Upcoming Police Bharti 2022 Maharashtra: राज्यात सात हजार पोलिसांची भरती होणार जूनपासून सुरू होणार प्रक्रिया
राज्यात सात हजार पोलिसांची भरती होणार
राज्याच्या पोलीस दलात लवकरच सुमारे सात हजार पोलीस शिपायांची भरती करण्यात येणार आहे. पुढील महिन्यापासून त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे गृहविभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाने या भरतीला यापूर्वीच मंजुरी दिली होती.
तथापि, राज्यात कोरोनाकाळामुळे ही भरती प्रक्रिया हाती घेता आलेली नव्हती. या भरतीसाठी पारदर्शक पद्धत अवलंबिली जाईल. ही प्रक्रिया एकाचवेळी हाती घेतली जाईल आणि एक ते दीड महिन्यांच्या कालावधीत ती पूर्ण करण्यात येणार आहे.
पोलीस भरतीतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरतीचे नियम आणि निकष अधिक कडक करण्यात येणार आहेत. पोलीस भरतीचा हा दुसरा टप्पा असेल. या आधी पहिल्या टप्प्यात पाच हजार पोलिसांची भरती करण्यात आली होती.
तिसऱ्या टप्प्यात पुढील वर्षी आणखी दहा हजार पदे भरून पोलीस पदांचा अनुशेष दूर करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न असेल. या निमित्ताने पोलीस दलात सहभागी होण्याची मोठी संधी तरुणाईला मिळणार आहे.
गडचिरोलीत स्थानिकांना प्राधान्य
- गडचिरोली : कोरोना संकट तसेच •पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्याची विदूनामावली अद्ययावत नसल्याने पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया घेण्यात आली नाही.
- गडचिरोलीत पोलीस शिपायांच्या १३६ जागा भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेत सर्वाधिक ७८ जागा इतर मागासवर्गासाठी आरक्षित आहेत.
- अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ३७, इतर प्रवर्गाला ३ ते ७ जागा आहेत. पदभरती जाहिरात निघाली आहे. सर्व ९३६ जागा गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांम घूनच भरण्यात येणार आहेत.
1 thought on “राज्यात सात हजार पोलिसांची भरती होणार | Upcoming Police Bharti 2022 Maharashtra”