ब्रेकिंग न्यूज!! आपली मागील सहामाही पेन्शन लवकर काढून घ्या नाहीतर बॅंक पुन्हा सरकारला देईल

मुंबई: सहा महिन्यांत निवृत्तिवेतनाची उचल न करणाऱ्या निवृत्तिवेतनधारकांच्या खात्यातील शिल्लक रक्कम त्वरित संबंधित कोषागारात जमा करण्याचे आदेश राज्य सरकारने सर्वकाना दिले आहेत. करोना काळात मृत्यू पावलेल्यांच्या खात्यातून परस्पर निवृत्तिवेतनाचे पैसे काढल्याचे प्रकार उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले असून हयातीचा पुरावा दिल्यानंतर अशा व्यक्तीचे निवृत्तिवेतन देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उपरोक्त विषयास अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, महाराष्ट्र कोषागार नियम 1968 यातील नियम 358, 360 नुसार ज्या निवृत्तीवेतन धारक/ कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी मागील सहा महिन्यापेक्षा अधिक काळ निवृत्तीवेतनाची उचल केलेली नाही अशा निवृत्तीवेतन धारकांचे खात्यामध्ये असलेली संपूर्ण जमा रक्कम वरिष्ठ कोषागार अधिकारी, नागपूर यांचे नावाने धनाकर्षाद्वारे पाठवावयाचे आहे.

त्यानुसार नागपूर कोषागार कार्यालयामार्फत आपले शाखेतून निवृत्तीवेतन घेत असलेल्या ज्या निवृत्तीवेतनधारक/कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी मागील सहामाही कालावधीत निवृत्तीवेतनाची उचल केलेली नाही अशा निवृत्तीवेतनधारकांचे खात्यामध्ये जमा असलेली संपुर्ण रक्कम विना विलंब वरिष्ठ कोषागार अधिकारी नागपूर यांचे नावाने धनाकर्षाव्दारे या कार्यालयास पाठवावी. हि विनंती.

सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यास त्याच्या हयातीत निवृत्तिवेतन मिळते, कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्याच्या तर वारसांना कुटुंब निवृत्तिवेतन दिले जाते. निवृत्तिवेतनधारकांना वर्षातून एकदा हयातीचा पुरावा सादर करावा लागतो. मात्र गेल्या दीड वर्षात करोनामुळे अनेक निवृत्तिवेतनधारकांचे निधन झाले आहे.

अशा सेवानिवृत्तांच्या खात्यात जमा होणारे निवृत्तिवेतन कुटुंबीयांकडून परस्पर काढण्याचे तसेच काही ठिकाणी निवृत्तिवेतनधारकाच्या खात्यातील रकमेचा बँकेकडून परस्पर उपयोग करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

त्याची दखल घेत ज्यांच्या खात्यावरील रक्कम गेल्या सहा महिन्यांत उचलली गेली नाही अशा सेवानिवृत्तधारकांचा शोध घेण्याची मोहीम सरकारने सुरू केली आहे. (Breaking News !! Withdraw your previous half year pension early or the bank will pay back to the government)

त्यानुसार ज्या निवृत्तिवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तिवेतनधारकांनी गेल्या सहा महिन्यांत निवृत्तिवेतनाची उचल केलेली नाही, अशा निवृत्तिवेतनधारकांच्या खात्यात जमा असलेली संपूर्ण रक्कम विनाविलंब कोषागारात जमा करण्याचे आदेश राज्यभरातील बँकांना देण्यात आले आहेत.

तसेच बँकांनी जानेवारी आणि जुलैमध्ये निवृत्तिवेतनधारकांच्या खात्यांचा तपशील सादर करावा असेही सांगण्यात आहे आहे. ज्यांच्या खात्यातील निवृत्तिवेतनाची रक्कम कोषागारात जमा करण्यात येणार आहे, ती रक्कम संबंधित व्यक्तीने हयातीचा दाखला सादर केल्यावरच दिली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment

close button