WhatsApp Don’t make this mistake – व्हॉट्सअॅपने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास
सुरुवात केली आहे. धोरण आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे व्हॉट्सअॅपने एप्रिल महिन्यात तब्बल 16 लाख भारतीयांची खाती बॅन केली.
WhatsApp Don’t make this mistake
काहीजण नियमांचं जाणूनबुजून उल्लंघन करतात, पण अनेकांना नियमांबाबत नीट माहिती नाही, त्यामुळे अनेकदा चुकून उल्लंघन होते आणि नंतर अकाउंट बॅन किंवा कधीकधी कायदेशीर कारवाई देखील होते. हे टाळण्यासाठी काय कराल?
- तुमच्या सतत मेसेज करण्यामुळे जर खूप लोकांनी तुमची तक्रार केली रिपोर्ट केले तरीही अकाउंट बॅन होऊ शकते. त्यामुळे अनेक ग्रुप्सवर त्रासदायक स्पॅम मेसेज टाकू नका.
- खोटे मेसेज बातम्या आणि अफवा पसरवण्याचे आवर्जून टाळा. आलेला कोणताही मेसेज लगेच पुढे ढकलण्याची सवय सोडा.
- जो मेसेज दुसऱ्यांना पाठवताय तो बेकायदा, अश्लील, बदनामीकारक नसल्याची काळजी घ्या, असे मेसेज फॉरवर्ड करू नका.
- द्वेष पसरवणारे, धमकावणारे, जाती धर्माविषयक आणि एखाद्याला त्रास होईल असे मेसेज पाठवू नका.
- मेसेजद्वारे एखाद्याला काहीतरी चुकीचे करण्यास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीचे अकाउंटही बॅन केले जाऊ शकते.
फेक अकाउंट अर्थात खोटे खाते बनवणाऱ्यांवरही बंदी घातली जाते
बल्क मेसेजिंग, जिथे एखादी व्यक्ती किंवा संस्था अनेक फोनवर मोठ्या प्रमाणात एकच संदेश पाठवते, त्यावेळी अॅपवरून प्रतिबंधित केले
जाऊ शकते. हा सहसा घोटाळ्याचा भाग असतो म्हणून व्हॉट्सअॅप अशा खात्यांवर लवकर कारवाई करते. अनधिकृत व्हर्जन वापरले तर?
व्हॉट्सअॅपच्या अनेक कॉपीकॅट आवृत्त्याही उपलब्ध आहेत. सारखेच दिसत असल्याने अनेकांकडून व्हॉट्सअॅप प्लस (WhatsApp Plus) किंवा जीबी व्हॉट्सअॅपसारखे (GBWhatsApp ) चुकीचे व्हर्जन वापरले जाते. फेक व्हर्जन आढळले तर तुम्हाला परत ओरिजनल
व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही, तिथे तुम्हाला बॅन केले जाते.