व्हॉट्सॲप वर आले नवीन पोल फीचर, पोल करून विचार प्रश्न | WhatsApp Poll Feature

WhatsApp Poll Feature – आता व्हॉट्सअॅपवर करा ‘मतदान’ ! गेल्या अनेक दिवसांपासून व्हॉट्स ॲपचे वापरकर्ते ज्या फीचरची वाट बघत होते ते अखेर आले आहे. व्हॉट्स अॅपची मूळ कंपनी मेटाने निवडक वापरकर्त्यांसह पोल फीचरची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर बुधवारपासून ते अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीसाठी जारी करण्यास सुरुवात केली.

व्हॉट्स अॅप पोल

हे नवीन फीचर ग्रुप चॅटिंगमध्ये आणि वैयक्तिक चॅटिंगदरम्यानही वापरले जाऊ शकते. हे फीचर फक्त ग्रुप्ससाठीच येणार असल्याचे आधी सांगितले जात होते.

याद्वारे तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रश्नावर लोकांचे मत किंवा प्रतिक्रिया जाणून घेऊ शकता. पोलवर उत्तरासाठी 12 पर्याय देता येतात. त्यापैकी कोणत्याही पर्यायांवर क्लिक करून उत्तर देऊ शकतो. “WhatsApp Poll Feature”

आता दाखले मिळणार तुमच्या व्हॉट्सॲप वर येथे क्लिक करा

पोल चा कसा करायचा वापर?

  • सर्वप्रथम व्हॉट्स अॅप अपडेट करा
  • व्हॉट्स अॅप ओपन करा आणि तुम्हाला ज्या ग्रुपमध्ये किंवा वैयक्तिक चॅटिंगसाठी पोल घ्यायचा असेल तिथे क्लिक करा.
  • अॅड्रॉइड वापरकर्त्यांनी चॅटिंग करण्यासाठी मेसेज टाइप करावा लागतो त्याच्या बाजूलाच असलेल्या अटॅचमेंटच्या चिन्हावर क्लिक करावे.
  • आयओएस वापरकर्त्यांनीही मेसेज टाइप करावा लागतो त्याच्या बाजूलाच असलेल्या प्लस ( चिन्हावर क्लिक करावे).
  • आता तुम्हाला लोकेशन, कॉन्टैक्ट्स या पर्यायांसह सर्वात खाली पोल हा नवा पर्याय दिसेल.
  • त्यावर क्लिक करून तुमचा प्रश्न टाईप करा आणि उत्तरासाठी पर्याय द्या
  • अखेरीस सेंड बटणावर क्लिक करा {WhatsApp Poll Feature}

पोल शेअर किंवा फॉरवर्ड करता येणार नाही. यावर फक्त प्रतिक्रिया किंवा उत्तर देता येईल.

आता दाखले मिळणार तुमच्या व्हॉट्सॲप वर येथे क्लिक करा 

Leave a Comment

close button