नमस्कार मित्रांनो , आज आपण महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा (Maharashtra Students Innovation Challenge) या स्पर्धेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात , काय आहे ही स्पर्धी आणि त्यासाठी काय लागणार आहे, कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतात , सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येयील इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
महाराष्ट्रातील युवकांना नवीन नवीन कल्पनांवर काम करण्यासाठी तो प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाद्वारे एक उपक्रम राबविल्या जात आहे. उपक्रम म्हणजे महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा. विद्यार्थ्यांमधील उद्योजकता पुढे आणण्यासाठी व नवीन उद्योजक निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना दहा लाखापर्यंतचे बीज भांडवल मिळणार आहे. महाविद्यालयीन वयामध्ये असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक सुपीक आणि बदल घडवून आणणाऱ्या कल्पना येत असतात की ज्या एका मूर्त उद्योगाचा स्वरूप घेऊ शकतात. अशा कल्पनांना चालना देण्यासाठी व रोजगार निर्मितीला बळकटी देण्यासाठी हा उपक्रम मदत करणार आहे. बहुतांश विद्यार्थी सरकारी नोकरी आणि पॅकेजेस च्या मागे धावत असताना विद्यार्थ्यांना उद्योजकताकडे वळवणे हा हेतू देखील या उपक्रमांमधून साध्य होऊ शकतो.
Maharashtra State Innovation Society
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही महाराष्ट्र राज्यातील नवोन्मेष चालित उद्योजकीय परिसंस्थेला चालना देण्यासाठी नोडल सरकारी एजन्सी आहे. महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या या सोसायटीचे उद्दिष्ट नाविन्यपूर्ण दृष्टीकोनांना चालना देणे आणि नाविन्यपूर्ण व्यवसायांना महाराष्ट्रात चालवण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आहे.
Maharashtra Students Innovation Challenge पात्रता
महाराष्ट्रातील कोणत्याही संस्थेतील विद्यार्थी Maharashtra Students Innovation Challenge साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवार त्यांच्या संबंधित संस्थेच्या नावाखाली challenge साठी अर्ज करू शकतात. आयटीआय चे विद्यार्थी देखील यासाठी पात्र आहे. त्याचप्रमाणे इनोव्हेटर विद्यार्थी देखील यामध्ये सहभागी होऊ शकतात.
वेळापत्रक
सुरुवातीची तारीख | शेवटची तारीख | कार्यक्रम |
15-07-2023 | 31-08-2023 | संस्था नोंदणी |
01-08-2023 | 15-09-2023 | विद्यार्थ्यांची नोंदणी आणि आयडिया सबमिशन |
17-10-2023 | 17-10-2023 | प्रत्येक जिल्ह्यात टॉप 100 सर्वोत्तम |
19-10-2023 | 30-10-2023 | प्रत्येक जिल्ह्यात सर्वोत्तम 100 सर्वोत्तम कल्पनांसाठी बूटकॅम्प |
01-11-2023 | 15-11-2023 | जिल्हास्तरीय पिचिंग |
20-11-2023 | 20-11-2023 | जिल्हा विजेत्यांची घोषणा |
कशी असेल स्पर्धा?
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाविद्यालय तसेच आयटीआय मध्ये शिक्षण घेत असलेल्या तीन विद्यार्थ्यांचा गट पात्र असेल. नाविन्यपूर्ण संकल्पना त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे. पहिल्या टप्प्यात विविध शैक्षणिक संस्थांची या उपक्रमासाठी नोंदणी करून त्यातून एका संस्थेच्या माध्यमातून उत्तम दोन संकल्पनांची निवड केली जाईल. दुसरा टप्प्यात सर्व संस्थांमधून आलेल्या एकूण संकल्पना मधून सर्वोत्कृष्ट 100 संकल्पनाची जिल्हास्तरीय सादरी करण्यासाठी निवड केली जाईल. यातून सर्वोत्कृष्ट दहा विजेते निवडले जातील विजेत्या घटना प्रत्येकी एक लाख रुपयांची बीज भांडवल देण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 36 जिल्ह्यांमधून निवडलेले एकूण 360 नवउद्योजकांच्या संकल्पनांचे राज्यस्तरावर सादरीकरण केले जाईल. यातून निवडलेल्या सर्वोत्कृष्ट दहा नवउद्योजकांना प्रत्येकी पाच लाख रुपये भांडवल देण्यात येणार आहे.
Registration कसे करायचे?
- Maharashtra State Innovation Society च्या वेबसाइट ला भेट द्या.
- Maharashtra Student Innovation Challenge (MSIC) या बटणावर क्लिक करा.
- Innovator Registration पूर्ण करा.
- संपूर्ण अर्ज भरा आणि पुढील बटणावर वर क्लिक करा. (संघात अनेक सदस्य असल्यास, सदस्य जोडा वर क्लिक करून सर्व सदस्यांचे वैयक्तिक तपशील भरा.)
- टीम लीडर च्या इन्स्टिट्यूट ची माहिती भरा.
- इनोव्हेशन तपशील भरा आणि फॉर्म सबमिट करा.
- इनोव्हेटर नोंदणी फॉर्म सबमिट करून नोंदणी यशस्वी करा.
Conclusion
मित्रांनो , ह्या लेख मध्ये आम्ही महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा (Maharashtra Students Innovation Challenge) या स्पर्धेविषयी माहिती दिली आहे जसे कि उद्दिष्ट , ती स्पर्धा म्हणजे काय इत्यादी ,मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल.
The blog showcases the incredible innovation and talent of Maharashtra students. The writer has done a great job highlighting their achievements. Kudos to the author for shedding light on such inspiring stories!
Ham hai 3sir Mahavidyalaya madhe
Ham hai