ST Ticket Booking Update – ‘फोन पे, गुगल पे’ द्वारे काढा आता एसटीचे तिकिट, एसटी महामंडळाचा निर्णय; पाच हजार स्वाइप मशिन खरेदी.
ST Ticket Booking Update
एसटी प्रवासात सुट्ट्या पैशावरून प्रवासी व वाहकांत होणारे वाद आता कायमचे संपतील. कारण राज्य परिवहन महामंडळाने सुमारे पाच हजार नव्या स्वाइप मशिन्सची खरेदी केली आहे.
त्यामुळे प्रवाशांना आता ‘फोन पे, गुगल पे’ आदी ‘यूपीआय’ द्वारे तिकिटे काढता येणार आहेत. पहिल्या टप्प्यात सात एसटी विभागांना नवे स्वाइप मशिन्स देण्यात आल्या आहेत.
आता फोन पे, गुगल पे द्वारे काढा एसटी चे तिकिट
जुलै महिन्यात उर्वरित विभागांना हे मशिन्स देण्यात येतील. त्यामुळे आता प्रवाशांना प्रवाशांच्या सोयीसाठी हा 66 निर्णय घेण्यात आला आहे.
महामंडळाने पाच हजार मशिन्स खरेदी केल्या आहेत. येत्या काही दिवसांतच प्रवाशांना यूपीआय ॲपद्वारे तिकीट मिळेल.