ठाणे महानगरपालिकेत नर्स पदासाठी बंपर भरती, अर्ज सुरू! Thane Mahanagarpalika Bharti 2023

By Marathi Corner

Published on:

Thane Mahanagarpalika Bharti 2023: नमस्कार मित्रांनो ठाणे महानगर पालिकेत (परिचारिका) नर्स पदाच्या विविध जागा रिक्त झाल्या असून त्या जागेवर नवीन नर्स Appoint करण्यासाठी TMC Thane मार्फत अधिकृत जाहिरात Notification प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना या भरती साठी अर्ज सादर करायचा आहे त्यांना महानगरपालिका द्वारे फॉर्म भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भरती प्रक्रिया ही सोपी आहे, कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. थेट मुलाखती वरून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. एकू रिक्त जागा या 72 आहेत, या भरती संबंधी सविस्तर अशी माहिती आपण आज या लेखामध्ये घेणार आहोत.

TMC Thane Bharti 2023 (ठाणे महानगरपालिका भरती 2023) in Marathi

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – परिचारिका (नर्स)

🙋 Total जागा – 72 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – 12वी उत्तीर्ण+ GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – ठाणे

👉 वयोमर्यादा (Age Limit) – खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे, राखीव प्रवर्गासाठी 45 वर्षे

💵 अर्ज शुल्क (Fees) – फी नाही

💰वेतन श्रेणी (Salary) – 30,000 रु. महिना

📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन (मुलाखत)

➡️ मुलाखतीचे ठिकाण – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

🖥️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 29 ऑगस्ट 2023 (11:00 AM)

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे पहा
🗒️ जाहिरात PDF (Recruitment Notification)Download करा
📆 मुलाखतीची तारीख (Interview Date)29 ऑगस्ट 2023

How to Apply for Thane Mahanagarpalika Bharti 2023 Offline Application

ठाणे महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत जी नर्स पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन नसून ऑफलाईन आहे. सोबतच उमेदवारांची निवड देखील ऑफलाईन रीतीने पार पडणार आहे. मुलाखती द्वारे थेट निवड केली जाणार आहे, कोणतीही अर्ज करण्याची फी नाही.

Thane TMC Bharti 2023 साठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांना, खाली दिलेल्या पायऱ्यांचा वापर करून त्यांचा फॉर्म भरून तो मुलाखती च्या ठिकाणी पाठवायचा आहे. आणि मुलाखती च्या तारखे नुसार मुलाखती ला इच्छित स्थळी उपस्थित राहायचे आहे.

सर्व प्रथम तुम्हाला TMC Thane Bharti चा फॉर्म भरून घ्यायचा आहे, तो फॉर्म काळजीपूर्वक भरायचा आहे.

कोणत्याही स्वरूपाची खोटी माहिती, अथवा फॉर्म मध्ये खाडाखोड करायची नाही. फॉर्म अचूक भरायचा आहे.

फॉर्म ला आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडून तो फॉर्म आणि कागदपत्रे TMC Thane ला पोस्टाद्वारे पाठवायचे आहे.

फॉर्म आणि कागदपत्रे पाठवल्यावर नंतर सूचनेनुसार मुलाखती साठी जी तारीख निश्चित झाली आहे, त्या तारखेला मुलाखती करीता तुम्हाला जायचे आहे.

मुलाखती द्वारेच उमेदवारांची निवड होणार आहे, जे उमेदवार या मुलाखती मध्ये योग्य कार्य करतील त्यांना नर्स परिचारिका पदासाठी महानगरपालिका मार्फत निवडले जाईल.

नोट: भरती प्रक्रिया ही कंत्राटी स्वरूपाची आहे, नोकरी ही केवळ 6 महिन्यासाठी म्हणजेच 169 दिवसासाठी असणार आहे. ठाणे महानगरपालिका मध्ये COVID 19 च्या वेळेस ज्या परिचारिकांनी काम केलं होते, त्यांना प्राधान्य असणार आहे.

Leave a Comment