तुमच्याकडे किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे पॅन कार्ड असेल, तर हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा. कारण शासनाकडून आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आलेल आहे.
पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड (Adhar Card) एकमेकांना कसे जोडायचं म्हणजेच लिंक कसं करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
PAN कार्ड ADHAR कार्ड लिंक
पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण आयकर विभागाकडून आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1,000 रुपये इतका विलंब शुल्क आकारला जात आहे.
तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक नसेल, तर बऱ्याच शासकीय कामांमध्ये किंवा इतर कामांमध्ये अडथळा येऊ शकतो. त्यामुळे त्वरित तुमच्या पॅन कार्डला तुमचा आधार कार्ड ऑनलाइन घरबसल्या लिंक करून घ्या.
पॅन-आधार लिंक करण का गरजेच आहे ? फायदा काय ?
बहुतांश नागरिकांना वाटते की आता हा शासनाचा काहीतरी खेळ आहे. पण तसं नाही थांबा, याचे अनेक फायदे आहेत तुम्ही खालीलप्रमाणे बघू शकता.
1. सर्वप्रथम शासनाचा हा नवीन नियम आहे, तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक असावा लागतो. नाहीतर तुमचा पॅन कार्ड बंद होऊ शकत आणि पॅन कार्ड बंद झाल्यास बँकेची बरीच काम अडकून पडतात.
2. बँकेत जर तुम्हाला 50,000 रुपयांच्यावर पैसे काढायचे असतील किंवा भरायचे असतील, तर पॅन कार्ड लागतं त्यामुळे आधार कार्ड लिंक नसेल, तर बँकेतील कर्मचारी तुमचं काम करणार नाहीत किंवा नवीन खाते काढून देणार नाहीत किंवा इतर बँकेच्या कामात अडथळा येईल.
3. ज्या व्यक्तीकडून टॅक्स भरला जातो त्यांच्यासाठी तर पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण यामुळे शासनाला तुमची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी मिळते आणि व्यवहार पारदर्शकरित्या होतो.
4. तुम्हाला जर म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर त्यासाठी पॅन-आधार लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे.
5. फसवणूक टाळण्यासाठी आधार पॅन लिंक आवश्यक आहे; कारण एका माणसाच्या नावावर एकच पॅन कार्ड असावा लागतो आणि आधार पण लिंक केल्यामुळे या फसवणुकीला आळा बसतो.
6. मोठी खरेदी विक्री म्हणजेच जमीन घर किंवा गाडी घेत असताना पॅन कार्ड महत्त्वाचा असतं त्यामुळे अशा ठिकाणी सुद्धा पॅन-आधार लिंक नसल्याने अडचणी येऊ शकते.
पॅन-आधार लिंकसाठी फी किती ?
सुरुवातीला पॅन-आधार लिंक करण्यासाठी आयकर विभागाकडून कोणत्याही प्रकारची फीस आकारले जात नव्हती म्हणजेच हे काम सुरुवातीला फुगट होत होतं.
शासनाकडून बऱ्याच वेळी पॅन धारकांना सवलत देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली ; परंतु आता खूपच उशीर झाल्यामुळे शासनाकडून दंड लावण्यात आला आहे. सध्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1,000 रुपये दंड किंवा फीस भरावी लागते. फीस ऑनलाइन भरल्यानंतर तुमची आधार-पॅन लिंक प्रक्रिया पूर्ण होते.
PAN-ADHAR लिंक ऑनलाईन पद्धत
- सर्वप्रथम तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- यासाठी तुम्ही गुगलवर जाऊन Income Tax Website टाकल्यानंतर सर्वप्रथम तुमच्यासमोर पहिली सरकारी वेबसाईट येईल.
- ती वेबसाईट उघडा, त्या ठिकाणी e-Pay Tax नावच एक बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- आता एक नवीन विंडो तुमच्यासमोर उघडेल त्याठिकाणी तुमचा पॅन क्रमांक दोन वेळेस टाका मग तुमचा मोबाईल नंबर टाका.
- तुमच्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP पाठवण्यात येईल तो OTP त्याठिकाणी टाका.
- आता इन्कम टॅक्स हा पर्यायावर क्लिक करा.
- आता ‘Assessment Year’ 2024-2025 निवडा.
- Type of Payment मध्ये Other Receipts (500) हा पर्याय निवडा.
- त्यानंतर खाली Automatically 1,000 रुपये रक्कम दिसेल. Continue किंवा पुढे जा या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्हाला ऑनलाईन पैसे भरण्यासाठी विचारणा केली जाईल तुमच्याकडे नेट बँकिंग डेबिट कार्ड असेल, तर त्या माध्यमातून तुम्ही पैसे भरू शकता किंवा यूपीआय पेमेंटसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
- पैसे भरल्यानंतर पैसे भरल्याची पावती डाऊनलोड करून ठेवा.
पैसे भरल्यानंतर पुढील तुम्हाला 7 ते 15 दिवस थांबावे लागतील; कारण संबंधित विभागाकडे पैशाचा भरणा झाल्यानंतर आयकर विभागाकडून इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक केला जाईल.
तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक झाला किंवा नाही या संदर्भातील तपासणी तुम्ही ऑनलाईन आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर तपासू शकता. वेबसाईटवर गेल्यानंतर Link Adhar Status या पर्यायावर क्लिक करून पॅन कार्ड व आधार कार्डची माहिती दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या पॅन-आधार लिंक स्टेटसची माहिती भेटून जाईल.
📢 महत्त्वाची माहिती : पॅन-आधार लिंक करत असताना तुमच्या पॅन कार्डवरचं नाव, जन्मतारीख आणि लिंग (पुरुष/स्त्री) तुमच्या आधार कार्डवरच्या माहितीशी तंतोतंत जुळते काय याची खात्री करून घ्या. जर यामध्ये फरक असल्यास पॅन आधार लिंक होण्यासाठी अडचण येऊ शकते.
त्यासाठी जर तुमच्या आधार कार्डमध्ये चूक असेल, तर जवळच्या आधार केंद्रात जाऊन ती दुरुस्ती करून घ्या. जर तुमच्या पॅन कार्ड मध्ये चूक असेल, तर पॅन कार्डच्या ऑफिसमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने दुरुस्तीचा अर्ज करून पॅन कार्ड दुरुस्त करून घ्या.