॅन कार्ड किंवा पॅन कार्ड दुरुस्तीसाठी शासनाकडून 2 अधिकृत पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. एक म्हणजे NSDL आणि दुसरा UTIITSL या दोन्ही पोर्टलच्या माध्यमातून अर्जदार सहज व सोप्या पद्धतीने ऑनलाईन पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतात.
दोन्ही पोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया जवळपास सारखीच असून भारतीय पत्त्यासाठी अर्जाचा शुल्क 107 रुपये सारखाच आहे. NSDL पोर्टलच्या माध्यमातून नवीन पॅन कार्डसाठी अर्ज कसा करावा ? यासंदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला या लेखाच्या शेवटी देण्यात आली आहे.
PAN कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
- ओळखीचा पुरावा – आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट इत्यादी
- जन्मतारखेचा पुरावा – जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, दहावीची मार्कशीट
घरबसल्या पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत
1. सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये NSDL यांची अधिकृत वेबसाईट उघडा.
2. वेबसाईट उघडल्यानंतर अर्ज करताना New PAN – Indian Citizen फॉर्म 49A हा पर्याय निवडा.
3. अर्जामध्ये संपूर्ण व्यवस्थित माहिती भरून घ्या. Application Type – New PAN Indian Citizen (Form 49A) निवडा.
4. तुम्ही जर व्यक्तिगत अर्ज करत असाल तर Category – Individual निवडा.
5. त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती जशाप्रकारे संपूर्ण नाव, जन्मतारीख, ई-मेल आयडी व आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकून घ्या.
6. सर्व माहिती भरल्यानंतर की आमच्याकडे टाकून अर्ज सबमिट करा.
7. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तात्पुरता टोकन नंबर दिला जाईल. टोकन नंबर मिळवा आणि लिहून ठेवा. अर्जामध्ये काही त्रुटी आल्यास token नंबरच्या मदतीने परत त्याच ठिकाणाहून अर्ज करता येतो.
8. त्यानंतर Continue with PAN Application Form वर क्लिक करा.
9. त्यानंतर तुमचा फॉर्म भरून घ्या आणि कागदपत्र जमा करण्याची पद्धत निवडा. कागदपत्र जमा करण्याच्या पद्धतीमध्ये e-KYC & e-Sign हा पर्याय निवडा.
10. हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्या आधार लिंक मोबाईलवरती एक ओटीपी शेवटच्या स्टेप मध्ये पाठवण्यात येईल.
11. त्यानंतर तुमची सर्व माहिती व्यवस्थित भरून AO Code निवडून घ्या. AO Code निवडल्यानंतर पुढील स्टेट मध्ये तुम्हाला शुल्क भरणा करावा लागेल.
12. आता तुम्हाला 106 किंवा 107 रुपये ऑनलाइन शुल्क भरावा लागेल. तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून ऑनलाइन शुल्क भरू शकता.
13. शुल्क भरणा केल्यानंतर तुम्हाला esign किंवा ekyc करण्यासाठी तुमच्या आधार लिंक मोबाइलवर ओटीपी येईल. आलेला ओटीपी टाकून त्याठिकाणी तुमचा अंतिम अर्ज सबमिट करा.
PAN कार्ड किती दिवसात मिळणार ?
अर्ज केल्यानंतर काही तासात किंवा कमीत कमी 2 दिवसात तुमच्या ई-मेल आयडीवर ई-पॅन कार्ड म्हणजेच पॅन कार्डची सॉफ्ट कॉपी PDF स्वरूपात पाठविण्यात येईल.
E-PAN कार्ड मिळाल्यापासून पुढील 7 ते 15 दिवसात तुमच्या आधार कार्डवरील पत्त्यावर पोस्टाच्या माध्यमातून प्लास्टिकचे पॅन कार्ड येईल.