फक्त उज्ज्वला लाभार्थ्यांना गॅसवर सबसिडी मिळणार | ujjwala gas cylinder subsidy yojana

ujjwala gas cylinder subsidy yojana – केंद्रीय पेट्रोल मंत्रालयाकडून अनुदानाबाबत स्पष्टीकर फक्त योजनेअंतर्गत गॅस घेतलेल्या गरीब महिला आणि इतरांना स्वयंपाकाच्या गॅसवर प्रति सिलिंडर 200 रुपये अनुदान मिळणार आहे.

इतर ग्राहकांना बाजारातील दरानेच गॅस घ्यावा लागणार असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे.

ujjwala gas cylinder subsidy yojana

तेल विभागाचे सचिव पंकज जैन यांनी सांगितले की, जून 2022 पासून कोणालाही स्वयंपाकाच्या गॅसवर अनुदान देण्यात आलेले नाही. मात्र 21 मार्च रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फक्त उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस घेणाऱ्या ग्राहकांना प्रति सिलिंडर 200 रुपये अनुदान जाहीर केले आहे.

याशिवाय वेगळे अनुदान इतर कोणत्याही ग्राहकांना देण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 21 मार्च रोजी सीतारामन यांनी पेट्रोल आणि डीझेलच्या दरामध्ये काही प्रमाणात घट केली होती.

फक्त उज्ज्वला लाभार्थ्यांना गॅसवर सबसिडी मिळणार

त्याचबरोबर उज्वला योजनेअंतर्गत वर्षाला 12 सिलेंडर घेणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक सिलिंडर मागे 200 रुपयाचे अनुदान जाहीर केले होते. या संदर्भात काही गैरसमज पसरले आहेत. त्यामुळे हे स्पष्टीकरण करण्यात येत असल्याचे जैन यनी सांगितले.

त्यानुसार आता उज्वला योजनेअंतर्गत स्वयंपाकाचा गॅस घेतलेल्या ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यामध्ये 200 रुपये परत पाठविण्यात येणार आहेत. या अनुदानामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर 6,100 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

ujjwala gas cylinder subsidy yojana

यावेळी बोलताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंह पुरी यांनी सांगितले की, अनुदान मुळात वाढत नसते ते कमी कमी होत जात असते. त्यामुळेच डीझेलवरील अनुदान 2010 मध्ये आणि पेट्रोल वरील अनुदान 2014 मध्ये कमी करण्यात आले आहे.

त्यानंतर दोन वर्षांनी केरोसिनवरील अनुदान बंद करण्यात आले होते. आता काही प्रमाणात स्वयंपाकाच्या गॅसवर अनुदान दिले जात आहे असे त्यांनी सांगितले. भारतात स्वयंपाकाच्या गॅसचे 30.5 कोटी ग्राहक आहेत. त्यातील नऊ कोटी ग्राहक हे पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत जोडण्यात आले आहेत.

Leave a Comment

close button