अखेर वनरक्षक भरती नवीन GR आला, परीक्षेचे स्वरूप & शारीरिक पात्रता जाहीर : Vanrakshak Bharti Exam Pattern & Physical Qualification

Vanrakshak Bharti Exam Pattern & Physical Qualification – गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याकरिता एकत्रित मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. त्यास अनुसरुन संदर्भाधीन क्र.2 येथील शासन निर्णय अधिक्रमित करुन वनरक्षक पदाच्या भरतीसाठी सुधारित प्रादेशिक निवड समिती, कार्यपध्दती व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

प्रादेशिक निवड समितीची कार्ये

  1.  वनवृत्तात रिक्त पदांचा आढावा घेऊन प्रवर्गनिहाय व वनवृत्तनिहाय भरती करावयाची पदसंख्या निश्चित करणे.
  2. लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करणे.
  3. लेखी परीक्षेच्या वनवृत्तवार निकालाच्या आधारे उमेदवारांची कागदपत्र तपासणी, शारीरिक पात्रता तपासणी व धावण्याची चाचणी घेण्याबाबत तसेच पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे इत्यादी कार्यवाही करणे.
  4. लेखी परीक्षेचे गुण व धावण्याच्या चाचणीचे गुण एकत्रित करुन सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे.
  5. सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे निवडसूची तयार करणे.
  6. उमेदवारांची 25 कि.मी./16 कि.मी. चालण्याची चाचणी घेणे.
  7. भरतीच्या प्रत्येक टप्प्यावर भरती प्रक्रिया योग्यरित्या होत आहे किंवा नाही याची शहानिशा मार्गदर्शन व नियंत्रण करणे.
  8. भरती प्रक्रियेदरम्यान प्रादेशिक निवड समितीचे सर्व निर्णय अभिलिखित करणे.
  9. विहीत करण्यात आलेल्या कार्यपध्दतीनुसार करावयाच्या पदभरतीची जबाबदारी संबंधित प्रादेशिक निवड समितीची राहील.

पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षा

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोटयातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरताना ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यासाठी टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इन्स्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) यापैकी एका कंपनीची शिफारस दि.11.07.2022 रोजीच्या अ.शा. पत्रान्वये स्थापित प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), म. रा. नागपूर यांच्या अध्यक्षतेखालील समिती शासनास शिफारस करेल. शासन स्पर्धा परीक्षेसाठी ज्या कंपनीस मान्यता देईल. [Vanrakshak Bharti Exam Pattern & Physical Qualification]

परीक्षेचे स्वरुप

सर्व उमेदवारांची 120 गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा व 80 गुणांची धावण्याची चाचणी घेण्यात येईल. लेखी परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based Test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करावी.

लेखी परीक्षेचा दर्जा हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या दर्जापेक्षा निम्न राहणार नाही. लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे 4 विषयांना गुण देण्यात येईल.

सामान्यज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका तयार करताना राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान इ. बाबींचा अंतर्भाव राहील.

लेखी परीक्षेच्या आधारे शारीरिक चाचणीकरीता पात्र ठरण्याकरिता उमेदवाराने लेखी परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ज्या उमेदवारांना किमान 45% गुण मिळणार नाही ते उमेदवारभरती प्रक्रियेतून बाद ठरतील. शारीरिक पात्रता तपासणे व धाव चाचणी घेणे.

लेखी परीक्षेत ज्या उमेदवारांनी किमान 45% गुण प्राप्त केले आहेत, अशा उमेदवाराची तपासणी खालीलप्रमाणे प्रादेशिक निवड समितीमार्फत करण्यात यावी. {Vanrakshak Bharti Exam Pattern & Physical Qualification}

Vanrakshak Bharti Exam Pattern & Physical Qualification

वयोमर्यादा, आरक्षण प्रवर्ग इत्यादीबाबत उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी. जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत ते भरती प्रक्रियेतून बाद करावेत.

वनरक्षक पदाच्या प्रचलित सेवाप्रवेश नियमानुसार किमान शारीरिक पात्रता (उंची, छाती इत्यादी) धारण करतात किंवा कसे हे निश्चित करण्याच्या दृष्टीने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारांची शारीरिक मोजमापे घ्यावीत. जे उमेदवार आवश्यक शारीरिक पात्रता धारण करणार नाही ते भरती प्रक्रियेतून बाद करावे. ‘Vanrakshak Bharti Exam Pattern & Physical Qualification’

कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप यामध्ये अपात्र ठरलेले उमेदवार वगळून इतर पुरुष उमेदवारांची 30 मिनिटांत 5 कि.मी. व महिला उमेदवारांची 25 मिनिटात 3 कि.मी. धावण्याची चाचणी घेण्यात यावी. सदर धावण्याच्या चाचणीकरिता शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराने शासकीय वैद्यकीय अधिकारी याचेकडून प्राप्त करुन घेऊन धावण्याच्या चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.

असे प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांचीच धाव चाचणी घेण्यात यावी. सदर धावण्याच्या चाचणीत नोंदविलेल्या वेळेचे अनुषंगाने चाचणीत भाग घेतलेल्या उमेदवारांना खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे गुण देण्यात यावेत.

पुरुष उमेदवार 5 कि.मी. अंतर धावण्याची चाचणी (एकूण गुण 80)

IMG 20221228 WA0015 -

“Vanrakshak Bharti Exam Pattern & Physical Qualification”

👇👇👇👇

GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

परीक्षेचे स्वरुप कसे असेल?

120 गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा व 80 गुणांची धावण्याची चाचणी घेण्यात येईल.

लेखी परीक्षा ही कोणत्या पध्दतीने होईल?

लेखी परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने होईल.

Leave a Comment

close button