आता रेशन दुकानात विक्री साठी या वस्तू ठेवता येणार, शासन निर्णय जारी

मुंबई: उपरोक्त संदर्भिय शासन निर्णयान्वये शासनाने रास्तभाव/ शिधावाटप दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उत्पादनांबाबतचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करुन एकत्रित आदेश निर्गमित केले आहे. (Now these items can be kept for sale in the ration shop, the ruling issued)

सदर एकत्रित आदेशानुसार लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील वितरीत होणाऱ्या वस्तूंसह खुल्या बाजारातील वस्तूंची विक्री रास्तभाव दुकानातून करण्यास परवानगी देण्यात आली होती. सदर खुल्या बाजारातील आणखी काही वस्तू रास्तभाव/ शिधावाटप दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधिन आहे.

या वस्तू आता रेशन दुकानात विक्री साठी ठेवता येणार.

  • खुल्या बाजारातील साबण (आंघोळ व धुण्याचा)
  • हॅण्डवॉश
  • डिटर्जंटस (धुण्याचा सोडा)
  • शाम्पू
  • चहापत्ती व कॉफी

या वस्तू रास्तभाव/ शिधावाटप दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यास शासन मान्यता देत आहे. ही परवानगी अस्थायी स्वरुपात देण्यात येत असून, सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या स्वरुपात वेळोवेळी होणाऱ्या बदलाच्या अनुषंगाने त्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात येईल.

उपरोक्त वस्तूंचे दुकानापर्यंत वितरण व विक्रीपोटी मिळणारे कमिशन याबाबत रास्तभाव दुकानदारांनी संबंधित कंपनीच्या वितरकांशी परस्पर संपर्क साधावा. हा व्यवहार संबंधित कंपनी व त्यांचे घाऊक व किरकोळ वितरक आणि रास्तभाव दुकानदार यामध्ये राहील. यात शासनाचा कोणताही सहभाग अथवा हस्तक्षेप राहणार नाही.

Leave a Comment

close button