तुमचे मतदार कार्ड आता आधारला लिंक करावे लागणार | Voting Card Link to Aadhar Card

Voting Card Link to Aadhar Card:-आपले मतदार कार्ड आता आधार कार्डसोबत लिंक केलं जाणार असून त्या संदर्भातील विधेयक आज लोकसभेत मंजूर करण्यात आलं आहे.

लोकसभेत आज केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी निवडणूक सुधारणा विधेयक 2021 सादर केलं. या विधेयकाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी कायदा, 1950 आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मध्ये बदल करण्यात येणार आहेत.

Voting Card Link to Aadhar Card

निवडणूक सुधारणांच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने या बदलांना मंजुरी दिली होती.
सध्या ही बाब ऐच्छिक किंवा पर्यायी असल्याचं सांगण्यात येतंय.

म्हणजेच लोकांना त्यांचे मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा पर्याय देण्यात येईल. त्यामुळे मतदाराची एक स्वतंत्र्य ओळख निर्माण होणार आहे.

या विधेयकाच्या मसुद्यात मतदार यादीतील बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. एवढंच नाही तर मतदार यादीही आधारशी लिंक करण्याचा प्रस्ताव आहे.

Leave a Comment

close button