1 ऑगस्ट पासून मतदान कार्ड आधार कार्ड शी लिंक होणार | Voter Card link to aadhar card

Voter Card link to aadhar card – ऑगस्टपासून प्रत्येकाचे मतदार कार्ड आधारशी लिंक करणार. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी संलग्न करण्याचा निर्णय भारत निवडणूक आयोगाने घेतला आहे.

त्यानुसार येत्या 1 ऑगस्टपासून महाराष्ट्रात मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड जोडणीसाठी विशेष अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अप्पर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी सोमवारी दिली.

Voter Card link to aadhar card

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याची मोहीम 1 ऑगस्टपासून राज्यात सुरू होणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्र परिषदेत ही माहिती दिली. आधारशी मतदारकार्ड संलग्न करण्याची सक्ती नसली तरी इतर पासपोर्ट आदी 11 पर्यायी कागदपत्रे द्यावीच लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Voter Card link to aadhar card)

मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदारकार्ड आधारशी संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी देखील याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.

याचे होणार दोन फायदे

  1. मतदार कार्ड आधारशी संलग्न ओळखीचे प्रमाणीकरण, एकापेक्षा अधिक नोंदीची वगळणी तर शक्य होणार आहेच.
  2. निवडणूक तसेच मतदानासंबंधी महिती व आयोगाकडून प्रसारीत होणाऱ्या सूचना मतदाराला त्याच्या फोनपर्यंत थेट पाठविता येणार आहेत. “Voter Card link to aadhar card”
मतदान कार्ड आधार शी कसं लिंक करायचं? खाली दिलेला व्हिडिओ पहा 👇👇

अनिवार्य आहे का?

आधार क्रमांक संलग्न करणे ऐच्छिक आहे. त्यामुळे मतदाराकडे आधार क्रमांक नसल्यास नमुना 6 व मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना मनरेगा जॉब कार्ड, फोटोसहित किसान पासबुक, आरोग्य स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआय द्वारा दिले गेलेले स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, फोटोसहित पेन् कागदपत्रे, केंद्र / राज्य शासन कर्मचाऱ्याचे ओळखपत्र, आमदार / खासदार यांना दिलेले ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र या ११ पयार्यापैकी कोणताही एक दस्तावेज सादर करता येईल. आधारक्रमांकाची गोपनीयता अबाधित ठेवण्यात येईल. Voter Card link to aadhar card

मतदारांना काय करावे लागेल ?

  • आधारशी मतदारकार्ड जोडण्यासाठी अर्ज क्रमांक 6 ब भरावा लागणार आहे.
  • भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ, राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ, नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल, व्होटर हेल्पलाईन अॅप या ठिकाणी फॉर्म ऑनलाईनही भरता येईल.
  • तसे करणे शक्य न झाल्यास आधारकार्डाची साक्षांकित प्रतही मतदाराला प्रत्यक्ष सादर करता येईल.
  • घरोघरी जाऊनदेखील हा फॉर्म भरून घेण्यात येईल. “Voter Card link to aadhar card”
  • निवडणूक कार्यालयांकडून त्यासाठी राज्यव्यापी विशेष शिबिरेदेखील आयोजित करण्यात येणार आहे.

11 पर्यायी कागदपत्रे मात्र द्यावीच लागणार आहेत.

देशातील एकूण मतदार

8.4 कोटी – मतदारांची भर 2014 पासून यात पडली.
1.5 कोटी – मतदार हे 18 ते 19 या वयोगटातील
99.3% – मतदारांकडे मतदान ओळखपत्र
131.68 कोटी – देशातील एकूण आधारकार्डधारक [Voter Card link to aadhar card]

कालावधी कधीपर्यंत ?

ऑगस्ट 2022 ते एप्रिल 2023 पर्यंत ही मोहीम असेल

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याची मोहीम कधी पासून राज्यात सुरू होणार आहे?

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याची मोहीम 1 ऑगस्टपासून राज्यात सुरू होणार आहे.

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याचे फायदे काय आहेत?

1) मतदार कार्ड आधारशी संलग्न ओळखीचे प्रमाणीकरण, एकापेक्षा अधिक नोंदीची वगळणी तर शक्य होणार आहेच.
2) निवडणूक तसेच मतदानासंबंधी महिती व आयोगाकडून प्रसारीत होणाऱ्या सूचना मतदाराला त्याच्या फोनपर्यंत थेट पाठविता येणार आहेत.

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याचा कालावधी कधीपर्यंत आहे?

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याचा कालावधी ऑगस्ट 2022 ते एप्रिल 2023 पर्यंत कालावधी आहे.

Leave a Comment

close button