Talathi Bharti Update – साडेतीन हजार तलाठी, अधिकाऱ्यांची भरती ! शासनाची मान्यता : अनुपकुमार समितीची शिफारस मान्य.
Talathi Bharti Update
सरकारने तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गातील 3628 पदांना मान्यता दिली असून लवकरच भरती सुद्धा होणार आहे. त्यामुळे शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. महसूल विभागाला प्रशासनाचा कणा म्हटले जाते. या विभागातील तलाठी हा गाव पातळीवर कार्य करणारा कर्मचारी आहे. शासनाच्या योजना गाव पातळी पोहचवण्यासोबत त्यांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी तलाठ्यावर आहे.
त्याचप्रमाणे मंडळ अधिकारी महत्त्वाचा घटक आहे. राज्यात लोकसंख्येत वाढ होत आहे. त्या तुलनेत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. तलाठी साझा’ची पुनर्रचना करण्याची मागणी विविध तलाठी संघटनांची होती. त्यासाठी तत्कालीन नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली. यात सर्व विभागीय आयुक्तांसह तलाठी संघटनांचे दोन प्रतिनिधी होते.
तलाठी अधिकाऱ्यांची भरती
समितीने तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या पदांच्या संख्येत वाढ करण्याची शिफारस केली. तलाठयांची 3110 तर मंडळ अधिकाऱ्यांची 518 अशी एकूण 3628 पदांची निर्मिती करण्याची सूचना केली. समितीची शिफारस राज्य शासनाने मान्य केली असून त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यासही परवानगी दिली आहे.
लवकरच या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते. यामुळे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण काही प्रमाणात कमी होणार असल्याचे बोलल्या जाते. पाण्यातील सर्व जिन्हांचा अभ्यास करून अध्यक्ष अनुपकुमार यांनी अहवाल तयार केला. तलाठ्यांची संख्या आणि काम बघता साझ्याची पुनरर्चना व संख्या वाढविण्याची शिफारस केली. शासनाने ती मान्य केली. यामुळे तलाठ्यांवरील कामाचा ताण काही प्रमाणात कमी होईल.
- संजय अनवाने, समिती सदस्य तथा सरचिटणीस, विदर्भ पटवारी संघ