Voting Card Link With Aadhaar Card Update – आता मतदार कार्ड होणार ‘आधार’ शी लिंक निवडणूक शाखेची मोहीम : 1 ऑगस्ट पासून मोहीम सुरु होणार, मतदारांना आवाहन.
Voting Card Link With Aadhaar Card Update
अहमदनगर मतदार कार्ड आधार कार्डशी जोडण्याची मोहीम 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे एकाच मतदाराचे अनेक ठिकाणी नाव असल्यास ते शोधणे सोपे होणार आहे.
मतदार कार्ड आधार कार्डशी जोडणे ऐच्छिक असले तरी प्रत्येकाने मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. Voting Card Link With Aadhaar Card Update
अर्ज मिळविण्यासाठी काय कराल?
मतदार कार्ड आधार कार्डशी जोडण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रक्रिया अवलंबण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदारांना इलेक्शन कमिशनच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.
तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी स्थानिक पातळीवर मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भरलेला अर्जही तेथेच जमा करता येणार आहे. “Voting Card Link With Aadhaar Card Update”
मतदार कार्डसोबत आधार कार्ड लिंक केल्यानंतर मतदार यादी अधिक अचूक होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदार कार्डसोबत आधार कार्ड लिंक करून घ्यावे. ही प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणारं आहे.
जिल्ह्यात 35 लाख मतदार
विधानसभेच्या मे 2022 पर्यंत अपडेट झालेल्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात 35 लाख 28 हजार 542 मतदार आहेत. यात 18 लाख 35 हजार 578 पुरुष मतदार, तर 16 लाख 92 हजार 810 स्त्री मतदार आहेत. इतर मतदारांची संस्था 154 आहे.
अर्ज क्रमांक 6 द्वारे भरा माहिती
मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी 6 क्रमांकाचा अर्ज भरावा लागणार आहे. हा अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पदधतीने भरता येणार आहे. [Voting Card Link With Aadhaar Card Update]
नवीन मतदार नोंदणी करताना अर्ज क्रमांक 6 भरावा लागणार आहे, तर जुन्या मतदारांना अर्ज क्रमांक 6 ब भरावा लागणार आहे.
संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध
ज्यांना ऑफलाईन अर्ज करावयाचा आहे. त्यांच्यासाठी अर्ज क्रमांक 6 हा स्थानिक पातळीवरील मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे उपलब्ध असणार आहे.
तसेच हा अर्ज सीईओइलेक्शन डॉट महाराष्ट्र डॉट जिओव्ही डॉट या संकेतसथळावर उपलब्ध असणार आहे. ज्याना ऑनलाईन पदधतीने अर्ज करावयाचा आहे. त्यांच्यासाठी तेथेच महिती भरून अर्ज सबमिट करण्याची सुविधा असणारं आहे.
मतदान कार्ड आधार कार्ड शी लिंक करण्यासाठी कशी प्रक्रिया करू शकता?
ही प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणारं आहे.
मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी किती क्रमांकाचा अर्ज भरावा लागणार आहे?
मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी 6 क्रमांकाचा अर्ज भरावा लागणार आहे.